ऑनलाइन शिक्षणाचे व्यासपीठ होणार आता सहजपणे उपलब्ध! 

An Online Learning Platform Will Now be Readily Available

ऑनलाइन शिक्षणाचे व्यासपीठ होणार आता सहजपणे उपलब्ध!

In the Corona era, online education has gained unique general importance and now BSNL itself has stepped in to promote it. For this, BSNL has enlisted the help of IIT Bombay. BSNL on Friday announced the launch of the Drone Education initiative. BSNL clarified that the main objective behind this initiative is to make the online learning platform easily available to every student in the country and the state.

 मुंबई : कोरोनाकाळात आॅनलाईन शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले असून आता त्याच्या प्रसारासाठी बीएसएनएल स्वत: मैदानात उतरले आहे. यासाठी बीएसएनएलने आयआयटी बॉम्बेची मदत घेतली आहे. बीएसएनएलने शुक्रवारी ड्रोन शिक्षण (ड्रोन एज्युकेशन) या उपक्रमासाठी पुढाकार घेतला असून त्याची घोषणा केली आहे. देशातील आणि राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला आॅनलाईन शिक्षणाचे व्यासपीठ सहज उपलब्ध व्हावे हा या उपक्रमामागील मूळ उद्देश असल्याचे बीएसएनएलकडून स्पष्ट करण्यात आले

बीएसएनएलने या उपक्रमासाठी आयआयटी बॉम्बे आणि यप मास्टर्स याना भागीदारीसाठी निवडले आहे. तंत्रज्ञानातील साक्षरता, आरोग्य, पौष्टिक अन्न, विविध विषयांवरील सामान्य जनजागृती अशा विषयांवरील मजकूर आयआयटी बॉम्बेच्या स्पोकन टयुटोरिअलमधून उपलब्ध होऊ शकणार आहे. देशाच्या घटकांपर्यंत पोहचण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध नव्हते, ते आम्हाला बीएसएनएलच्या माध्यमातून उपलब्ध झाले असल्याची प्रतिक्रिया प्राध्यापिका कनन यांनी दिली.

शिक्षक, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था यांच्याकडून विविध आॅनलाईन लर्निंग प्लँटफॉर्म्सचा मोठया प्रमाणावर वापर होत आहे. प्लॅटफॉर्म्सपैकीच यप मास्टर्स एक आहे. या माध्यमातून, आॅनलाईन टेस्ट आणि त्यांची उत्तरे, शंका निरसनासाठी शिक्षकांसोबत लाईव्ह सेशन अशा सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती यप एज्युकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय रेड्डी यांनी दिली.

बीएसएनएल सध्यस्थितीत विविध तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या ग्राहकांसाठी नवीन उपक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहे. फायबर ब्रॉडबँड सेगमेंटमधून आम्ही खूप स्पर्धात्मक उपकरणे आणि नियोजन बाजारात आणले आहे ज्याचा डिजिटल उपयोग ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!