अखेर गडचिरोली जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाला मिळाली मान्यता – Gadchiroli Medical College

Gadchiroli Medical College

Gadchiroli Medical College: The much awaited medical college in Gadchiroli district has finally got the government’s approval. This will help to solve the health problems of the district along with the realization of the dream of becoming a doctor of the promising students of the district. The state cabinet meeting on Wednesday (28th) gave approval to start new government medical colleges and hospitals with 430 beds attached to them in 9 districts of the state including Gadchiroli. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

अखेर गडचिरोली जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाला मिळाली मान्यता

गडचिरोली जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित वैद्यकीय महाविद्यालयाला अखेर सरकारची मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार होण्यासह जिल्ह्यातील आरोग्य समस्या सोडविण्यास मदत होणार आहे. गडचिरोलीसह राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांना संलग्न ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवार (ता. २८) मान्यता देण्यात आली.

  1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. पालघर, ठाणे (अंबरनाथ), जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसणाऱ्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल.
  2. अमरावती आणि वर्धा येथील महाविद्यालयासाठी जागा कालातंराने निश्चित करण्यात येईल, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सध्या २४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये असून त्यांची एकूण प्रवेश क्षमता ३ हजार ७५० विद्यार्थी इतकी आहे.
  3. महाराष्ट्रात प्रति एक हजार लोकसंख्येमागे ०.७४ इतके डॉक्टरांचे प्रमाण आहे, तर देश पातळीवर हे प्रमाण ०.९० इतके आहे. या नऊ महाविद्यालयांसाठी ४ हजार ३६५ कोटी ७२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
  4. नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या निर्मितीसाठी आशियाई विकास बँक तसेच जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी अशा आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून वित्त विभागाच्या सहमतीने अल्प व्याजदरात अर्थसाहाय्य उपलब्ध करून घेण्यासदेखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
  5. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात एम्सची संख्या ७ वरून २२ झाली आहे. शिवाय वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ३८७ वरुन ६५४ एवढी झाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमधून एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५१ हजारांवरुन १ लाखावर पोहचली आहे.
  6. महाराष्ट्रात २०१४ पर्यंत केवळ १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये होती. मागील ९ वर्षांत ही संख्या २४ झाली आहे.
  7. आता पुन्हा ९ नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आल्याने सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
  8. मागील अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी जिल्हावासी करत होते. मुख्यमंत्री पदाची धुरा स्वीकारताच आपल्या पहिल्याच गडचिरोली जिल्हा दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीची घोषणा केली होती.
  9. आरोग्य सुविधांचा अभाव असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आजही अशी अनेक दुर्गम, अतिदुर्गम गाव आहेत जिथे रुग्णवाहिका पोहचत नाही. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णाला खाटेची कावड करून लांब अंतरावरच्या रुग्णालायत नेण्यात येते.
  10. म्हणून येथे वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी सातत्याने करण्यात येत होती. आता वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाली असली, तरी मूर्तरूप कधी मिळेल हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.
  11. आगामी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून तर हा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला नाही ना, असाही प्रश्न विचारला जात आहे.
  12. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली आहे. पण हा रेल्वेमार्ग अद्याप पूर्ण झाला नाही. म्हणून या वैद्यकीय महाविद्यालयाचे रेल्वेसारखे करू नका, असे जिल्हावासी म्हणत आहेत.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!