MHT CET: ‘सीईटी’ पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय; या महिन्यात परीक्षा होणार

MHT CET 2020

MHT CET 2022

MHT CET 2022- The JEE exam and the university exam have no option but to postpone the CET. Both exams were expected to take place on the same day as the earlier CET schedule. This led to the decision to postpone the CET, said Ravindra Jagtap, Commissioner, CET Cell. According to the new schedule, CET will be organized for undergraduate and postgraduate courses from August 2 to 25. According to the CET cell, the July schedule has been changed to August due to JEE, NEET and university session examinations.

केंद्र सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या ‘जेईई’ (JEE Mains 2022) आणि ‘नीट’ (NEET 2022) परीक्षांसाठी राज्याच्या सीईटी सेलतर्फे (MHT CET 2022) घेण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या सामाइक प्रवेश परीक्षा (Commen Entrance Test, CET) पुन्हा एकदा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ‘सीईटी’ सेलकडून (CET Cell) जुलै महिन्यात परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. आठवडाभरातच हा निर्णय बदलण्यात आला असून, आता ऑगस्ट महिन्यात परीक्षा होणार असल्याचे ‘सीईटी’ सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षा पुढे गेल्याने प्रवेशांची प्रक्रियाही लांबणार असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप होणार आहे.

 • नव्या वेळापत्रकानुसार दोन ते २५ ऑगस्टदरम्यान पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ‘सीईटी’चे आयोजन केले जाणार आहे. ‘जेईई,’ ‘नीट’परीक्षा आणि विद्यापीठांच्या सत्र परीक्षांमुळे जुलै महिन्यातील वेळापत्रक बदलून ते ऑगस्ट महिन्यात करण्यात आल्याचे ‘सीईटी’ सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 • या परीक्षांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १२ एप्रिल होती. त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, आता विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तीन महिन्यांहून अधिक वाट पहावी लागणार आहे. परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालणार असल्याने त्यानंतर सप्टेंबर महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरू होतील.
 • हे प्रवेश नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरू राहतील. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष पुन्हा एकदा उशिराने सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव होता म्हणून परीक्षांचे आयोजन आणि प्रवेश प्रक्रियांना उशीर झाला होता. यंदा प्रवेश परीक्षा वेळेत होतील, अशी आशा विद्यार्थ्यांना होती. मात्र, याही वर्षी ‘सीईटी’ लांबणीवर पडणार असल्याने विद्यार्थ्यांसह, उच्च शिक्षण संस्थांनाही मनस्ताप होणार आहे.
 • जेईई’ परीक्षा आणि विद्यापीठ परीक्षा यामुळे ‘सीईटी’ पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नाही. दोन्ही परीक्षा ‘सीईटी’च्या आधीच्या वेळापत्रकाच्या तारखांच्या दिवशीच येण्याची शक्यता होती. यामुळे ‘सीईटी’ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची प्रतिक्रिया ‘सीईटी’ सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली

MHT CET 2022- Registration

MHT CET Exam Registration 2022- The date of registration for various courses has been extended by the State Common Entrance Test Cell, Maharashtra. Apirl 15 was the last date for registration. Candidates will now be able to register till 11th May 2022. Candidates will be able to register on the official website cetcell.mahacet.org.

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) तंत्रशिक्षण विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याप्रमाणे ‘सीईटी’ परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ११ मे पर्यत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती सीईटी सेलने दिली आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी, एमबीए, एमएमएस सीईटी, एमसीए सीईटी, एम. आर्च सीईटी, एम.एचएमसीटी सीईटी या सामाईक प्रवेश परीक्षांकरिता ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ मिळावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून सीईटी सेलकडे वारंवार होत होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून एक विशेष बाब म्हणून या सीईटी सेलकडून या अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेसाठी नोंदणी करण्यात मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ अंतिम असून या पुढे कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची सर्व उमेदवार आणि पालकांनी नोंद घ्यावी, असेही सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

MHT CET 2022 : अशी करा नोंदणी

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahacet.org वर जा.
होमपेजवरील MHT CET 2022 नोंदणीच्या ‘न्यू रजिस्ट्रेशन’ लिंकवर क्लिक करा.
आता ‘नवीन नोंदणी’ लिंकवर क्लिक करा.
नोंदणी पूर्ण करण्यासाठी मोबाइल नंबर, ईमेल आयडी भरावा लागेल.
संपूर्ण तपशील भरून आपली नोंदणी करा.
अर्ज फी भरा आणि पुढे जा. फॉर्म सेव्ह करा आणि सबमिट करा. भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


