ST Mahamandal Bharti- या जिल्ह्यात ST महामंडळ मार्फत ९५ कंत्राटी चालकांची भरती सुरु 

ST Mahamandal Jalgaon Bharti 2022

ST Mahamandal Jalgaon Bharti 2022- As per the news, Four months after the strike was called off by ST workers, many workers still did not return to work. Therefore, the corporation has started the recruitment process of contract drivers across the state to start the service at full capacity. The recruitment process of 95 contract workers has also started from March 23 in Jalgaon division.

MSRTC Bharti – एसटीत 11 हजार कंत्राटी कामगारांची भरती लवकरच अपेक्षित

जळगाव : विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या कामबंद आंदोलनाला चार महिने उलटल्यानंतरही, अनेक कर्मचारी अद्यापही आपल्या मागणीवर ठाम राहून कामावर परतलेले नाहीत. त्यामुळे महामंडळाने पूर्ण क्षमतेने सेवा सुरू करण्यासाठी राज्यभरात कंत्राटी चालकांची भरती प्रक्रिया सुरू केली असून, जळगाव विभागातही २३ मार्चपासून ९५ कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवायला सुरुवात झाली आहे. भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला एका महिन्यांसाठी नियुक्ती देण्यात येणार असून, त्यानंतर महामंडळाच्या सूचनेनुसार नियुक्तीचा कालावधी वाढविण्यात येणार आहे.

 

महामंडळातर्फे कंत्राटी पद्धतीने चालकांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सुरुवातीला या उमदेवारांना एका महिन्यासाठी नियुक्ती देण्यात येणार असून, महामंडळाच्या  सुचनेनुसार नियुक्तीचा कालावधी वाढविण्यात येणार आहे. 

या जिल्ह्यात ST महामंडळ मार्फत ९५ कंत्राटी चालकांची भरती सुरु

 

सरकारने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल दिल्यानंतर, परिवहन मंत्र्यांनी संपातील कर्मचाऱ्यांच्या कामावर रुजू होण्याचे आवाहन करून, त्यांच्यावरील कारवायादेखील मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. असे असतानाही, राज्यभरात फक्त २० टक्के कर्मचारी कामावर रुजू झाले नाही. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!