CTET 2021-CTET 2021 ऑनलाइन परीक्षा होणार;एक्झाम पॅटर्नमध्येही बदल

CTET Exam 2021

The Central Board of Secondary Education (CBSE) issued an official notice. As per the information given by CBSE, the examination pattern of CITAT 2021 will be different. Also this exam will not be done through offline.

CTET 2021: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) मध्ये महत्वाचे बदल होत आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE)ने अधिकृत नोटीस जाहीर करुन याबद्दल माहिती दिली. सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार सीटेट २०२१ चा परीक्षा पॅटर्न वेगळा असणार आहे. तसेच ही परीक्षा ऑफलाइन माध्यमातून होणार नाही.

सीबीएसई सीटीईटीमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (NEP 2020) अंतर्गत बदल केले जात आहेत. घोकंपट्टीचे शिक्षण बंद व्हावे यासाठी एनईपीमध्ये महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट (सीटीईटी) चा अभ्यासक्रम (CTET Syllabus 2021)आणि परीक्षा पॅटर्न (CTET Question Pattern) मध्ये बदल केले जात आहेत.
आता सीटीईटी अभ्यासक्रम आणि प्रश्न हे उमेदवारांच्या तथ्यात्मक ज्ञानाऐवजी थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, रिजनिंग, संकल्पनेची समज आणि अॅप्लीकेशनच्या अभ्यासावर पारखले जातील. उमेदवारांना नवा सीटेट पॅटर्न समाजावा यासाठी सीबीएसईतर्फे नवे सॅंम्पल पेपर्स आणि ब्लूप्रिंट जाहीर केली जाणार आहे.

ऑनलाइन परीक्षा (CTET Online Exam)

सीटेट परीक्षा आयोजनात महत्वाचा बदल करण्यात आला आहे. डिसेंबर २०२१/ जानेवारी २०२२ मध्ये होणारी सीटीईटी परीक्षा ऑनलाइन माध्यमातून घेतली जाणार असल्याचे सीबीएसईकडून सांगण्यात आले आहे. यातून येणारे शिक्षक हे कॉम्प्युटर आणि इंटरनेट फ्रेंडली देखील होतील. तसेच ओएमआर शीट्स आणि प्रिंटेड प्रश्न पत्रिकांमुळे मोठ्या प्रमाणात होणारा कागदाचा वापर टाळला जाऊ शकेल.

पुढच्या सीटेट परीक्षा २०२१ साठी अर्ज भरल्यानंतर वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. वेळापत्रक अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाहीर केला जाणार आहे.


CTET Registration 2021

The application process for the CTET July 2021 examination conducted by the Central Board of Education (CBSE) is awaited. The notification was issued in June. But it is expected to be released by the end of this month.

केंद्रीय शिक्षण बोर्डातर्फे (CBSE) आयोजित केल्या जाणाऱ्या CTET july 2021 परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेची वाट पाहिली जात आहे. जून महिन्यात यासंदर्भातील नोटिफिकेशन जाहीर होते. पण या महिन्याच्या अखेरपर्यंत ते जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

TET Exam-‘तयारीला लागा ! येत्या सप्टेंबर मध्ये टीईटी होणार

CTET 2021 Registration: CTET 2021साठी नोंदणी प्रक्रियेची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्रीय शिक्षण बोर्ड (CBSE) लवकरच CTET July 2021 साठी नोटिफिकेशन जाहीर करण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत नोटिफिकेशन जाहीर होऊ शकते असे म्हटले जात आहे. यासंदर्भात कोणती अधिकृत माहिती देण्यात आली नाही. या परीक्षेसाठी अर्ज करु इच्छिणारे उमेदवार (CTET 2021 Registration)अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन अर्ज करु शकतात.

सीटीईटी 2021 पात्रता- Eligibility Criteria

 • सीटीईटी परीक्षेच्या आधी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी पदवी आणि बीएड किंवा अन्य मान्यताप्राप्त पदवी प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करू शकतील.
 • विविध स्तरांवरील अध्यापनानुसार सीटीईटीचे पेपर नियोजित असतात, त्यामुळे पात्रताही वेगवेगळी असते. अधिक माहितीसाठी उमेदवार सीटीईटी परीक्षा पोर्टल, ctet.nic.in ला भेट देऊ शकतात.