 

MHT CET 2022 Date Update

मुंबई : सीईटी परीक्षांच्या  तारखा  जाहीर करण्यात आलेल्या आहेत. इतर परीक्षांदरम्यान एमएचटी सीईटी असेल तर विद्यार्थ्यांचा  गोंधळ होऊ शकतो म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांनी ट्विटरवर एमएचटी सीईटी परीक्षांची तारीख पुढे ढकलल्याची विद्यार्थ्यांना माहिती दिली होती. इतर परीक्षांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं दरम्यान आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या या सीईटी परीक्षेच्या तारखा  जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या परीक्षेच्या तारखांचं सविस्तर वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता तंत्रशिक्षण विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचे सुधारित अंदाजित वेळापत्रक अशा नावाने या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे.

 प्रथम वर्ष अभियांत्रिकी महा-एमएचटी-सीईटी / प्रथम वर्ष औषध निर्माणशास्त्र महा-एमएचटी-सीईटी

 •  पीसीएम (PCM) ग्रुप – 05 ते 11 ऑगस्ट, 2022
 •  पीसीबी (PCB) ग्रुप – 12 ते 20 ऑगस्ट, 2022 (15, 16 व 17 ऑगस्ट वगळून )

एमबीए, एमएमएस, एमसीए, एम.आर्च, बी.प्लॅनिंग इत्यादी आणि आणखी अभ्यासक्रमासाठीची सीईटी आणि त्यांच्या तारखा वेळापत्रकात नमूद केलेल्या आहेत. या अधिकृत वेबसाईटवर सविस्तर माहिती आणि तारखा दिलेल्या आहेत. दरम्यान या संदर्भातली माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे दिलेली आहे.

 उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करत म्हटलंय

वर्ष २०२२-२३ करीता राज्य सीईटी कक्षातर्फे उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता सामाईक प्रवेश परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आले असून परीक्षांचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर  प्रसिद्ध केले आहे.

 CET वेळापत्रक 


MHT CET Exam : The state’s CET exams will be held in the first week of August due to JEE Main and NEET exams .CET exam dates will be announced soon. The first session of JEE Main Exam will end on 29th June, the second session will end on 30th July, 2022, and the final examination will be held on 17th July, 2022. As a result, MHT CET 2022 exams in the state will be held in August, so that these exams do not clash with each other. Read More details as given below.

MHT CET 2022 Date Update: महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET 2022) ऑगस्ट २०२२ मध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. सामंत यांनी आपल्या सोशल मिडीया अकाउंटवर ही घोषणा केली आहे. जेईई मेन (JEE Main) आणि नीट (NEET) परीक्षांमुळे राज्यातील सीईटी परीक्षा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत.

सीईटी परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असेही सामंत यांनी कळवले आहे. अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम म्हणजेच जेईई आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट परीक्षा जून आणि जुलै महिन्यात होणार आहेत. जेईई मेन परीक्षेचे पहिले सत्र २९ जून तर दुसरे सत्र ३० जुलै २०२२ रोजी संपणार आहे तर नीट परीक्षा १७ जुलै २०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे. परिणामी राज्यातील MHT CET 2022 परीक्षा त्यानंतर ऑगस्ट महिन्यात घेतली जाणार आहे, जेणेकरून या परीक्षा एकमेकांशी क्लॅश होणार नाहीत.

राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमएचटी-सीईटी परीक्षेचे आयोजन केले जाते.


MHT CET Exam Registration 2022- The date of registration for various courses has been extended by the State Common Entrance Test Cell, Maharashtra. March 31 was the last date for registration. Candidates will now be able to register till April 15. Candidates will be able to register on the official website cetcell.mahacet.org.

MHT CET 2022: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (State Common Entrance Test Cell, Maharashtra) विविध अभ्यासक्रमांच्या नोंदणीची तारीख वाढविण्यात आली आहेत. आता उमेदवारांना १५ एप्रिलपर्यंत नोंदणी करता येणार आहे. यासाठी ३१ मार्च ही नोंदणी करण्याची शेवटची तारीख होती. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर नोंदणी करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांना पुढील स्टेप्स फॉलो करुन नोंदणी करता येणार आहे.

