१०वी व १२वीच्या पुरवणी जुलै-ऑगस्ट २०२४ परीक्षेचा निकाल जाहीर – 10th & 12th Supplementary Exam

10th & 12th Supplementary Exam Results

10th & 12th Supplementary Exam Results Out – The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) has released the results of the Secondary School Certificate (Class 10) and Higher Secondary Certificate (Class 12) supplementary examination conducted by the nine zonal boards in July-August 2024 on two websites www.mahresult.nic.in www.mahahsscboard.in on Friday, 23/08/2024 at 01.00 pm.
Immediately after the online result, from the second day, the student who has entered the Supplementary Examination of Secondary School Certificate (10th) and Higher Secondary Certificate (12th) supplementary examination has been made available to apply online www.mahahsscboard.in to the concerned Divisional Board for verification of marks obtained in any particular subject (other than grade subjects) and photocopies of answer sheets to the concerned Divisional Board for re-evaluation.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

इ. १० वी व इ. १२ वी  जुलै-ऑगस्ट २०२४ सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत असून निकालाची कार्यपध्दती व त्याच्या कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल www.mahresult.nic.in www.mahahsscboard.in या दोन संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक २३/०८/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता जाहीर करण्यात येत आहे.
  • ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी ) पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना स्वतः अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी शनिवार, दिनांक २४/०८/२०२४ ते सोमवार, दिनांक ०२/०९/२०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card / Credit Card / UPI / Net Banking) याद्वारे भरता येईल.

इ १०वी व इ १२ वी जुलै/ऑगस्ट २०२४ पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करणेबाबत

Direct Link of Result 10th & 12th Supplementary Exam 2024

10th & 12th Supplementary Exam Result


10th Supplementary Exam 2024 New Time Table – The New time table for secondary school Certificate examination (10th Class) July – August 2024 is declared now.

इ. १० वी, इ. १२ वी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ वेळापत्रकातील बदलाबाबत


10th Supplementary Exam 2024 time table –The time table for secondary school Certificate examination (stat and 10) July – August 2024 is declared now. The secondary secondary school Certificate examination will commence form Tuesday,16th July 2024 an will be connected in following order.

10th July Exam Time Table


10th Supplementary Exam 2024 – Students can apply online for the Class 10 supplementary examination to be held by the State Board of Education in July 2014 from Friday (May 31). The State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) has declared the results of class 10 board exams 2024 online. The board will conduct the 10th supplementary exam in July 2024.

Re-examinees in the Secondary School Certificate (Class 10) examination, private students as well as students interested in improving the grade, students who have appeared for the supplementary examination with ITI subjects can apply online for the supplementary examination from Friday (May 31) to June 11 from Friday (May 31) to June 11 through the website www.mahahsscboard.in. Applications will also be offered with a late fee from June 12 to 17.
Secondary schools From June 1 to 19, the fee has to be deposited in the bank through currency and after that the list of students along with the invoice of payment of fees to the divisional board will be released. Submissions are due by June 21. Students should fill the application forms for the examination to be held in July-August 2024 through their secondary schools only.
Only two opportunities for grade improvement : Students who have passed the March 2024 examination will be given only two opportunities for grade improvement in July 2024 and March 2025. The There will be no extension for filing nominations after June 17, the board said.

दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आजपासून करता येणार अर्ज

राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने जुलै २०१४ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुक्रवार (दि. ३१ मे) पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. २७) ऑनलाइन जाहीर झाला. मंडळातर्फे दहावी पुरवणी परीक्षेचे जुलै २०२४ मध्ये आयोजन केले आहे.

  • माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधारसाठी इच्छुक विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून शुक्रवार (दि. ३१ मे) ते ११ जून या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज करता येईल. तसेच १२ ते १७ जून या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज करण्याची संधी दिली जाईल.
  • माध्यमिक शाळांनी दि. १ ते १९ जून या कालावधीत बँकेत चलनाद्वारे शुल्क जमा करायचे आहे आणि त्यानंतर विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या दि. २१ जूनपर्यंत जमा करायच्या आहेत. विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षेचे अर्ज त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फतच भरावेत.
  • श्रेणीसुधारसाठी केवळ दोन संधी – मार्च २०२४ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधारसाठी जुलै २०२४ आणि मार्च २०२५ अशा लगतच्या दोनच संधी दिल्या जाणार आहेत. दि. १७ जूननंतर अर्ज भरण्यास कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे मंडळातर्फे स्पष्ट केले.

10th July 2024 regarding the dates to submit online application forms for the examination

Official Website


10th-12th Exam new updates – 10th and 12th are very important years in terms of students’ careers. The class 10 and 12 exams this academic year are over and students are looking forward to the results. The class 10 results are likely to be declared in May. In this result, some will pass and some will fail. However, students who have failed in Class X and XII will no longer be stamped with the stamp of failure. Students will be given six months of skill training and will also get a chance to pass through the supplementary exam in July.

