CBSE Exam 2021: सीबीएसई परीक्षांच्या तारखा जाहीर

CBSE Board Exam 2021

CBSE Exam 2021:: The date of the Central Board of Secondary Education’s 10th and 12th examinations.CBSE Board X and XII examinations will start from 4th May 2021 and will end by 10th June. The results of these examinations in time. He clarified that he will try to get the result by July 15.

CBSE Exam Dates: सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षा ४ मे पासून

सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षा ४ मे पासून सुरू होणार आहेत…

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ४ मे २०२१ पासून सुरू होणार आहेत आणि १० जून पर्यंत संपणार आहेत.

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारीपर्यंत होणार नाहीत, असे शिक्षणमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. पण त्या मार्च-एप्रिल महिन्यातही होऊ नयेत, अशी अनेक विद्यार्थ्यांची मागणी होती. विद्यार्थ्यांच्या या मागणीचा विचार करत बोर्डाने थेट मे महिन्यात परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षांचा निकाल वेळेत निकाल लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही पोखरियाल यांनी सांगितले. १५ जुलै पर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोखरियाल यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा केली. विद्यार्थ्यांना आता पुरेसा वेळ मिळाला असल्याने त्यांनी निश्चिंत मनाने आणि पूर्ण क्षमतेने परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केले. पूर्वी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात परीक्षा सुरू होऊन त्या मार्चपर्यंत संपायच्या. मात्र २०२० मध्ये करोना परिणामामुळे शैक्षणिक वर्ष विलंबाने सुरू झाले परिणामी परीक्षाही थोड्या विलंबाने होणार आहेत.

दरम्यान, देशाने नव्या शिक्षण धोरण २०२० ला उत्सवी रुपात स्वीकारले आहे, असेही पोखरियाल म्हणाले.


CBSE Board Exams 2021:: The date of the Central Board of Secondary Education’s 10th and 12th examinations will be announced on December 31. This information was given by Union Education Minister Ramesh Pokhriyal Nishank. Pokhriyal tweeted this information. He himself will announce the dates of the CBSE 10th and 12th examinations at 6 pm.

CBSE Board Exams 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखेची घोषणा ३१ डिसेंबर रोजी केली जाणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली.

पोखरियाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ते स्वत: सायंकाळी ६ वाजता सीबीएसई दहावी, बारावी परीक्षांच्या तारखांची घोषणा करणार आहेत. ही माहिती मिळताच काही विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्र्यांना आग्रह केला की परीक्षेसाठी त्यांना अजून काही कालावधीची गरज आहे. काही विद्यार्थ्यांनी परीक्षा एप्रिल-मेपर्यंत घेऊ नयेत अशीही मागणी केली आहे. काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की अद्याप त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही.

यापूर्वी शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी हे स्पष्ट केलं आहे की सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी २०२१ नंतरच आयोजित केल्या जाणार आहेत. दरम्यान, बोर्ड परीक्षांच्या तारखा अद्याप स्पष्ट झालेल्या नसल्याने अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी प्रिलिम परीक्षा आयोजित केल्या आहेत.


CBSE Exam 2021: परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

सीबीएसई दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे…

CBSE Board Exam 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) खासगीरित्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा २०२१ साठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज सादर केलेले नाहीत ते ९ डिसेंबरपर्यंत आपले अर्ज अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जाऊन भरू शकतात. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे, ते १० डिसेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत त्यांच्या अर्जात सुधारणा करू शकतात.

सीबीएसई बोर्डाने सांगितले, ‘खासगीरित्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची माहिती सादर करण्याची शेवटची तारीख झाल्यानंतर काही उमेदवारांनी डेटा दुरुस्त करण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. उमेदवारांनी केलेली मागणी लक्षात घेऊन खासगीरित्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी / दुरुस्ती करण्यासाठी लिंक पुन्हा एकदा अॅक्टिव्ह केली आहे.’