MHT CET 2022 : अशी करा नोंदणी

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahacet.org वर जा.
होमपेजवरील MHT CET 2022 नोंदणीच्या ‘न्यू रजिस्ट्रेशन’ लिंकवर क्लिक करा.
आता ‘नवीन नोंदणी’ लिंकवर क्लिक करा.
नोंदणी पूर्ण करण्यासाठी मोबाइल नंबर, ईमेल आयडी भरावा लागेल.
संपूर्ण तपशील भरून आपली नोंदणी करा.
अर्ज फी भरा आणि पुढे जा. फॉर्म सेव्ह करा आणि सबमिट करा. भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.

महत्त्वाच्या तारखा- Important Date 

 • महाराष्ट्र सीईटी परीक्षेची तारीख – १७ आणि १९ मे २०२२
 • नोंदणीची अंतिम तारीख- १५ एप्रिल २०२२

सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) तंत्रशिक्षण विभागातील आठ विषय, उच्च शिक्षण विभागाचे आठ आणि कला शिक्षण विभागाचा एक विषय अशा १७ विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सीईटीकडून जाहीर करण्यात आलेल्या अंदाजित वेळापत्रकानुसार सीईटीच्या परीक्षा ३ जूनपासून सुरू होत आहेत. उच्च शिक्षण विभागाच्या परीक्षा ३ ते १० जूनदरम्यान होणार आहेत. तर, तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा ११ ते २८ जूनदरम्यान घेण्यात येणार आहेत.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी महत्त्वाची असलेली एमएचटी सीईटी ११ ते २३ जूनदरम्यान होणार आहे. यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स (पीसीएम) हा ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा ११ ते १६ जून; तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी (पीसीबी) हा ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा १७ ते २३ जूनदरम्यान होणार आहे. कला शिक्षण विभागाची परीक्षा १२ जूनला होणार आहे. यासाठी आता १५ एप्रिलपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


MHT CET Exam Date 2022- CET dates for courses conducted under the Department of Higher and Technical Education have been announced. The CET examinations of the Department of Higher Education will be held from June 3 to 10, 2022, the examinations of the Department of Technical Education will be held from June 18 to June 28 and the CET examinations of the Department of Arts will be held on June 12, 2022. This information was given by Higher and Technical Education Minister Uday Samant.

MHT-CET २०२२ च्या नोंदणीस सुरुवात

येत्या शैक्षणिक वर्षातील सीईटी परीक्षेसाठी (CET examविविध अभ्यासक्रमांची नोंदणी प्रक्रिया सीईटी सेलमार्फत (CET cellसुरू आहे. सीईटी सेलकडून शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग तसेच कलाशिक्षण विभागाच्या सीईटीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. उच्चा शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दिनांक तीन ते दहा जून 2022, तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा दिनांक आकरा ते आठ्ठावीस जून तर कलाशिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा बारा जून 2022 रोजी घेण्यात येणार आहेत. अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samantयांनी दिली. यासोबतच अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांची माहिती पुस्तिका वेळापत्रक व परीक्षेत बदल झाल्यास त्याची माहिती संबंधित वेबसाईटवर देण्यात येणार असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.

 • तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या (सीईटी) तारखा जाहीर झाल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दिनांक 03 जून ते 10 जून, 2022 यादरम्यान घेण्यात येणार आहेत.
 • तंत्र शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दिनांक 11 जून ते 28 जून 2022 यादरम्यान होणार आहेत. तसेच कला शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दिनांक12 जून, 2022 रोजी घेण्यात येणार आहेत. अ
 • भ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांची माहिती पुस्तिका, वेळापत्रक/बदल आणि अभ्यासक्रम सीईटीच्या संकेतस्थळावर http://mahacet.org उपलब्ध आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

MHT CET Exam 2022- This is important news for students preparing for MHT CET 2022. State Common Entrance Test Cell (State Common Entrance Test Cell, MHT CET 2022) has announced the syllabus and grading scheme. Students preparing for MHT CET 2022 can check the syllabus and marking scheme by visiting the official website mhtcet2022.mahacet.org. Read More details as given below.

