Indian Army Agniveer Result -अग्निवीर भरती प्रकियेचा निकाल जाहीर
Indian Army Agniveer Result 2022
Indian Army Agniveer Result 2022: Indian Army has declared the results of Aginiveer Recruitment Job Fair. The results of the candidates passed in the ‘Agniveer Recruitment’ meeting held at Mahatma Phule Krishi Vidyapeeth Rahuri in Ahemednagar district for Agniveer recruitment under Agneepath Scheme in the Indian Army has been published on the website. Eligible Applicants should present for documents verification on 26th November 2022.
भारतीय लष्करामध्ये अग्नीपथ योजनेंतर्गत अग्नीवीर भरतीसाठी नगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पार पडलेल्या ‘अग्नीवीर भरती’ मेळाव्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवारांनी पुणे क्षेत्रीय भरती कार्यालयात २६ नोव्हेंबरपर्यंत हजर होऊन कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अग्नीवीर जनरल ड्युटी, अग्नीवीर टेक्निकल, अग्नीवीर क्लर्क, स्टोअरकीपर आणि अग्नीवीर ट्रेड्समन या पदांसाठी २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडली. या भरती मेळाव्यामध्ये पुण्यासह नगर, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांनी सहभाग घेतला होता, अशी माहिती भरती क्षेत्रीय कार्यालय पुणेचे संचालक मनिष कर्की यांनी दिली.
संकेतस्थळ – https://joinindianarmy.nic.in
Army ????