CBSE Board Exam 2021: पुढील पद्धतीने भरा अर्ज –
– प्रथम अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जा.
– यानंतर, खासगी विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई परीक्षा फॉर्म 2020 च्या लिंकवर क्लिक करा.
– आपल्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.
– येथे उमेदवारांना विचारलेली रोल नंबर आणि अन्य माहिती भरावी लागेल.
– फॉर्म भरून शुल्क भरा.
– भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट आऊट घेऊन ठेवा.


CBSE Board Exams 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच (Offline mode) होणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या परीक्षा ऑनलाइन होण्याची शक्यता नाही. बोर्डाने हेही स्पष्ट केल ेआहे की जे विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी पर्याय उपलब्ध केला जाईल.

सीबीएसई बोर्डाने एक निवेदन जारी केलं आहे. यात म्हटलंय की, ‘बोर्डाच्या परीक्षा जेव्हा होतील तेव्हा त्या लेखी आणि ऑफलाइन पद्धतीनेच होतील. ऑनलाइन पद्धतीने होणार नाहीत. कोविड प्रोटोकॉल पाळून परीक्षांचे आयोजन केले जाईल.’ मात्र परीक्षा नेमक्या कधी घेतल्या जातील, याबाबत बोर्डाने अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही. संबंधितांशी विचारविनिमयाची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याचे बोर्डाने सांगितले आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालय शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांशी १० डिसेंबर रोजी परीक्षांसंदर्भात संवाद साधणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

सीबीएसईच्या दहावी, बारावी परीक्षा सर्वसामान्य परिस्थितीत दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात घेतल्या जातात. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. आतापर्यंत विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. विविध विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा कशा होणार याबाबत शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषत: बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी अधिक चिंतेत आहेत, कारण त्यांना प्रात्यक्षिक परीक्षेसाठी ३० गुण असतात.

दरम्यान, बोर्डाने यापूर्वीच परिस्थिती लक्षात घेऊन ३० टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. मात्र, प्रात्यक्षिक परीक्षांसाठी कोणताही बदल नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. दिल्ली सरकारने आणखी अभ्यासक्रम कमी करण्याचीही मागणी केली होती. दुसरीकडे, बोर्डाने पेपर पॅटर्न बदलत विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा दिला आहे. एमसीक्यू प्रश्नांवर यंदा अधिक भर दिला जाणार आहे.

सोर्स: म. टा.


CBSE Board class 12th practical exam 2021: कोविड – १९ विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील शाळांचे शैक्षणिक सत्र विलंबाने सुरू झाले. बहुतांश शाळा आता बंद आहेत आणि वर्ग ऑनलाइन सुरू आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने ३० टक्क्यांपर्यंत अभ्यासक्रम कमी केला आहे. मात्र उपलब्ध शैक्षणिक साधनांमध्ये उर्वरित ७० टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे देखील विद्यार्थी-शिक्षकांसाठी कठीण जात आहे. याच दरम्यान बोर्डाने २०२१ मधील बोर्ड परीक्षांची तयारी सुरू केली आहे.

काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी २०२१ च्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याची शक्यता फेटाळून लावली होती. परीक्षा निश्चितपणे होणारच असे त्यांनी स्पष्ट केले होते. आता सीबीएसईमार्फत बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यासह स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरही (SOP) देखील तयार करण्यात आले आहे.

बोर्डाने सांगितलं आहे की बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा १ जानेवारी २०२१ ते ८ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान होणार आहे. मात्र तारखांवर अद्याप अंतिम निर्णय होणं शिल्लक आहे. यानंतर प्रॅक्टिकल परीक्षांचे अंतिम वेळापत्रकाचे अंतिम नोटिफिकेशन जारी केले जाईल.

कशा होणार प्रॅक्टिकल परीक्षा?

बोर्डाने यासंबंधातील एसओपी तयार केले आहे. यानुसार, शाळांना प्रॅक्टिकल परीक्षांसाठी बोर्डाद्वारे विविध तारखा पाठवण्यात येतील. त्या तारखांमध्ये शाळांनी या परीक्षा घेणे अपेक्षित आहे. बोर्डाकडून एक पर्यवेक्षक शाळांमध्ये परीक्षांच्या वेळी उपस्थित असेल.