MHT CET Exam 2022: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने महाराष्ट्र सीईटी परीक्षेसाठी (State Common Entrance Test Cell,MHT CET 2022) अभ्यासक्रम आणि गुणांकन स्कीम जाहीर केली आहे. एमएचटी सीईटी २०२२ परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट mhtcet2022.mahacet.org वर जाऊन अभ्यासक्रम आणि मार्किंग स्कीम तपासू शकतात. या परीक्षेची तयारी करणारे सर्व उमेदवार जाहीर केलेला अभ्यासक्रम आणि मार्किंग योजनेनुसार स्वत:ची तयारी करू शकतात. एमएचटी सीईटी २०२२ च्या अभ्यासक्रमामध्ये सीईटी प्रश्नपत्रिका तयार केल्या जाणाऱ्या विषयांची यादी देण्यात आली आहे.

MHT CET Marking Scheme

 • सीईटी सेल महाराष्ट्राने एमएचटी सीईटी २०२२ मार्किंग स्कीम देखील जारी केली आहे.
 • एमएचटी सीईटी परीक्षा २०२२ ही कॉम्प्युटर माध्यमातून होणार असून यामध्ये निगेटीव्ह मार्कींग असणार आहे.
 • एमएचटी सीईटी २०२२ प्रश्नपत्रिकेची काठीण्य पातळी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रासाठी जेईई मेन्स (JEE Mains) च्या बरोबरीची असेल आणि जीवशास्त्राची काठीण्य पातळी नीट (NEET) च्या बरोबरीची असेल.

एमएचटी सीईटी २०२२ च्या नोटीफिकेशननुसार, एमएचटी सीईटी प्रश्नपत्रिका तयार करताना इयत्ता अकरावीच्या अभ्यासक्रमाला २० टक्के वेटेज आणि बारावीच्या अभ्यासक्रमाला ८० टक्के वेटेज दिले जाईल. करोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (Maharashtra State Council for Educational Revision and Training) इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमातून भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), जीवशास्त्र (biology)आणि गणित विषयांचा काही भाग वगळण्यात आला आहे. इयत्ता अकरावी (२०२०-२१) चे विषय देखील एमएचटी २०२२ च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत.

अभ्यासक्रम आणि मार्कींग स्कीम पाहण्यासाठी येथे क्लिक करा


MHT CET 2022– The Maharashtra State Common Entrance Examination Cell (MHT CET Cell) conducts entrance examinations for the selection of eligible candidates for admission to various undergraduate (UG) and post-graduate (PG) courses in various disciplines like Engineering, Pharmacy, Agriculture etc. The registration process for Maharashtra Common Entrance Examination 2022 (MHT CET 2022) is starting from 10th February. March 31 is the last date to apply for MHT CET 2022.

MHT CET 2022: सन २०२२-२३ मध्ये महाराष्ट्रातील महाविद्यालये आणि इतर उच्च शिक्षण संस्थांमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट्स आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (MHT CET Cell) विविध उच्च शिक्षणातील इंजिनीअरिं, फार्मसी, कृषी इत्यादी विषयातील अंडर-ग्रॅज्युएट (UG) आणि पोस्ट-ग्रॅज्युएट (PG) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येते. महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा 2022 (MHT CET 2022) साठी नोंदणीची प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ३१ मार्च ही एमएचटी सीईटी २०२२ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

MHT CET 2022: या स्टेप्स फॉलो करुन करा अर्ज

 • महाराष्ट्र सीईटी २०२२ साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जा.
 • एमएचटी सीईटी २०२२ ऑनलाइन नोंदणी लिंकवर क्लिक करा.
 • नवीन पेजवर ‘New Registration’ वर क्लिक करा.
  मागितलेले तपशील भरून नोंदणी करा आणि अर्ज सबमिट करा.
 • महाराष्ट्र CET २०२२ नोंदणी करण्यासाठी उमेदवारांना ८०० रुपये शुल्क भरा. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्कात सवलत दिली
 • जाईल.
 • शुल्क भरल्यानंतर उमेदवारांनी सबमिट केलेल्या अर्जाची सॉफ्ट कॉपी सेव्ह करा.