The results of class 10 and 12 are declared online. The results are then distributed from those centres. The teachers who came to collect the results of schools and colleges will be counselled by a representative of the State Board of Education. The teachers will then counsel the failed students and their parents.

दहावी अनुत्तीर्ण झाल्यावर ‘नापास’चा शिक्का लागणार नाही – विद्यार्थ्यांना सहा महिन्यांचे कौशल्य प्रशिक्षण

दहावी आणि बारावी हे विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे वर्ष आहेत. या शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्या असून विद्यार्थ्यांना निकालाचे वेध लागले आहेत. मे महिन्यात दहावीचे निकाल लागण्याची शक्यता आहे. या निकालात कोणी उत्तीर्ण तर कोणी अनुत्तीर्ण होईल. मात्र, आता दहावी आणि बारावीमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांवर नापासचा शिक्का बसणार नाही. विद्यार्थ्यांना सहा महिन्यांचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे, तसेच जुलैमध्ये पुरवणी परीक्षेच्या सहाय्याने त्यांना उत्तीर्ण होण्याची संधीदेखील मिळणार आहे.

  • दहावी, बारावीच्या परीक्षेत विद्यार्थी नापास झाल्यास पुढील शिक्षणात त्यांना रस राहात नाही. अनेकांना नापास झाल्यामुळे पुढे शिकण्याची इच्छा नसते. विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येते. अशा दहावी नापास विद्यार्थी व पालकांचे शाळेतच समुपदेशन केले जाणार आहे. त्यानंतर या विद्यार्थ्यांना सहा महिने कालावधीचे रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारीही करता येणार आहे. कारण जुलैमध्ये होणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेलादेखील विद्यार्थी बसू शकतील. याचदरम्यान एटीकेटीच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया न जाता त्यांना कौशल्याचे धडे घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी नापास झाला की, पालक मुलांना दोष देतात. पास झाला तरी अनेक पालक मुलांना टक्केवारीच्या कोंडीत पकडतात. अशा परिस्थितीत पालकांनी विद्यार्थ्यांना धीर देण्याची गरज असते. त्यामुळे पाल्यांना सावरून त्यांना योग्य दिशा देण्याची पालकांची तयारी असायला हवी.
  • फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थी नापास झाल्यास या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाकडून जुलैमध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाते. तसेच कौशल्य शिक्षणाच्या कालावधीतच ही पुरवणी परीक्षा आटोपून विद्यार्थ्यांचा नवा निकालही जाहीर केला जातो. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होऊन वर्ष वाया जाणार नाही.
  • आधी शिक्षकांचे समुपदेशन-दहावी, बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येतो. त्यानंतर निकाल त्या-त्या केंद्रांवरून वितरित केला जातो. शाळा, महाविद्यालयांचा निकाल घेण्यासाठी आलेल्या शिक्षकांना राज्य शिक्षण मंडळाच्या प्रतिनिधीकडून समुपदेशन केले जाणार आहे. त्यानंतर हे शिक्षक नापास विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणार आहेत.

10th-12th Exam 2024 Fees updates – Due to the drought situation in the state, the state board has implemented a waiver of examination fees for students of class 10 and 12 in drought-like areas. Accordingly, regular students of Class X and XII will have to contact schools and junior colleges with the necessary eligibility information, Aadhaar linked bank account information of themselves or parents. Students will also be reimbursed fees online. State Board Secretary Anuradha Oak gave this information in a press release.

Drought-like situation has been declared in 40 talukas in 15 districts of the state, besides 1,021 revenue divisions. Therefore, the amount of examination fee will be refunded through RTGS, NEFT to the students of class 10 and 12 in these areas.

दहावी, बारावीसाठी निर्णय – दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य मंडळातर्फे दुष्काळसदृश भागांतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार दहावी, बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांना पात्रतेची आवश्यक माहिती, स्वतःच्या किंवा पालकांच्या आधार संलग्न बँक खात्याच्या माहितीसह शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शुल्क प्रतिपूर्ती केली जाणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
राज्यातील १५ जिल्ह्यांतील ४० तालुके, त्या व्यतिरिक्त १,०२१ महसूल विभागांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलीआहे. त्यामुळे या भागांतील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना आरटीजीएस, एनईएफटीद्वारे परीक्षा शुल्काची रक्कम परत केली जाणार आहे.
स्वयंअर्थसहाय्यित शाळा वगळता शासकीय शाळा, खासगी अनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना ही योजना लागू राहणार आहे. परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेंतर्गत सर्व कागदपत्रे शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावर जतन करावेत. ही योजना नव्याने कार्यान्वित झाली असल्याने या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), विभागीय शिक्षण उपसंचालक आणि विभागीय मंडळ सचिव यांनी दिलेल्या मुदतीत राज्य मंडव्यकडे माहिती सादर करण्यासंदर्भात पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती ही राज्यमंडळ स्तरावरून विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याने ही माहिती उपलब्ध न झाल्यास किंवा चुकीची माहिती, चुकीचा बँक खाते क्रमांक दिल्यास विद्यार्थी शुल्क प्रतिपूर्तीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे दिलेल्या मुदतीत परिपूर्ण माहिती भरण्याची दक्षता घ्यावी, याबाबतची पूर्ण जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


