RBI Recruitment: आता बँकांमध्ये Chief Compliance Officer ची नियुक्ती होणार

RBI Recruitment 2020

 आता बँकांमध्ये Chief Compliance Officer ची नियुक्ती होणार, RBI नं सांगितलं ‘या’ पदाची जबाबदारी

 बँकिंग  क्षेत्रात अनुपालन आणि जोखीम व्यवस्थापन संस्कृतीत एकरूपता आणण्याच्या दृष्टीने भारतीय रिझर्व्ह  शुक्रवारी बँकांमध्ये मुख्य अनुपालन अधिकारी (CCO- Chief Compliance Officer) नियुक्तीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

सीसीओला किमान तीन वर्षांसाठी महाव्यवस्थापक (General Manager) रँकच्या पदावर नियुक्त करावे लागेल. जरी हे पद महाव्यवस्थापक पदाच्या रँकचे नसले तरी ते मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या 2 रँकपेक्षा कमी दर्जाचे नसावे, असे या संदर्भातील आरबीआयच्या परिपत्रकानुसार म्हटले आहे. तसेच,;स्वतंत्र अनुपालन प्रक्रिया सीसीओच्या अंतर्गतच पूर्ण करावी लागेल, ज्यांची निवड योग्य प्रक्रियेअंतर्गत होईल. बँकेत अनुपालन जोखीम अचूकपणे करता यावे, यासाठी फिट आणि योग्य मूल्यांकनाच्या आधारे नियुक्ती जाईल. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असेही म्हटले आहे की, बँकांचे पालन त्यांच्या स्वत: च्या अनुसार केले जाते. परंतु त्यात नवीन एकरूपता सुनिश्चित करण्यात येईल.

 मार्गदर्शक सूचनांनुसार, सीसीओचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली किंवा हटविले जाऊ शकते. परंतु अपवादात्मक परिस्थितीत बँक बोर्डाची मान्यता आणि पारदर्शकपणे शोधणे अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेच्या अंतर्गत असेल. सीसीओ हे बँकेचे वरिष्ठ कार्यकारी असतील, ज्यांचे पद महाव्यवस्थापकाचे असेल. ते मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या खाली दोनपेक्षा जास्त नसावेत. मार्केटद्वारे सीसीओची नेमणूक देखील करता येते, असे म्हटले आहे.

 सीसीओला अशी कोणतीही जबाबदारी द्यावी लागणार नाही. ज्यामुळे हितसंबंधाची परिस्थिती उद्भवेल. विशेष म्हणजे व्यवसायांसंबंधी कोणत्याही भूमिकेवरून असे होऊ नये. बँकांना अशी भूमिका दिली जाऊ शकते ज्यामध्ये हितसंबंध संघर्षाचा कोणताही धोका नाही. जसे की, अँटी-मनी लॉन्ड्रिंग अधिकारी पद. अशा पदांवर बँक आकार, जटिलता, जोखीम व्यवस्थापन रणनीती यासाठी मदत दिली जाऊ शकते, असेही मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

सोर्स: लोकमत


RBI Recruitment 2020: The Reserve Bank of India (RBI Recruitment 2020), which is the economic backbone of the country, has provided job opportunities to the youth. RBI has conducted recruitment for a total of 39 posts including Data Analyst, Consultant, Account Specialist. The important thing is that the candidate is selected only through an interview.

Applications for these RBI posts have started from August 3. As per RBI Recruitment 2020, a total of 39 vacancies will be filled. The last day to apply for these positions is August 22 at 6 p.m.

RBI Recruitment: फक्त एक इंटरव्ह्यू; रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी

देशाचा आर्थिक कणा असलेल्या रिझर्व्ह बँकेने (RBI Recruitment 2020) तरुणांना नोकरीची संधी दिली आहे. RBI मध्ये डेटा अॅनालिस्ट, कन्सल्टंट, अकाऊंट स्पेशालिस्टसह एकूण 39 पदांवर भरती आयोजित केली आहे. महत्वाचे म्हणजे केवळ मुलाखतीद्वारे उमेदवार निवडला जाणारा आहे.

आरबीआयच्या या जागांसाठी 3 ऑगस्टपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. RBI Recruitment 2020 य़ा नुसार एकूण 39 जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिवस 22 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने या पदांसाठी उमेदवारांचे शैक्षणिक गुणवत्तेनुसार निवड करण्याचे ठरविले आहे. या नुसार पदांची भरती केली जाणार आहे. अकाऊंट स्पेशालिस्टसाठी उमेदवाराकडे सीएची पदवी असणे गरजेचे आहे. या सर्व पदांनुसार उमेदवाराचे वय 25 ते 40 वर्षे असावे.

आरबीआयमध्ये नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांनी आरबीआयची अधिकृत वेबसाईट rbi.org.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. RBI मध्ये या पदांसाठी निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. मुलाखतीनंतर पात्र उमेदवारांना निवडले जाणार आहे.

भरतीच्या माहितीसाठी इथे क्लिक करावे.

1 Comment
  1. Gaurav says

    Ex sarvise myan ko kaha aaplya kare

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!