दरम्यान, २०२१ च्या बोर्डाच्या परीक्षांची तयारी सुरू आहे. सर्व गोष्टी नियोजनानुसार घडल्या तर परीक्षा नियोजित वेळेतच होतील, असे बोर्डाने सांगितले आहे.


CBSE Board Exam 2020

CBSE Board Exam 2020 : CBSE Board Exams 2021: सीबीएसई बोर्डाची इयत्ता दहावी, बारावीची परीक्षा होणार की होणार नाही याविषयीच्या सर्व शंकाकुशंकांना बोर्डाने पूर्णविराम दिला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता दहावी, बारावीची बोर्ड परीक्षा आयोजित करणार आहे आणि लवकरच परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी ही माहिती दिली.

लवकरच सीबीएसईच्या संकेतस्थळावर cbse.nic.in वर याबाबतची सविस्तर माहिती अपडेट केली जाणार आहे. त्रिपाठी म्हणाले, ‘बोर्ड परीक्षा निश्चित स्वरुपात होणार आणि लवकरच कार्यक्रम घोषित केला जाणार. सीबीएसई यासंदर्भातील योजना बनवत आहे.’

‘मार्च-एप्रिल दरम्यान आम्ही आमची पुढील वाटचाल समोर ठेवली होती. आमच्या शाळा आणि शिक्षकांनी बदल स्विकारला. शैक्षणिक उद्दिष्टांसाठी नव्या तंत्रांचा वापर करण्याचे प्रशिक्षण घेतले. काही महिन्यातच ऑनलाइन वर्ग सुरु झाले. अॅप्स आले,’ असेही त्रिपाठी म्हणाले.

अंतिम तारखांचे स्वरुप स्पष्ट नाही

पुढील वर्षी सीबीएसई बोर्ड परीक्षा होणार हे नक्की असले तरी अद्याप अंतिम तारखा निश्चित झालेल्या नाहीत. परीक्षा कशा पद्धतीने होणार याबाबतची देखील कोणतीही माहिती वा घोषणा करण्यात आलेली नाही. सर्वसाधारणपणे बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवार आणि मार्च महिन्यात आयोजित केल्या जातात.

आतापर्यंत गुजरात आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांनी कोविड -१९ महामारी आणि त्यामुळे झालेलं चालू शैक्षणिक वर्षाचं नुकसान लक्षात घेऊन दहावी, बारावी बोर्ड परीक्षा मे महिन्यापर्यंत पु्ढे ढकलल्या आहेत. चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे करोना महामारीमुळे खूप नुकसान झाले आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे, काही शाळांनी तेही विलंबाने सुरू केले. दहावी, बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू होण्याबाबतही समानता नाही. काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत तर काही ठिकाणी बंद आहेत. परिणामी या दोन राज्यांनी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

सोर्स : म. टा.


CBSE 12th Class Improvement Exam 2020:

सीबीएसई बारावीची श्रेणीसुधार परीक्षा सप्टेंबरमध्ये

CBSE 12th Class Improvement Exam 2020: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईची इयत्ता बारावीची श्रेणीसुधार परीक्षी सप्टेंबर महिन्यात होणार आहे. सीबीएसई बोर्डाने ही माहिती दिली. ही परीक्षा कोविड – १९ महामारीमुळे रद्द झाली होती. गेल्या महिन्यात तिचा निकाल जाहीर झाला आहे. दरम्यान, सीबीएसई दहावी, बारावीच्या फेरपरीक्षादेखील सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.

ऑनलाइन शिक्षणाचे व्यासपीठ होणार आता सहजपणे उपलब्ध! 