10th-12th Exam 2024 new updates – Last year, the state education board had discontinued the practice of giving question papers 10 minutes before the start of the examination in 12th class and 10th class exams and extended the total duration of the exam by 10 minutes. This year too, the same pattern has been maintained in the 10th and 12th examinations scheduled to be held in February – March 2024. State Board of Education Secretary Anuradha Oak gave this information in a press release on Wednesday. Even during the February-March 2024 examinations, the question papers will be distributed in the examination hall at 11 am in the morning session and at 3 pm in the afternoon session and the writing will start. Also, the time will be extended by 10 minutes at the end of the exam,” he said. Candidates should be present at the examination centre at 10:30 am in the morning session and 2:30 pm in the afternoon session.

दहावी- बारावी परीक्षेत १० मिनिटे मिळणार जास्त – राज्य शिक्षण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेत गतवर्षी परीक्षा सुरू होण्याच्या दहा मिनिटे पूर्वी प्रश्नपत्रिका देण्याची पद्धत बंद केली होती तसेच परीक्षेच्या एकूण कालावधीत दहा मिनिटे वेळ वाढवून दिला होता. यंदाही फेब्रुवारी – मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी बारावी परीक्षेत हीच पद्धत कायम ठेवण्यात आली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी बुधवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

  • फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षांच्या वेळीही सकाळच्या सत्रात सकाळी ११ वाजता तसेच दुपारच्या सत्रात दुपारी ३ वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखन प्रारंभ होईल. तसेच परीक्षेच्या शेवटी दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
  • परीक्षेच्या अर्धा तास आधी उपस्थित राहावे – सकाळच्या सत्रात स. १०:३० वाजता तसेच दुपारच्या सत्रात दु.२:३० वाजता परीक्षार्थ्यांन परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • परीक्षेची सध्याची वेळ आणि सुधारित वेळ (कंसात)

सकाळचे सत्र
■ स. ११ ते २ (दु, २:१०)
■ स. ११ ते दु. १ (दु. १:१०)
■ स. ११ ते दु. १:३० (दु.१:४०)

दुपारचे सत्र
■ दु. ३ ते सायं. ६ (सायं. ६:१०)
■ दु. ३ ते सायं. ५ (सायं. ५:१०]
■ दु. ३ ते सायं. ५:३० (सायं. ५:४०)

OFFICIAL WEBSITE


There will be a major change in the examination pattern for class 10th & 12th students. They will now be tested twice a year. There will be one session before Diwali and another and final session in March. According to senior sources in the Pune Board, the change under the new National Education Policy is likely to be implemented from the next academic year 2024-25 or 2025-26. Class 10 and 12 exams are considered to be the foundation of a student’s career. Students are always worried about those exams and parents are also stressed. Many, especially girls, drop out of school halfway through when they fail.

दहावी-बारावीसाठी आता सेमिस्टर पॅटर्न! दिवाळीपूर्वी एक सत्र अन्‌ मार्चमध्ये दुसरे सत्र; २०२४-२५ किंवा २०२५-२६ पासून अंमलबजावणी

इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीत मोठा बदल केला जाणार आहे. आता त्यांची वर्षातून दोनदा परीक्षा होतील. दिवाळीपूर्वी एक सत्र आणि मार्चमध्ये दुसरे व अंतिम सत्र होईल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या बदलाची अंमलबजावणी आगामी २०२४-२५ किंवा २०२५-२६च्या शैक्षणिक वर्षापासून होऊ शकते, अशी माहिती पुणे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. दहावी, बारावीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या करिअरचा पाया मानला जातो. विद्यार्थ्यांमध्ये त्या परीक्षांची नेहमीच चिंता असते आणि पालकांवरही ताण असतो. अनेकजण विशेषत: मुली अनुत्तीर्ण झाल्यावर अर्ध्यातूनच शिक्षण सोडतात.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून हा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याची तयारी सुरू झाली असून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बोर्ड परीक्षा, अभ्यासक्रमासह इतर १० मुद्द्यांवर पालक, शिक्षक, अभ्यासकांसह सर्वसामान्य लोकांची मते मागविली आहेत. बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची खरी क्षमता तपासता येत नाही, असे तुम्हाला वाटते का? बोर्डाच्या परीक्षा घेण्याच्या सध्याच्या पद्धतीत बदल काही करण्याची गरज आहे का? बोर्डाच्या परीक्षेची जी पद्धत सुरू आहे ती तशीच राहू द्यावी की बदलावी, असे तुम्हाला वाटते का? अशा प्रश्नांवर त्यांची मते मागवून घेतली आहेत. त्याचा विचार करून दोन वर्षांत नवीन पद्धत अवलंबली जाणार आहे.

