११ वी प्रवेश- या वर्षीचा कटऑफ किती -जाणून घ्या .

11th Admission Cut Off 2020 Pune, Mumbai, Nashik, Nagpur – Cut Off List of 11th Admission 2020 – 2021 Details will be given here. This year’s increase in Cut off is expected. As per experts, there will be 3 to 5 % increased in Cut off For 11th Admission 2020 in Pune, Mumbai, Nashik, Nagpur. 

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

राज्य मंडळ असो किंवा सीबीएसई, आयसीएसई असो. दहावीच्या निकालात एकुणच वाढ झाल्याने अकरावी प्रवेशाचा टक्का आणि ‘कट-ऑफ’ देखील लक्षणीयरित्या वाढण्याची शक्‍यता आहे. यंदाच्या वर्षी अकरावी प्रवेशाचा कट-ऑफ तब्बल तीन ते पाच टक्‍क्‍यांनी वाढेल, असा अंदाज शिक्षणतज्ज्ञांनी वर्तविला आहे.

अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली असून, आता विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. तसेच, शहरातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या गेल्या वर्षीच्या कट-ऑफची यादी अकरावी प्रवेश नियंत्रण समितीतर्फे नुकतीच जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचा पसंतीक्रम काळजीपूर्वक भरावा, यासाठी ही यादी काही दिवस आधीच जाहीर करण्यात आली आहे. “यंदाच्या निकालाची एकूणच टक्केवारी पाहता कट-ऑफ देखील वाढण्याची शक्‍यता आहे. काही कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या मते कट ऑफ तीन ते पाच किंवा पाच ते सात टक्‍क्‍यांनी वाढेल. मात्र, अकरावी प्रवेशाचा कट-ऑफ सरासरी पाच टक्‍क्‍यांनी वाढण्याची शक्‍यता आहे, असे शिवाजीनगर मॉर्डन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी सांगितले.

‘कट-ऑफ’ वाढण्याची कारणे 

  • राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसईच्या दहावीच्या निकालाची वाढलेली टक्केवारी
  • 100 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ
  • 80 ते 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या
  • वाढलेल्या निकालामुळे प्रवेशात होणार वाढ

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाबरोबरच सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही तुलनेने जास्त आहे. यंदा या मंडळांच्या निकालाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे निदर्शनास येते. सीबीएसई दहावीचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत 0.36 टक्‍क्‍यांनी, तर राज्य मंडळाचा (एसएससी) निकाल मार्च 2019 च्या तुलनेत तब्बल 18.20 टक्‍क्‍यांनी जास्त आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाची संख्या वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

पुण्याकडे ओढा कायम राहणार

दहावीनंतर अकरावी आणि उच्च शिक्षणासाठी गावाहून आणि परराज्यातून शिक्षणासाठी विद्येच्या माहेरघरात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असते. जवळपास हजारो विद्यार्थी अकरावीपासूनच पुण्यात शिक्षणासाठी येतात. मात्र, यंदा कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांचा पुण्याकडे येण्याचा कल कायम राहणार, की त्यात बदल होणार याची उत्सुकता सध्या दिसत आहे. मात्र, असे असले तरीही पुण्यातील नामांकित महाविद्यालयात बाहेरगावाहून प्रवेशासाठी विचारपूस होत आहे. डॉ. शेठ म्हणाले, “कोरोनाचा संसर्ग वाढत असला, तरीही अकरावी प्रवेशावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. अकरावी प्रवेश प्रक्रियेनंतर कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाले तरीही, वर्ग हे निदान नोव्हेंबरपर्यंत तरीही ऑनलाईनच भरतील. त्यामुळे बाहेरगावहुन येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर फारसा परिणाम होणार नाही,”


11th Admission 2020

26th July 2020 Update: Students will be able to register online only from Sunday (26th) in the Pune Class XI online admission process. The facility of filling part-one in the admission form will be made available from August 1, said Dinkar Patil, Director, Secondary and Higher Secondary Education, through a circular.

पुणे इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रकियेत विद्यार्थ्यांना रविवारपासून (ता.२६) केवळ ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. तर प्रवेश अर्जातील भाग-एक भरण्याची सुविधा येत्या एक ऑगस्टपासून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी परिपत्रकद्वारे दिली आहे.

