Saas Jobs : SaaS कंपनीत लवकरच 2,000 कर्मचारी नियुक्त करणार ;  तरुणांना मिळणार संधी

Saas Company Jobs 2022

Saas Jobs Vacancies: Software as a service (or SaaS) is a way of delivering applications over the Internet—as a service. The software-as-a-service’ corp (SaaS) company will be recruiting in India as well as globally. Zoho Corp. is looking to hire at least 2,000 employees for the positions of engineers, web developers, designers, product marketers, writers, assistant engineers and sales executives. Read More details regarding Saas Jobs Vacancies are given below.

SaaS कंपनीत लवकरच 2,000 कर्मचारी नियुक्त करणार ;  तरुणांना मिळणार संधी

देशातील अनेक स्टार्टअप्स कंपन्या आणि व्यवसायिक मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कमी करत आहेत. मात्र ‘सॉफ्टवेअर-एज-ए-सर्व्हिस’ कॉर्प (SaaS) कंपनी भारतात तसेच जगभरात मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती करणार आहे. झोहो कॉर्प कंपनी अभियंते, वेब डेव्हलपर्स, डिझायनर्स, उत्पादन विक्रेते, लेखक, सहाय्यक अभियंते आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह पदांसाठी किमान 2,000 कर्मचारी नियुक्त करण्याचा विचार करत आहे.

Saas Recruitment 2022

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    
  • झोहो कॉर्प कंपनीने आधीच स्थानिक पातळीवर कर्मचारी भरती सुरू केली असून झोहो स्कूल ऑफ लर्निंग सारखे अपस्किलिंग प्रोग्राम उभे करण्याची तयारी सुरू केली आहे.
  • “आम्ही आधीच स्थानिक पातळीवर कामाला सुरुवात केली आहे. तसेच झोहो स्कूल ऑफ लर्निंग सारखे अपस्किलिंग प्रोग्राम सुरू करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी नियोजन सुरू केल्याचं झोहोच्या उत्पादने, कर आणि लेखा प्रमुख प्रशांत गँटी यांनी सांगितलं.
  • जगभरात झोहोचे सुमारे 10,000 कर्मचारी कार्यरत आहेत. भारत आणि युनायटेड स्टेट्समध्ये झोहोचे अस्तित्व आहे. कंपनी अलीकडेच इजिप्त, जेद्दाह आणि केप टाउन सारख्या भागात विस्तारली आहे.
  • झोहो आता भारतातील ग्रामीण भागातील तरुणांमधील टॅलेंट शोधून त्यांना संधी देणार असल्याचं गँटी यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या मते “शहरांमधील बहुसंख्य प्रतिभासंपन्न लोक हे ग्रामीण भागातूनच येतात. त्यामुळे आम्ही प्रतिभा शोधण्यासाठी अपस्किलींगमध्ये गुंतवणूक करत असल्याचं गँटी यांनी म्हटलं.

दरम्यान आम्ही आमच्या ऑडिओ/व्हिडिओ क्षमता सुधारण्यासाठी गुंतवणूक करत आहोत, जी सर्व व्यावसायिक कार्यांसाठी महत्त्वपूर्ण बनली आहे. “भारतात, आम्ही ग्रामीण पुनरुज्जीवन प्रकल्पांमध्ये आणि भारताची सखोल टेक इकोसिस्टम विकसित करण्यासाठी देखील गुंतवणूक करत असल्याचं गँटी यांनी म्हटलं.

SaaS फर्म झोहो पीपल द्वारे एचआर सोल्यूशन्स, झोहो बुक्सद्वारे आर्थिक व्यवस्थापन या व्यतिरिक्त झोहो इन्व्हेंटरी, झोहो सीआरएम आणि झोहो साइट सारखी इतर उत्पादने उपलब्ध करून देते. शिवाय आर्थिक व्यवस्थापन क्षेत्रातही प्रवेश करण्याचाही आमचा मानस असल्याचं गँटी यांनी नमूद केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!