GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

IIT Bombay Scraps Exams for All Students

आयआयटी मुंबईने रद्द केल्या परीक्षा; लॉकडाऊनमुळे निर्णय

IIT Mumbai canceled exams

The Indian Institute of Technology, Mumbai has decided to cancel the examinations of all students this year. The country is in a lockdown situation due to infection with the Kovid-19 virus. In Maharashtra, Mumbai is the district most affected by the corona infection. The lockdown period has been extended for the third time. Against this backdrop, IIT Mumbai has taken this decision.
आयआयटी मुंबईने पहिल्यांदाच परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांच्या मागील वर्षभराच्या कामगिरीवरून त्यांचं मूल्यमापन केलं जाणार आहे, अशी माहिती एका प्राध्यापकांनी दिली. यासंदर्भात मागील आठवड्यात आयआयटी मुंबईची एक अंतर्गत बैठक झाली होती.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईने यावर्षी सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड-१९ विषाणूच्या संक्रमणामुळे देशात लॉकडाऊन स्थिती आहे. महाराष्ट्रात मुंबई हा करोना संक्रमणामुळे मोठ्या प्रमाणावर बाधित झालेला जिल्हा आहे. लॉकडाऊन मुदत तिसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईने हा निर्णय घेतला आहे.

आयआयटी मुंबईने पहिल्यांदाच अशा प्रकारे परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांच्या मागील वर्षभराच्या कामगिरीवरून त्यांचं मूल्यमापन केलं जाणार आहे, अशी माहिती एका प्राध्यापकांनी दिली. यासंदर्भात मागील आठवड्यात आयआयटी मुंबईची एक अंतर्गत बैठक झाली होती.

दरम्यान, आयआयटी रुरकी, आयआयटी खरगपूर आणि आयआयटी गांधीनगरने विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आयआयटी मुंबईचा ऑनलाइन परीक्षा घेण्याचा विचार नाही. खराब इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे परीक्षांवर परिणाम होऊ शकतो, असा विचार पुढे आल्याने ऑनलाइन परीक्षा घेण्याचा विचार बाजूला ठेवण्यात आल्याचं प्राध्यापकांनी ईटी ब्युरोला सांगितलं.

आयआयटी रोपारने केवळ अंतिम वर्षातल्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. खरगपूर, रुरकी आणि कानपूक आयआयटी देखील लॉकडाऊन आणखी वाढल्यास विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या तयारीत आहे. पहिल्या लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर देशातील सर्व IIT मधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा जूनअखेर किंवा जुलैच्या सुरूवातीच्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

आयआयटी दिल्लीचे डीन शंतनू रॉय म्हणाले, ‘सुमारे २० टक्के विद्यार्थ्यांकडे इंटरनेट अॅक्सेस नसताना ऑनलाइन परीक्षा घेणे न्याय्य होणार नाही.’

आयआयटी रोपारचे संचालक सरित के. दास म्हणाले, ‘आमची संस्था विविध पर्यायांची पडताळणी करतआहे. परदेशात अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी ‘टेक होम एक्झाम’ ही परीक्षा पद्धती अवलंबली आहे. यात विद्यार्थ्याला एक समस्या सोडवण्यासाठी ४८ तास दिले जातात. या समस्येवर बहुपर्यायी उपाय असतात. हा एक डिझाइन प्रॉब्लेम असतो, जो विद्यार्थी कोणत्याही मदतीशिवाय सोडवू शकतो.’

सौर्स : मटा

Leave A Reply

Your email address will not be published.