MHT CET २०२२ साठी महत्वाचे निर्देश

 • उमेदवार बारावी (बारावी/समकक्ष परीक्षा) उत्तीर्ण किंवा परीक्षा देत असावा.
 • राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडे संबंधित वैध प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे.
 • MHT CET २०२२ च्या नोंदणीसाठी उमेदवारांनी त्यांचा सक्रिय ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरावा.
 • सीईटी आणि केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया संपेपर्यंत उमेदवाराकडे त्याचा/तिचा ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक सक्रिय असणे गरजेचे
 • आहे.
 • उमेदवाराने अंतिम सबमिशन आणि पेमेंट करण्यापूर्वी अर्ज पडताळून पाहणे आवश्यक आहे.
 • सबमिट केलेला अर्ज आणि भरलेले शुल्क परत केले जाणार नाही. त्यामुळे पैसे भरण्यापूर्वी तपशील पडताळून पाहा.
 • प्रमाणपत्रासाठी फोटो, सही यांची चांगली क्वालिटी अपलोड करा.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


MHT CET 2021 Re-Exam

In view of the situation created due to torrential rains in the state, the CET examinations of MHCET and other courses will be re-taken for the students who could not appear for the examinations.

राज्यात विविध केंद्रांवर अभियांत्रिकी, फार्मसी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा MHT-CET सुरू आहे. पावसामुळे मराठवाड्यासह अन्य अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचता आले नाही. या सर्व विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंबंधी ट्विट केले आहे.

राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी व इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नसून संबंधित विद्यार्थ्यांनी काळजी करू नये.

दरम्यान, मराठवाड्यात पुरामुळे ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा देता आली नाही त्यांनी प्रवेश परीक्षा कक्षाशी ई-मेलने संपर्क साधावा त्यांची परीक्षा नंतर घेण्यात येईल असे प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले. मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यातील परीक्षा केंद्रांवर MHT-CET परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना पोहोचता आले नाही.MHT CET 2021 Time Table

This is very important news for more than 8 lakh students preparing for the Maharashtra CET entrance exam. Changes have been made in the dates of 5 exams to be held on 3rd October. Now these exams will be held on 8th October instead of 3rd October.

MHT CET  2021- महाराष्ट्र सीईटीच्या प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ५ परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता या परीक्षा ३ ऑक्टोबर ऐवजी ८ ऑक्टोबर रोजी घेण्यात येतील. राज्य कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलने महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्टचे (MHT CET 2021) चे सुधारित वेळापत्रकही जाहीर केले आहे. आयआयटी मुंबईकडून यासंदर्भात विनंती प्राप्त झाल्यानंतर परीक्षांच्या तारखा बदलण्याचा निर्णय राज्य घेण्यात आला. यावर्षी महाराष्ट्र सीईटीसाठी एकूण ८ लाख ५५ हजार ८६९ विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यात आले आहेत.

३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ५ परीक्षांच्या तारखा JEE Advanced २०२१ या परीक्षेच्या दिवशी येत होत्या. परीक्षा केंद्रांच्या अभावामुळे परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, ३ ऑक्टोबर रोजी होणारी एमएचटी सीईटी २०२१ परीक्षा आता ८ ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे. या संदर्भात ताज्या अपडेटसाठी विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर महाराष्ट्र चाचणी सेलच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या
एमएचटी सीईटी २०२१ च्या ५ परीक्षांमध्ये बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी/बी प्लॅनिंग, मास्टर्स ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ एज्युकेशन आणि मास्टर्स ऑफ एज्युकेशन (तीन वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स), बॅचलर ऑफ लॉ (पाच वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स) आणि बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन या परीक्षांचा समावेश आहे. या परीक्षा ८ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

या व्यतिरिक्त, MHT CET 2021 च्या उर्वरित परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत. यासाठी, राज्य कक्षाने विद्यापीठे आणि संस्थांना परीक्षांच्या अद्ययावत तारखांनुसार त्यांचे वेळापत्रक आखण्याचे आवाहन केले आहे.

A revised schedule of Common Entrance Tests (CETs) for vocational courses has been announced. The State CET will conduct a common entrance examination for various degree and postgraduate courses from September 15 to October 10.

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या सामाईक प्रवेश परीक्षांचे (सीईटी) सुधारित वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. राज्य सीईटी कक्षातर्फे विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोंबर या कालावधीत सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे.

