JAM 2021:परीक्षेतून देशभरातील आयआयटीमध्ये मिळेल प्रवेश
JAM 2021
JAM 2021
The Indian Institute of Science Bangalore (IISc) is announcing its first admission list on June 16, 2021. Candidates registered for JAM 2021 can check the list by visiting the official website jam.iisc.ac.in. The second list will be announced on July 1 and the third list on July 16. Also, the admission process will be completed by the organization on July 20, 2021.
JAM 2021 : इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरु (Indian Institute of Science Bangalore, IISc)ची पहिली प्रवेश यादी १६ जून २०२१ ला जाहीर करण्यात येत आहे. ज्या उमेदवारांनी यासाठी नोंदणी केली आहे ते अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले नाव तपासू शकतात.
दुसरी यादी १ जुलै आणि तिसरी यादी १६ जुलैला जाहीर केली जाणार आहे. तसेच संस्थेतर्फे २० जुलै २०२१ ला प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. पहिल्या यादीची घोषणा झाल्यानंतर उमेदवारांना यादी पाठविली जाईल. यानंतर उमेदवारांना जागा निश्चितीसाठी सामान्य / ओबीसी-एनसीएल / ईडब्ल्यूएस वर्गासाठी १० हजार रुपये द्यावे लागतील. तर अनुसूचित जाती जमाती/ पीडब्ल्यूडी वर्गाच्या उमेदवारांना ५ हजार रुपये भरावे लागतील.
या परीक्षेच्या माध्यमातून देशभरातील आयआयटीमध्ये दोन वर्षे एमएससी, ज्वॉइंट एमएससी-पीएचडी, एमएससी-पीएचडी ड्युअल डिग्री आणि इतर मास्टर कोर्सेससाठी प्रवेश मिळू शकतो. याव्यतिरिक्त, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स इंटिग्रेटेड पीएचडी पाठ्यक्रमात देखील प्रवेश दिला जातो. या परीक्षेसंदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.
अधिकृत वेबसाईट – jam.iisc.ac.in