TET Certificate -राज्यातील 40 हजार TET उत्तीर्णांना आता नवीन प्रमाणपत्र

TET Certificates

The Union Ministry of Education has extended the validity of the Teacher Eligibility Test (TET) for more than 7 years and made it valid for the life of the teacher. Candidates after 2015 do not need to issue a new certificate. Since the validity period is mentioned on the TET certificate of 2013 and 2014, those candidates will have to issue a new certificate.

राज्यातील 40 हजार TET उत्तीर्णांना आता नवीन प्रमाणपत्र

राज्यात 2015 नंतर TET  उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्रांवर सात वर्षांच्या वैधतेचा उल्लेख नाही. त्यामुळे 2015 नंतरच्या उमेदवारांना नवीन प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. तर 2013 आणि 2014 च्या TET प्रमाणपत्रावर वैधतेचा कालावधी नमूद केलेला असल्याने त्या उमेदवारांना नवीन प्रमाणपत्र द्यावे लागेल.

त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेला राज्यातील 40 हजार 667 उमेदवारांना आता नवीन TET उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. TET उत्तीर्ण प्रमाणपत्राची वैधता आजीवन करण्यात आल्याने आता मुदत संपलेल्या उमेदवारांना नवीन प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक टी प्रक्रिया राबवली जाईल.

TET Certificate Validity

TET Certificate Validity- There is good news for candidates who want to become government teachers. Union Education Minister Ramesh Pokhriyal Nishank has made a big announcement to give relief to teachers. The Union Ministry of Education has extended the validity of the Teacher Eligibility Test (TET) for more than 7 years and made it valid for the life of the teacher.

– पवित्र पोर्टलद्वारे होणारी शिक्षक भरती अखेर सुरु!!

 केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी शिक्षकांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टेट प्रमाणपत्राची वैधता 7 वर्षांहून वाढवत त्या शिक्षकाच्या आयुष्यभरासाठी वैध ठरवली आहे. पोखरियाल यांनी शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमदेवारांसाठी आणि सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षकांसाठी महत्वाचा निर्णय असल्याचं म्हटलं आहे.

Shikshak Bharti-शिक्षण विभागात प्राचार्यांची पदे रिक्त

शिक्षक पात्रता परीक्षा 2011 पासून अनिवार्य

केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं 2011 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी उत्तीर्ण झालेल्या परीक्षेच्या प्रमाणपत्राची वैधता 7 वर्ष ठरवण्यात आली होती.

नव्यानं टीईटी प्रमाणपत्र देण्यात येणार

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियान निशंक यांनी केंद्रशासित प्रदेश आणि राज्य सरकार ज्यांच्या टीईटी प्रमाणपत्रांची सात वर्षांची मुदत संपली आहे ती नव्यानं जारी करतील, असं सांगितलं. 2011 नंतर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणं शिक्षक व्हायचं असेल तर आवश्यक करण्यात आलं होतं.


Maha TET 2021

Maha TET 2021: The certificates of 31,000 candidates in the state who have passed the Maharashtra Teacher Eligibility Test (TET) will expire in 2021. This certificate is valid for seven years. As it is clearly stated on the certificate, there will be a difficulties of these certificate holders.

राज्यात ३१ हजार टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची प्रमाणपत्रे मुदतबाह्य

सन २०१३ मध्ये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण झालेल्या राज्यातील ३१ हजार उमेदवारांची प्रमाणपत्रे २०२१मध्ये मुदतबाह्य होणार आहेत. या प्रमाणपत्राची वैधता सात वर्षे असते. प्रमाणपत्रावर तसे स्पष्ट नमूद करण्यात आले असल्याने या प्रमाणपत्रधारकांची पंचाईत होणार आहे.

गत सात वर्षांपासून विविध विषयांतील पदवीधर युवक शिक्षण शास्त्रातील पदवी, पदविका व टीईटी उत्तीर्ण परीक्षेचे प्रमाणपत्र घेऊन प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये नोकरी मिळण्याचे आशेवर वणवण भटकत आहेत. मात्र, अद्यापही नोकरी मिळाली नाहीच. दिवसेंदिवस अनुदानित शाळांतील घटत्या पटसंख्येमुळे संचमान्यतेत शिक्षक संख्या कमी होत आहे. शिक्षक अतिरिक्त होत आहे. अद्याप अतिरिक्त शिक्षकांचा तिढाही कायम आहे. अशातच या ३१ हजार शिक्षकांची टीईटी परीक्षा प्रमाणपत्रे मुदतबाह्य झाल्यामुळे त्यांच्या समोर भवितव्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

शासकीय अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया गत दहा वर्षांत विविध कारणांनी रखडली आहे. मेहनत आणि चिकाटीने अभ्यास करून २०१३ मध्ये ३१ हजार ७२ विद्यार्थी टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले. मात्र, त्यांना अद्याप नोकऱ्या नाहीत. बेरोजगार असणाऱ्या या शिक्षकांची टीईटी प्रमाणपत्र अवैध होणार असून २०२१ पासून पुढील शिक्षक भरतीसाठी हे उमेदवार अपात्र ठरणार आहेत. अशा उमेदवारांना आपले प्रमाणपत्र पुन्हा मिळविण्यासाठी पुन्हा टीईटी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. ज्यात दहा लाखांहून अधिक बीएड, डीएडधारक बेरोजगार आहेत. दहा वर्षांपासून शिक्षक भरती रखडली आहे. आता कुठे शिक्षक भरती सुरू होणार तशात या ३१ हजार उमेदवारांची टीईटी प्रमाणपत्र कालबाह्य होणार असल्याने त्यांचेवर संकट ओढवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!