पाठांतराची सवय कमी करण्याचा प्रयत्न – नवीन अभ्यासक्रमात पुस्तकांचा मजकूर कमी करून ते मनोरंजक आणि समर्पक बनविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुस्तकांच्या आशयाची सांगड घातली जाणार असून, विद्यार्थ्यांसाठी सामग्री लक्षात ठेवण्याऐवजी, ती वैचारिक बनविण्याचाही अभ्यासक्रमातून प्रयत्न होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

नवीन बदल असा असणार… – शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणेच अध्यापन करतील. पण, पदवी तथा पदव्युत्तर पदवीच्या परीक्षांप्रमाणे दहावी- बारावीच्या परीक्षाही सत्र पद्धतीनेच होतील. पहिले सत्र दिवाळीपूर्वी घेले जाणार असून पुढील सत्र मार्च महिन्यात होईल. तत्पूर्वी, त्यांची प्रात्यक्षिक परीक्षा पार पडेल. शेवटी दोन्ही सत्र परीक्षांचे गुण एकत्रित करून बोर्डाच्या माध्यमातून निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. तत्पूर्वी, पहिल्या सत्राचे गुण विद्यार्थ्यांना पहायला मिळणार आहेत.

सेमिस्टर पॅटर्नचा हेतू…

  • विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि त्यांच्यावरील ताण कमी होईल
  • एका सत्रात कमी गुण मिळाल्यास दुसऱ्या सत्रात त्यांना जास्त अभ्यास करण्याची संधी
  • अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढच्या सहा महिन्यातच पुन्हा संधी मिळेल आणि त्यामुळे अर्ध्यातून शाळा सोडणे थांबेल

10th – 12th Exam 2024 Application Form Date Extended till 28th November 2023. Students appearing for the Higher Secondary Certificate Examination (12th Class) 2024 will be able to submit their application forms at a late fee till November 28, 2023. Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) Secretary Anuradha Oak said in a statement. The deadline given to students appearing for 12th class exams to submit their application forms ends on 20th November 2023. Therefore, applications can be submitted at a late fee from November 21, 2023. The deadline will be From November 21 to 28.
12th Class students can fill the application form on the website www.mahahsscboard.in. The deadline for submission of application forms along with late fees of students through higher secondary schools and junior colleges is From 25th November 2023 to 30th November 2023. There will no longer be any extension of the dates for filing applications at late fee. It was also informed that the dates for submission of applications at a very late fee will be announced in due course.

बारावीच्या परीक्षांचे विलंब शुल्काने फॉर्म भरण्यासाठी आठ दिवसांची मुदतवाढ

  • उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) 2024 साठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 28 नोव्हेंबर पर्यंत विलंब शुल्काने आवेदनपत्रे सादर करता येणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी याबाबत माहिती दिली आहे.
  • बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आवेदनपत्रे सादर करण्यासाठी दिलेली मुदत 20 नोव्हेंबर रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे 21 नोव्हेंबर पासून विलंब शुल्काने आवेदनपत्रे सादर करता येतील. 21 ते 28 नोव्हेंबर पर्यत ही मुदत असेल.
  • बारावीच्या विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर आवेदनपत्र भरता येणार आहेत. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांची विलंब शुल्कासह आवेदनपत्रे सादर करण्याची मुदत 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत आहे.
  • यापुढे आवेदनपत्रे विलंब शुल्काने भरण्याच्या तारखांना कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच आवेदनपत्रे अतिविलंब शुल्काने सादर करण्याच्या तारखा यशावकाश कळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

OFFICIAL WEBSITE


10th-12th Exam 2023 Exam form date extended – The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) has extended the deadline for submission of online applications with regular fees for 12th class board exams scheduled to be held in February-March 2024 till 20th November 2023. The junior college had until November 6 to submit the examination forms of regular, business courses, re-examinees of all branches, private students who have received enrolment certificates, as well as those who have taken transfer of credit through iti under the grading scheme and minor subjects. However, the deadline for submission of online applications has now been extended from 7th November 2023 to 20th November 2023, said Anuradha Oak, secretary of the state board. ‘www.mahahsscboard’ through junior college. Applications can be submitted on the website within the stipulated time. The state board has directed the students to pay the fee in the bank from 9th November 2023 to 24th November 2023 after submitting the online application form.

