FYJC CET Syllabus -अकरावी सीईटीसाठी अभ्यासक्रम कोणता?

FYJC CET Syllabus -अकरावी सीईटीसाठी अभ्यासक्रम कोणता?

The syllabus of the entrance exams for the first time this year for the 11th admission will be announced in the next two days, said a senior official in the education department. The date and timetable of the examination is also likely to be announced along with the syllabus and students will be given ample time to prepare for the examination

बारावी सीईटीसंदर्भात महत्वाची माहिती- जाणून घ्या !

FYJC CET Syllabus Update: अकरावी प्रवेशांसाठी यंदा प्रथमच घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम पुढील दोन दिवसांमध्ये जाहीर केला जाईल, अशी माहिती शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली आहे. अभ्यासक्रमासह परीक्षेची तारीख आणि वेळापत्रकही जाहीर होण्याची शक्यता असून, विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल, असेही सूतोवाच शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहेत.

दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. याबरोबरच अकरावी प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. दहावीच्या अभ्यासक्रमावर ही परीक्षा आधारित असली तरी परीक्षेसाठी विशेष अभ्यासक्रम निश्चित करण्यात येणार असून, येत्या दोन दिवसांमध्ये तो जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. प्रवेश परीक्षा शंभर गुणांची असेल, हे यापूर्वी शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. पण कोणकोणत्या विषयांवर आधारित प्रश्न असतील, याबाबत अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!