कोरोनामुळे मागील चार ते पाच महिन्यांपासून राज्यात टाळेबंद परिस्थिती असून शासकीय कार्यालये अद्याप पुर्ववत सूरू झालेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, जात पडताळणी प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट मिळविताना अडचणी येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांकडे ही प्रमाणपत्र नसल्याने दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही विद्यार्थी प्रमाणपत्राअभावी त्याच्या मूळ आरक्षणातून बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो प्रवेशापासून वंचित राहू शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच प्रवेश प्रक्रियेतील कागदपत्रांची अट शिथिल करावी, अशी मागणी काही संघटनांनी केली होती. संघटनेच्या मागणीनुसार कार्यवाही करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यावर येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यामुळे यापूर्वीच्या वेळापत्रकनुसार अर्जाचा भाग एक भरणे शक्य होणार नाही, म्हणून वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे. नव्या सुधारित वेळापत्रकानुसार रविवारपासून विद्यार्थ्यांना फक्त ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे, असे इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव आणि सहाय्यक शिक्षण संचालक मीना शेंडकर यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अर्जाचा भाग-२ (पसंतीक्रम) भरण्याबाबत आणि त्यापुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक राज्य मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल लागल्यानंतर घोषित करण्यात येणार आहे.

 कार्यवाहीचे टप्पे : कालावधी : कार्यवाही

– अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे. लॉगिन आयडी मिळविणे आणि पासवर्ड तयार करणे : २६ जुलै (सकाळी : ११ वाजल्यापासून) : विद्यार्थी स्वतः, पालकांच्या मदतीने
– १. प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर जाऊन मिळालेल्या लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून  लॉगिन करून अकरावी प्रवेशासाठी अर्ज (भाग-१) भरणे, शुल्क भरून फॉर्म लॉक करणे. २. अर्जातील माहीती शाळा/ मार्गदर्शन केंद्रावरुन प्रमाणित करून घेणे. (या कालावधीतही ऑनलाईन नोंदणी करणे सूरू राहिल) : १ ऑगस्टपासून सूरू : विद्यार्थी स्वतः, पालकांच्या मदतीने (शाळा/ मार्गदर्शन केंद्रांस फोन करून मदत घेता येईल
– विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती, भाग-१ ऑनलाईन तपासून प्रमाणित/ व्हेरिफाय करणे. (आवश्यकता असल्यास विद्यार्थ्यांशी फोनवरुन संपर्क साधणे) : १ ऑगस्टपासून : माध्यमिक शाळा/ मार्गदर्शन केंद्र

विद्यार्थी आणि पालकांना अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत पुरेशी माहिती नसल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांना सविस्तर माहिती देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी सुचना  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिली आहे.


11th Admission 2020: The school education department has made online admission forms available for practice from Thursday to reduce the mistakes of students in the eleventh admission form. Students will be able to practice on the online website till July 24, while the process of filling up the actual application will start from July 26.

FYJC Admission: ११ वी प्रवेश अर्ज मॉक डेमोला सुरुवात

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला दहावीच्या निकालानंतर प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. पण १६ जुलैपासून २४ जुलैपर्यंत अर्ज भरण्याचा सराव विद्यार्थ्यांना करता येणार आहे.

करावीच्या प्रवेश अर्जातील विद्यार्थ्याच्या चूका कमी करण्यासाठी आता शालेय शिक्षण विभागाने सरावासाठी आजपासूनच ऑनलाइन प्रवेशअर्ज उपलब्ध केला आहे. विद्यार्थ्यांना २४ जुलैपर्यंत सराव करता येईल, तर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया २६ जुलैपासून सुरू होणार आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या महापालिका क्षेत्रात ही प्रवेश प्रक्रिया आहे. अकरावीच्या https://mumbai.11thadmission.org.in या संकेतस्थळावर Mock.Demo.Registration या नावाने लिंक असणार आहे. ही लिंक ओपन करून विद्यार्थ्यांना सराव करता येणार आहे.

HSC निकालानंतर गुणपडताळणी अर्ज कसा कराल?

विद्यार्थ्यांच्या प्रवेशअर्जातील भाग-१मधील माहिती प्रमाणित करण्यासाठी शाळांनी गेल्या वर्षीचेच लॉग-इन आयडी व पासवर्ड वापरावेत. तसेच करोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत न बोलवता थेट कार्यवाही करण्याचेही आदेशही शिक्षण प्रवेश नियंत्रण समितीचे सचिव राजेंद्र अहिरे यांनी दिले आहेत.

अशी असेल प्रक्रिया

१. ऑनलाइन नोंदणी करणे, प्रवेशअर्ज भाग- १ भरणे व प्रवेशअर्जातील माहिती प्रमाणित करण्यासाठी शाळा / मार्गदर्शन केंद्र निवडणे आणि आपला प्रवेश अर्ज व्हेरीफाइड झाला आहे का, याची खात्री करणे.

२. विद्यार्थी प्रवेशअर्जातील माहिती, भाग- १ ऑनलाइन तपासणे. आवश्यकता असल्यास विद्यार्थ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला जाणार आहे. ही प्रक्रिया २७ जुलैपासून संबधित शाळा / मार्गदर्शन केंद्र करतील.

३. विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग- २ (प्रवेशासाठी पसंतीक्रम) नोंदविणे व सबमिट / लॉक करणे त्याचबरोबर नवीन अर्ज भाग १ भरता येणार आहे. ही प्रक्रिया दहावी राज्य मंडळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर होईल.


11th Admission 2020

 11th Admission 2020: The school education department has made online admission forms available for practice from Thursday to reduce the mistakes of students in the eleventh admission form. Students will be able to practice on the online website till July 24, while the process of filling up the actual application will start from July 26.

The eleventh online admission process has started for the coming academic year 2020-21. The admission process is in Mumbai, Pune, Nashik, Aurangabad, Amravati, and Nagpur Municipal Corporations. In the first phase, the process of registration of colleges is underway. In addition, students will now be given the opportunity to practice to fill out an application. There will be a link on the website https://mumbai.11thadmission.org.in under the name Mock.Demo.Registration. Students will be able to fill the practice form by opening this link

अकरावी प्रवेश अर्जातील विद्यार्थ्यांच्या चुका कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सरावासाठी गुरुवारपासून ऑनलाईन प्रवेश अर्ज उपलब्ध केला आहे. ऑनलाईन संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना 24 जुलैपर्यंत सराव करता येणार आहे, तर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया 26 जुलैपासून सुरू होणार आहे.

अकरावी प्रवेश: आजपासून सराव अर्ज

येणार्‍या 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या महापालिका क्षेत्रात ही प्रवेश प्रक्रिया आहे. पहिल्या टप्प्यात महाविद्यालयांची जागा नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर आता विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी सरावाची संधी दिली जाणार आहे. प्रवेशाच्या https://mumbai.11thadmission.org.in या संकेतस्थळावर Mock.Demo.Registration या नावाने लिंक असणार आहे. ही लिंक ओपन करून विद्यार्थ्यांना सराव अर्ज भरता येणार आहे.

सरावाचा अर्ज कायमचा नाही

मूळ अर्ज भरताना चुका होऊ नयेत, यासाठी आठ दिवसांच्या कालावधीसाठी संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी प्रारूप लॉगीन सुविधा देण्यात आली आहे. या सुविधेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याचा सराव करावा. प्रत्यक्षात अर्ज भरण्यास सुरुवात होण्यापूर्वी भरलेली माहिती नष्ट करून मूळ संकेतस्थळावर नव्याने अर्ज भरण्याची सुविधा 26 जुलैपासून असणार आहे याची नोंद विद्यार्थ्यांनी, पालकांनी घ्यावी.

मुख्याध्यापकांचीही जबाबदारी वाढली

मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व मंडळाच्या माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जातील भाग-1 मधील माहिती ऑनलाईन कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणित करावी तसेच विद्यार्थी / पालकांना योग्य ते मार्गदर्शन करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जातील भाग-1 मधील माहिती प्रमाणित करण्यासाठी शाळांनी गतवर्षीचेच लॉगीन आय.डी. व पासवर्ड वापरावेत. शाळास्तरावरून अर्ज अप्रूव्ह करण्याची कार्यवाहीसुद्धा ऑनलाईनच करावयाची आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांना शाळेत न बोलावता थेट कार्यवाही करण्याचेही आदेश शिक्षण प्रवेश नियंत्रण समितीचे सचिव राजेंद्र अहिरे यांनी दिले आहेत

असे असणार प्रवेशाचे टप्पे

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे, प्रवेश अर्ज भाग-1 भरणे व प्रवेश अर्जातील माहिती प्रमाणित करण्यासाठी शाळा / मार्गदर्शन केंद्र निवडणे आणि आपला प्रवेश अर्ज व्हेरीफाईड झाला आहे याची खात्री करणे. ही प्रक्रिया 26 जुलै, 2020 पासून सुरू होईल. चाचपणी विद्यार्थ्यांनी स्वतः व पालक/ शाळांच्या मदतीने करण्याची आहे.

विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती, भाग -1 ऑनलाईन तपासून व्हेरीफाय करणे. आवश्यकता असल्यास विद्यार्थ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला जाणार आहे. ही प्रक्रिया 27 जुलै, 2020 पासून संबंधित शाळा / मार्गदर्शन केंद्र करतील.

विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-2 (प्रवेशासाठी पसंतीक्रम) नोंदविणे व सबमिट / लॉक करणे त्याचबरोबर नवीन अर्ज भाग-1 सुद्धा भरता येणार आहे. ही प्रक्रिया दहावी राज्य मंडळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर जाहीर केली जाणार आहे. ही अर्ज प्रक्रिया विद्यार्थी स्वतः, पालक/ शाळांच्या मदतीने करावयाची आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Pawar Niranjan says

    Nice

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!