बारावी अर्ज भरण्यासाठी २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरण्यास २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बारावीची परीक्षा देणारे नियमित, व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी, तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरण्यासाठी सहा नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. परंतु आता ७ ते २० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ‘www.mahahsscboard. in’ या संकेतस्थळावर प्रचलित पद्धतीने दिलेल्या मुदतीत अर्ज भरता येणार आहेत. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर ९ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत बँकेत शुल्क भरण्याची सूचना राज्य मंडळाने केली आहे.


10th-12th Exam 2023 Final Time Table declared by Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education. The State Board announced today (2nd November 2023) the schedule of final written examination to be held in February-March 2024. According to this Exam Schedule, the 12th exam will be held from 21st February 2023 to 19th March 2023 and the 10th exam will be held from 1st to 26th March 2023. The detailed schedule of the exams will be available from the official of the Board of Education. The detailed schedule of these examinations announced by the board will be available on the board’s website www.mahasscboard.in. 10th Exam 2024 Time Table & 12th Exam 2024 Time Table are given briefly below:

10th-12th Exam 2023 Final Time Table  
  • ■ 12th General, Vocational and Dual Courses from 21st February to 19th March
  • ■ Class 12th Information Technology and General Knowledge Subjects Online Examination – 20th to 23rd March
  • ■ Class 10 Exam – 1st to 26th March

दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या अंतिम लेखीपरीक्षेचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान तर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक शिक्षण मंडळाच्या अधिकृत उपलब्ध होईल. मंडळाकडून जाहीर केले जाणारे या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahasscboard.in संकेतस्थळावर उपलब्ध होईल. त्यावरच विश्वास ठेवावा, अन्य संकेतस्थळांवरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून प्रसिद्ध झालेले वेळापत्रक विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे.
मंडळाच्या या वेळापत्रकानुसार, दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० ते २९ फेब्रुवारीदरम्यान तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दोन ते २० फेब्रुवारीदरम्यान घेतली जाणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधून मिळणाऱ्या छापील वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे, अशा सूचनाही राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.

असे असेल वेळापत्रक

  • ■ बारावी सर्वसाधारण, व्यवसाय व द्विलक्षी अभ्यासक्रम २१ फेब्रुवारी ते १९ मार्च
  • ■ बारावी माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा – २० ते २३ मार्च
  • ■ दहावीची परीक्षा – १ ते २६ मार्च

OFFICIAL WEBSITE


10th-12th Exam Details Form link open  – Now, the Maharashtra state board of secondary and higher secondary education (MSBSHSE) will start the online application process for 10th class exams to be held in March 2024. The process of filling online applications for 10th class school examination to be held in March-2024 will start from Friday, October 20, 2023 and schools will have to complete the process of filling online applications from Direct database by November 20, 2023. 

SSC 2024 Exam Forms: After filling and submitting the application forms of all the students accurately, secondary schools will be provided with a prelist from their login during the filling period of filling the applications. Secondary schools need to take a print out of it and verify that all the information mentioned in the application by the students is verified as per the General Register and is accurate.

मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणार्‍या दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याला आजपासून सुरुवात

MSBSHSE बोर्डाने जाहीर केल्याप्रमाणे, बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया या आधीच सुरू झाली आहे.आता, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-२०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला २० ऑक्टोबर २०२३ पासून सुरुवात होणार आहे.

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-२०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी शालान्त परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज, शुक्रवार २० ऑक्टोबर २०२३ पासून सुरुवात होणार असून, सरल डाटाबेसवरून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया शाळांना २० नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करावी लागणार आहे.
  • MSBSHSE बोर्डाने जाहीर केल्याप्रमाणे, बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया या आधीच सुरू झाली आहे. आता शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डाटाबेसवरुन २० ऑक्टोबरपासून भरायला सुरुवात करावी. ही आवेदनपत्रे नियमित शुल्कासह पुढील महिनाभर भरता येणार असल्याचेही त्यांनी या पत्रकात नमूद केले आहे.
  • सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे अचूक भरुन सबमिट केल्यानंतर आवेदनत्रे भरावयाच्या भरण्याच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांना त्यांच्या लॉगीनमधून प्रीलिस्ट उपलब्ध करुन दिलेली असेल. माध्यमिक शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.
  • मार्च २०२४ मधील परीक्षेसाठी मार्च २०२३ अथवा जुलै-ऑगस्ट २०२३ मधील परीक्षेमध्ये एकाचवेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आवेदनपत्र भरून परीक्षेस प्रविष्ठ होता येणार आहे, असेही म्हटले आहे

१०वी फेब्रु २०२४ परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाइन सादर करण्याच्या तारखेबाबत.