‘ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बारावीच्या गुणांमध्ये किंवा श्रेणीमध्ये सुधारणा करायची आहे त्यांच्यासाठी सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऐच्छिक आहे. यासोबतच दहावी आणि बारावीची कम्पार्टमेंट परीक्षा (फेरपरीक्षा) देखील सप्टेंबरमध्ये होणार आहे. परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर होतील,’ असे सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक सन्यम भारद्वाज म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना जे गुण मिळतील ते अंतिम असतील. नियमित विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळांमार्फत अर्ज करायचे आहेत, तर खासगीरित्या परीक्षा देणारे विद्यार्थी थेट बोर्डाच्या संकेतस्थळावरील लिंकवरून अर्ज करू शकतील. २२ ऑगस्टपर्यंत ही अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे.’

विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वर्षाच्या कालावधीतल्या सिलॅबसमधील प्रश्न येतील. विद्यार्थ्यांनी पात्रता निकष, उत्तीर्णतेचे निकष, अभ्यासक्रम आणि योजनेची संपूर्ण माहिती घेऊन मगच परीक्षेसाठी अर्ज करावा असेही भारद्वाज यांनी सांगितले.
यावर्षी सीबीएसई बारावीत विद्यार्थिनींचे उत्तीर्णतेचे प्रमाण विद्यार्थ्यांच्या तुलनेत सुमारे सहा टक्के अधिक आहे. निकालाची एकूण टक्केवारी ५.३८ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्यावर्षीचा बारावीचा निकाल ८३.४० टक्के होता तर यावर्षी तो ८८.७८ टक्के आहे.

CBSE Compartment Exam 2020

CBSE Compartment Exam 2020: The Central Board of Secondary Education has conducted the compartment examination (re-examination) of Class X and XII. The link to fill the application for this exam has been started. Students who have failed in one or more subjects and their X or XII results have been declared as compartments, can apply online for this exam. Candidates will be able to apply online for compartment examination till 5 pm on August 20.

सीबीएसई दहावी, बारावी कंपार्टमेंट परीक्षा सप्टेंबरमध्ये

CBSE Compartment Exam 2020: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या कंपार्टमेंट परीक्षेचे (फेरपरीक्षा) आयोजन केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची लिंक सुरु करण्यात आली आहे. जे विद्यार्थी एक किंवा अधिक विषयांत अनुत्तीर्ण झाले आहेत आणि त्यांचा दहावी किंवा बारावीचा निकाल कंपार्टमेंट म्हणून जाहीर करण्यात आला आहे, असे विद्यार्थी या परीक्षेसाठी ऑलाइन अर्ज करू शकतात. उमेदवार कंपार्टमेंट परीक्षेसाठी २० ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.

दहावी, बारावी उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

सीबीएसईने आपल्या निवेदनात म्हटले आहे की ‘कंपार्टमेंट परीक्षा सप्टेंबर महिन्यात आयोजित केली जाईल. परीक्षेची तारीख लवकरच घोषित केली जाईल.’ नियमित विद्यार्थी आपल्या शाळेच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. मात्र, खासगी स्तरावर उमेदवार सीबीएसईचे अधिकृत संकेतस्थळ www.cbse.nic.in वर जाऊन थेट अर्ज करू शकतात. सीबीएसई कंपार्टमेंट परीक्षेसाठी अर्ज तेव्हाच स्वीकारले जातील जेव्हा विद्यार्थी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेच्या आधी अर्जाचे शुल्क जमा करतील. परीक्षा अर्ज, परीक्षा शुल्क आदी अर्जाशी संबंधित सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

यावर्षी सीबीएसई बारावीत ८७,६५१ विद्यार्थ्यांना कंपार्टमेंटसाठी पात्र हा शेरा मिळालेला आहे. यावर्षी बारावीचा निकाल ८८.७८ टक्के लागला होता. दहावीचे १,५०,१९८ विद्यार्थी कंपार्टमेंटसाठी पात्र आहेत. बोर्डाने दहावीचा निकाल १५ जुलै रोजी जारी केला होता. दहावीचा निकाल यंदा ९१.४६ टक्के लागला होता.

दरम्यान, देशभरातून एकूण सुमारे ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सीबीएसई फेरपरीक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून सीबीएसईच्या फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयाची दखल घेऊन (स्यू मोटो) सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. कोविड – १९ महामारी काळात परीक्षा घेण्याचा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय विद्यार्थी हिताचा नाही, असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!