अंगणवाड्यांना मिळणार उच्चशिक्षित कर्मचारी; BEd, DEd चा समावेश! Kolhapur Anganwadi Bharti 2023
Kolhapur Anganwadi Recruitment 2023
Anganwadi Kolhapur Bharti 2023: Recruitment process is going on for the vacant posts of four Anganwadi workers and 24 helpers in Gadhinglaj taluka. The recruitment process is going on for the vacant posts of Anganwadi maids and helpers. Although there is a condition of passing 12th, applications from women who have D.Ed, B.Ed, M.Sc, B.Com, BA have come for these posts. Read More details are given below.
मे महिनापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविकांची भरती; पगारात 20% वाढ-
अंगणवाडींच्या रिक्त सेविका व मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. बारावी उत्तीर्णची अट असली तरी या पदांसाठी डीएड, बीएड, एमएस्सी, बीकॉम, बीए झालेल्या महिलांचे अर्ज आले आहेत. निवड प्रक्रिया अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या आधारे गुणवत्तेनुसार होणार असल्याने अंगणवाड्यांना उच्चशिक्षित कर्मचारी मिळणार, हे स्पष्ट होत आहे.
Kolhapur Anganwadi Sevika Bharti 2023
- शालेय जीवनाची सुरुवात अंगणवाडीपासूनच होते. बालकांना शाळेची सवय, अंक-अक्षर ओळख इथेच होते. पूर्वी या विभागाकडे शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने फारसे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. पण, विद्यार्थी-पालकांचा इंग्रजी शाळांकडे ओढा वाढू लागल्याचा फटका प्राथमिक शाळांना बसू लागला. इंग्रजी शाळा अंगणवाडी स्तरावरूनच विद्यार्थ्यांना आपल्याकडे खेचू लागल्या. त्यामुळे धोरणात बदल करण्यात आला. अलीकडे महिला बालविकास विभाग व शिक्षण विभाग हातात हात घालून काम करू लागले आहेत. त्यामुळे अंगणवाडी स्तरावरही शिक्षणाचे महत्त्व वाढले आहे.
- अंगणवाडींच्या रिक्त पदांसाठी शासनाने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पूर्वी सेविकेसाठी दहावी तर मदतनीससाठी सातवी उत्तीर्णची अट होती. मात्र, अलीकडे ऑनलाईन कामांचा भार वाढला आहे. माहिती भरण्यासह अनेक ऑनलाईन कामे करावी लागतात. त्यामुळे शासनाने दोन्ही पदांसाठी बारावी उत्तीर्णची अट लावली आहे. मात्र, त्यापेक्षाही अधिक शिक्षण घेतलेल्या महिलांचे या पदांसाठी अर्ज आले आहेत. सेविकेसह मदतनीस पदासाठीही बीएड, डीएड, एमएस्सी, बीकॉम, बीए झालेल्या महिलांनी अर्ज केले आहेत. बारावीपुढे शिक्षण झालेल्यांना त्यानुसार अधिकच्या गुणांची तरतूद आहे. त्यातून गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. त्यामुळे अंगणवाड्यांना उच्चशिक्षित कर्मचारी मिळणार आहेत.
- अंगणवाडी सेविकांना सध्या साडेआठ हजार रुपये मानधन मिळते. तर मदतनीसना साडेचार हजार रुपये मिळतात. शासनाने नुकतीच त्यामध्ये अनुक्रमे दीड व एक हजार रुपयांची वाढ केली आहे. उच्चशिक्षितांचे अर्ज येण्यामागे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणारे चांगले मानधन हेही एक कारण आहे.
- गडहिंग्लज तालुक्यातील चार अंगणवाडी सेविका व २४ मदतनीसांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. या पदांवर काम करण्यास इच्छुकांत मोठी चुरस असल्याचे दिसून येत आहे. एका-एका पदासाठी आताच नऊ ते दहा अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्यास अद्याप पाच दिवसांची मुदत आहे. त्यामुळे अर्जांच्या संख्येत अजून भर पडण्याची शक्यता आहे.
Kolhapur Anganwadi Bharti 2023