१२वी फेब्रु २०२४ परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाइन सादर करण्याच्या तारखेबाबत.


10th-12th Exam Details – Union Education Minister Dharmendra Pradhan has clarified that it will not be compulsory for the students of class 10th and 12th to take the board exam twice a year. This option has been given to reduce the mental pressure of the students of the board. Apart from this, he also said that the Central Education Advisory Board will be restructured. Pradhan said that students will have the option of taking the board exam twice a year just like the engineering entrance exam. They can choose their best score. However, it will not be compulsory to take the exam twice. By giving the option of two examinations in a year, the stress on the students will be reduced. Pradhan said that if he gets less marks in one exam, he can make up for it by taking another chance.

१०, १२वी बोर्डाच्या किती परीक्षा द्यायच्या? दोन वेळा परीक्षेची सक्ती नाही; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण

  • इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना वर्षातून दोन वेळा बोर्डाची परीक्षा देणे सक्तीचे राहणार नाही, असे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले आहे. बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे मानसिक दडपण कमी करण्याच्या दृष्टीने हा पर्याय देण्यात आला आहे. याशिवाय केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाची पुनर्रचना होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
  • प्रधान म्हणाले की, विद्यार्थ्यांसमोर अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेप्रमाणेच वर्षातून दोन वेळा बोर्डाची परीक्षा देण्याचा पर्याय असेल. ते त्यांचा सर्वोत्तम स्कोअर निवडू शकतात. मात्र, दोन वेळा परीक्षा देणे सक्तीचे राहणार नाही. वर्षातून दोन परीक्षांचा पर्याय दिल्यामुळे विद्यार्थ्यांवरील तणाव कमी होईल. एका परीक्षेत कमी गुण मिळाले तर दुसऱ्या संधीतून त्याची भरपाईदेखील करू शकतात, असे प्रधान म्हणाले.
  • शिक्षण मंत्रालयाने ऑगस्टमध्ये नव्या अभ्यासक्रमाच्या रचनेनुसार दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन वेळा बोर्डाची परीक्षा द्यावी लागेल, असे जाहीर करण्यात आले होते.
  • ‘कोणाचाही जीव जायला नको’ – कोटा येथे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात ते म्हणाले की, ती आपलीच मुले आहेत. कोणाचाही जीव जायला नको. विद्यार्थी तणावमुक्त राहतील, हे सुनिश्चित करण्याची आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
  • डमी शाळांचा मुद्दा गंभीर – विद्यार्थी आपल्या राज्यात शाळेत प्रवेश घेतात. तर कोचिंगसाठी कोटा किंवा इतर ठिकाणी जातात. ते शाळेत जातच नाहीत आणि थेट बोर्डाची परीक्षा देतात. अशा डमी शाळांचा प्रश्न गंभीर आहे.

The applications of the regular students who want to appear in the 12th examination to be held in February-March 2024 through the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will be filled online through the ‘Saral Database’ through the respective Junior College Principals. Anuradha Oak, Secretary of the State Board of Education informed that the facility of filling the online application form for the examination will be made available from next Monday (9th). Read the more details given below and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

बारावीसाठी सोमवारपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज ‘सरल डेटाबेस’वरून ऑनलाइन पद्धतीने संबंधित कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरण्यात येणार आहेत. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा येत्या सोमवारपासून (ता. ९) उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयामार्फत सर्व शाखांचे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआयचे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयातील प्रमुखांमार्फत भरण्यात येणार आहेत.
कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र, कला आणि वाणिज्य शाखांसह व्यवसाय अभ्यासक्रम शाखांच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी (ता. ९) सुरू होणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज सहा नोव्हेंबरपर्यंत भरून घेण्यात येणार आहेत. परीक्षेचा ऑनलाइन अर्ज आणि अधिक माहिती राज्य मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शिक्क्यावर स्वाक्षरी करावी
सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी दिलेल्या कालावधीत उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना प्री-लिस्ट उपलब्ध करून देण्यात येईल. कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून अर्जात नमूद केलेली माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी आणि संबंधित प्री-लिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केल्याबाबत महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्री-लिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यावर स्वाक्षरी करावी, असे ओक यांनी स्पष्ट केले आहे.