सीटीईटी 2021 अर्ज प्रक्रिया- How to Apply For CTET 

 • गेल्या काही वर्षांप्रमाणे, यावर्षी देखील सीटीईटी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असणार आहे. उमेदवार परीक्षा पोर्टल, ctet.nic.in वर उपलब्ध केल्या जाणाऱ्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत.
 • अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि यानंतर उमेदवार लॉगइन करून CTET 2021 अॅप्लिकेशन सबमिट करू शकणार आहेत.

There may be some good news coming soon for the candidates awaiting notification. The application process for CTET may start from this month. Candidates can apply online by visiting the official website ctet.nic.in after the application process starts. CTET 2021 application start date has not been officially announced by the board. Candidates should therefore check the CTET portal ctet.nic.in from time to time for updated information on the launch of CTET Application 2021.

सीटीईटीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच होणार सुरु

 सीटीईटीच्या (CTET) (Central Teaching Eligibility Test) नोटिफिकेशनची प्रतीक्षा करत असलेल्या उमेदवारांसाठी लवकरच एक चांगली बातमी येऊ शकेल. सीटीईटीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया या महिन्यापासून सुरू होऊ शकते. अर्जाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतील. सीटीईटी 2021 अर्ज प्रारंभ तारीख अधिकृतपणे मंडळाने जाहीर केलेली नाही. म्हणून उमेदवारांनी सीटीईटी ऍप्लिकेशन 2021 सुरू होण्याबाबत अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी सीटीईटी पोर्टल ctet.nic.in तपासावे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार ४३५ जागा रिक्त

ज्या उमेदवारांना सीटीईटी परीक्षेत भाग घ्यायचा असेल त्यांनी वरिष्ठ माध्यमिक किंवा पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, उमेदवारांनी किमान दोन वर्षांचा शैक्षणिक अभ्यासक्रम (बीएड, डीएएलड, बीटीसी आदी) पूर्ण केलेला असावा. टीचिंग पेपरनुसार सीटीईटी परीक्षेत अध्यापनाचे वेगवेगळे स्तर आहेत आणि उमेदवारांना केवळ त्यांच्या इच्छित वर्गासाठी अध्यापनाच्या विहित पेपरमध्ये हजर राहावे लागेल. सीटीईटी परीक्षा पोर्टल ctet.nic.in वर जाहीर होणाऱ्या सीटीईटी 2021 च्या अधिसूचनेमधून पेपर्सची व विहित शैक्षणिक पात्रतेबद्दलची संपूर्ण माहिती उमेदवारांना मिळू शकेल.

TET Exam-‘तयारीला लागा ! येत्या सप्टेंबर मध्ये टीईटी होणार

शिक्षण विभागात राज्यात ६५ टक्क्यांहून अधिक पदे रिक्त

नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन (एनसीटीई) (National Council of Teacher Education) ने नुकतीच 21 जून 2021 रोजी एक महत्त्वाची घोषणा केली आहे, की सीटीईटी प्रमाणपत्राची वैधता आयुष्यभर राहील. पूर्वी सीटीईटी प्रमाणपत्राची वैधता सात वर्षे होती. अशा परिस्थितीत असे मानले जाते, की सीटीईटी 2021 साठी अर्जांची संख्या कमी असेल.

सीटीईटी पेपर नमुना आणि अभ्यासक्रम (पेपर -1)

 • बाल विकास आणि शिक्षणशास्त्र – 30 प्रश्न
 • भाषा -1 (अनिवार्य) – 30 प्रश्न
 • भाषा -2 (अनिवार्य) – 30 प्रश्न
 • गणित – 30 प्रश्न
 • पर्यावरणीय अभ्यास – 30 प्रश्न

सीटीईटी पेपर नमुना आणि अभ्यासक्रम (पेपर – 2)

 • बाल विकास आणि शिक्षणशास्त्र – 30 प्रश्न
 • भाषा – 1 (अनिवार्य) – 30 प्रश्न
 • भाषा -2 (अनिवार्य) – 30 प्रश्न
 • गणित आणि विज्ञान किंवा सामाजिक विज्ञान – 60 प्रश्न
 • एकूण प्रश्न : 150
 • एकूण गुण : 150

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!