10th-12th Exam Form 17 Date Extended till 31st October 2023. The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has provided the facility to enter as a private student by filling Form 17 for the February-March 2024 examination of class 10th and 12th. The regular registration deadline for the exam was till 30th September. But now online name registration can be done till 15th October with late fee and till 31st October with late fee. Students should visit the website for online instructions and more information. Read the more details given below and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

१० वी, १२ वीच्या परीक्षार्थीसाठी ३१ ऑक्टोबर मुदत  

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता १० वी व १२ वीच्या माहे फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या परीक्षेस फॉर्म १७ भरून खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षेसाठी नियमित नोंदणीची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. मात्र आता ऑनलाईन नाव नोंदणी विलंब शुल्कासह १५ ऑक्टोबर, तर अतिविलंब शुल्कासह ३१ ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सूचना व अधिक माहितीसाठी संकेतस्थळाचा वापर करावा.

OFFICIAL WEBSITE


10th Supplementary exam updates – Supplementary examination will be conducted by the state board in July-August for the failed students in class 10th examination and students who want to improve their rank. Students were given the opportunity to fill the application form for this examination between 7th to 16th June with regular fee and between 17th June to 21st June with late fee; However, it has now been extended. Read the more details given below and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

दहावी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

राज्य मंडळातर्फे दहावीच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थी आणि श्रेणी सुधार करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठीचा प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना 7 ते 16 जून दरम्यान नियमित शुल्कासह तर 17 जून ते 21 जून दरम्यान विलंब शुल्कासह भरण्याची संधी देण्यात आली होती; परंतु, त्यास आता मुदतवाढ देण्यात आली आहे.

  • सुधारित वेळापत्रकानुसार नियमित शुल्कासह 17 ते 21 जून तर विलंब शुल्कासह 22 जून ते 25 जून दरम्यान विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळांमार्फत अर्ज भरता येणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.
  • विद्यार्थ्यांनी 17 ते 25 जून या कालावधीत अर्ज भरत असतानाच 8 ते 26 जून या कालावधीत शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना चलनाद्वारे बँकेत शुल्क भरता येणार आहे. तर 27 जूनला माध्यमिक शाळांमार्फत बँकेत शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या विभागीय मंडळात जमा करायच्या आहेत.
  • ऑनलाइन अर्जात मार्च-एप्रिल 2023 मध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांची त्या परीक्षेतील माहिती प्रवेश अर्जात घेता येईल. श्रेणीसुधार करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट 2023 आणि फेबवारी-मार्च 2024 या लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

10th 12th Exam Results 2023

Maharashtra Board 10th, 12th Results 2023 : 12th result is announced by Maharashtra Board in the second week of May. According to this, it is expected that the result of class 12th will be announced before 20th May 2023. Also, the result of class 10 is announced in the last week of May. According to this, the 10th result will be announced before 31st May 2023. After declaration of 10th and 12th results will be available on the official website of the board. www.mahresult.nic.in www.hscresult.mkcl.org www.mahahhscboard.in. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

दहावी, बारावी परीक्षेच्या निकालासंदर्भात महत्वाची बातमी, कुठे मिळणार निकाल

दहावी, बारावीची परीक्षा झाली आहे. विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतिक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या निकालाची ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. सीबीएसई आणि महाराष्ट्र बोर्डाचे निकाल लवकरच जाहीर केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल कधी लागणार यासंदर्भात उत्सुकता विद्यार्थ्यांना लागली आहे. निकालासंदर्भात महत्वाची माहिती मिळाली आहे. दहावी-बारावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा संपणार आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट maharesults.mic.in वर विद्यार्थ्यांसाठी निकाल लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

10th, 12th Results 2023 Date / कधी लागणार निकाल

  • महाराष्ट्र बोर्डाकडून बारावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लावला जातो. त्यानुसार २० मे पूर्वी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लावला जातो. त्यानुसार ३१ मे पूर्वी दहावीचा निकाल लागणार आहे.

किती विद्यार्थी होते

  • दहावीच्या परीक्षेला राज्यातून 15,77,256 विद्यार्थी बसले होते. त्यात 8,44,116 मुले तर 7,33,067 मुलींचा समावेश होता. राज्यभरातील 5,033 सेंटरवर दहावीची परीक्षा झाली होती. आता या सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा आहे.

Where to check 10th, 12th Results 2023 / कुठे पाहाता येईल निकाल?

दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहाता येणार आहे.

  1. www.mahresult.nic.in
  2. www.hscresult.mkcl.org
  3. www.mahahhscboard.in

The Maharashtra Board is taking care that there will be no delay for 10th-12th Exam Results to take a further admissions process. Accordingly, the board has also planned that the results should be announced in time. 12th result will be declared First and then 10th Results will be declared. The board has also made it clear that if the result is not announced by the end of May, then the result will be announced by June 3 to 4. After that, preparations have also been made that the 10th result will be announced in six to eight days, i.e. by June 10. Read the complete details given below:

बारावीचा निकाल ‘या’ दिवशी, दहावीचा निकाल १० जूनपूर्वी;

दहावी-बारावीच्या निकालाची तयारी आता युद्धपातळीवर सुरु असून ९० टक्के कामकाज पूर्ण झाले आहे. पहिल्यांदा बारावीचा निकाल ३ ते ४ जून रोजी जाहीर होईल. तर दहावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर करण्याच्या दृष्टीने बोर्डाकडून नियोजन सुरु आहे.

  • पुणे बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा पार पडली होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्यात आली, पण त्यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘नांदेड पॅटर्न’ राबविला. त्यामुळे निश्चितपणे कॉपी प्रकरणांमध्ये मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले. परीक्षेनंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे.
  • सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी झाल्यावर आता निकालाची तयारी सुरु झाली आहे. बोर्डाकडून निकालाच्या दृष्टीने आवश्यक ९० टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
  • दहावी-बारावीनंतर पुढील प्रवेशासाठी विलंब होणार नाही, याची खबरदारी बोर्डाकडून घेतली जात आहे. त्याअनुषंगाने निकाल वेळेत लागावेत, असे नियोजनही बोर्डाने केले आहे. पहिल्यांदा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.
  • मेअखेरीस निकाल जाहीर न झाल्यास ३ ते ४ जूनपर्यंत तो निकाल लागेल, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर सहा ते आठ दिवसांत म्हणजेच १० जूनपर्यंत दहावीचा निकाल लागावा, अशीही तयारी झाली आहे.

निकालानंतर 11th प्रवेश प्रक्रिया

  • यंदापासून नवीन राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी राज्यातील सर्वच अकृषिक विद्यापीठांमध्ये होणार आहे. त्यामुळे बारावीनंतरचे शिक्षण आता त्या धोरणानुसारच घ्यावे लागणार आहे. त्याचीही तयारी युद्धपातळीवर सुरु झाली आहे.
  • बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला काही दिवसांचा अवधी मिळणार आहे. साधारणत: ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून विद्यापीठांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल.
  • विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत बोर्डाने आता निकालाची तयारी युद्धपातळीवर सुरु केल्याचेही सांगण्यात आले.
  • अकरावीसाठी ॲडमिशनचे संभाव्य वेळापत्रक जाहीर – FYJC Admission 2023

According to the information received, the Maharashtra Board 10th and 12th results will be out by the end of next month. However, no official information has been given by the board. But many media reports have informed that the results of 10th and 12th will be out by the end of June. Due to this, the waiting of students of class 10th and 12th will end in the next one month. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा झाल्या आहेत. बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत झाल्या असून दहावीच्या परीक्षा या 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान घेण्यात आल्या होत्या. आता बोर्ड एक्झाम झाल्या आहेत आणि बोर्ड परीक्षा झाल्यानंतर नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना चाहूल लागली आहे ती निकालाची. दरम्यान आता दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दहावी आणि बारावीचे निकाल पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत लागणार आहेत. याबाबत मात्र बोर्डाकडून अधिकारीक माहिती देण्यात आलेली नाही. परंतु अनेक मीडिया रिपोर्टमध्ये दहावी आणि बारावीचे निकाल जून अखेरपर्यंत लागतील अशी माहिती देण्यात आली आहे. यामुळे आता येत्या एका महिन्यात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे.

How to check 10th – 12th Results

कुठं पाहणार निकाल

  1. दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देता येणार आहे.
  2. maharesult.nic.in आणि mahahsscboard.in या दोन वेबसाईटवर जाऊन दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी, परीक्षार्थी आपला रिझल्ट पाहू शकणार आहेत.
  3. रिझल्ट पाहण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाकडून रिझल्ट डिक्लेअर झाले की वर नमूद केलेल्या दोन संकेतस्थळांपैकी म्हणजेच वेबसाईट पैकी कोणत्याही एका वेबसाईटवर तुम्हाला भेट द्यावी लागेल.
  4. वेबसाईट ओपन झाल्यानंतर होम पेजवर SSC किंवा HSC रिझल्ट नावाचा पर्याय दिसेल.
  5. यापैकी तुम्हाला ज्या वर्गाचे रिझल्ट पाहायचे आहेत म्हणजे दहावी किंवा बारावी ते सिलेक्ट करायचे आहे.
  6. यानंतर तुम्हाला तुमचा वैयक्तिक तपशील म्हणजेच तुमचा सीट नंबर म्हणजेच आसन क्रमांक आणि तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे.
  7. यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे मग तुमचा रिझल्ट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    10th, 12th Exam Results 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!