MAH CET 2021 Timetable

 • Master of Computer Applications – MAH-MCA-CET – 15 September 2021
 • Master of Hotel Management and Catering Technology – MAH-M.HMCT – 15 September 2021
 • Master of Architecture – MAH-M.Arch-CET – 15 September 2021
 • Master of Physical Education – MAH-M.P.Ed-CET – 15 September 2021
 • Master of Physical Education – MAH-M.P.Ed-Physical Test (Offline) – 16, 17 and 18 September 2021
 • Bachelor of Arts / Bachelor of Science / Bachelor of Education (Four year integrated course) – MAH-B.A / B.Sc., BEd CET – 15 September 2021
 • Master of Business Administration and Management Studies – MAH-MBA / MMS CET – 16, 17 and 18 September 2021
 • Bachelor of Engineering / Technology, Pharmacy, Agriculture – MHT-CET 2021 – 20th September to 1st October 2021
 • Bachelor of Hotel Management and Catering Technology – MAH-B.HMCET – 3 October 2021
 • Master of Education – MAH-M.Ed.-CET – 3 October 2021
 • Bachelor of Education, Master of Education (three years duration) – MAH-B.Ed. M.Ed.-CET- 3 October 2021
 • Bachelor of Law (Integrated) – MAH-LLB-5Yrs-CET – 3 October 2021
 • Bachelor of Physical Education – MAH-B.P.Ed.-CET – 3 October 2021
 • Bachelor of Physical Education – MAH-B.P.Ed.Test (Offline) – 4th to 7th October 2021
 • Bachelor of Law (3 years) – MAH-LLB-3Yrs-CET- 4, 5 October 2021
 • Bachelor of Education General and Special – MAH-B.Ed. CET And B.Ed. CET + ELCT- 6th and 7th October 2021
 • Bachelor of Fine Arts (offline) – MAH-AAC-CET- 9th and 10th October 2021

या परीक्षेचा निकाल २० ऑक्टोबर पर्यंत जाहीर करण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ नोव्हेंबरपासून सुरु होईल. हे शैक्षणिक वर्ष सुरु करताना राज्यातील त्या वेळेची कोरोनाची परिस्थिती पाहून ऑनलाईन सुरु करायचे की ऑफलाईन याबाबत निर्णय घेण्यात येईल.

अधीक माहितीसाठी संकेतस्थळ

https://cetcell.mahacet.org/

PDF-Check CET Exam Schedule 


MHT CET 2021

The state government has started the admission process in various faculties. The opportunity to register for MHT-CET 2021 for admission to vocational courses for the academic year 2021-22 has once again been given. Higher and Technical Education Minister Uday Samant has given this information. Application registration will be done online. Students can register by visiting the website https://mhtcet2021.mahacet.org.

राज्य सरकारने विविध विद्याशाखांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी 2021 साठी अर्ज नोंदणी करण्यास पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे. अर्जाची नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने होईल. https://mhtcet2021.mahacet.org या वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी आपली नोंदणी करु शकतील.

राज्य सरकारने विविध विद्याशाखांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी 2021 साठी अर्ज नोंदणी करण्यास पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

16 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची संधी

शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी 2021 या प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आलीय. ऑनलाईन अर्ज न केलेल्या उमेदवारांसाठी एक विशेष बाब म्हणून दिनांक 12/08/2021 ते दिनांक 16/08/2021 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी संधी देण्यात येत आहे. तसेच या पूर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांना अर्जामधील दुरूस्ती करण्यासाठी दिनांक 14/08/2021 ते 16/08/2021 या कालावधील संधी देण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी http://mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असं उदय सामंत म्हणाले आहेत.


Temporary dates of MHT CET have been announced along with MBA, MCA, MArch, BHMCT, MHMCT. MHT CET will be held in September 2021 in two phases while other CETs will be held from 26th August 2021.

MBA, MCA, MArch, BHMCT, MHMCT या सीईटींसह MHT CET च्या तात्पुरत्या तारखा जाहीर झाल्या आहेत. MHT CET सप्टेंबर २०२१ मध्ये दोन टप्प्यांत आयोजित केली जाणार आहे तर अन्य सीईटी २६ ऑगस्ट २०२१ पासून आयोजित करण्यात येतील.

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि औषधनिर्माण प्रवेशांसाठी होणारी सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात MHT CET च्या तात्पुरत्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार ही परीक्षा दोन सत्रात होणार आहे. पहिले सत्र ४ सप्टेंबर २०२१ ते १० सप्टेंबर २०२१ तर दुसरे सत्र १४ सप्टेंबर २०२१ ते २० सप्टेंबर २०२१ या कालावधीत होईल. अन्य हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, मॅनेजमेंट अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी सीईटीचे आयोजन २६ ऑगस्ट २०२१ पासून होणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली. ते पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य सीईटी सेलमार्फत या परीक्षांचे आयोजन केले जाते.

MBA, MCAMArchBHMCTMHMCT या सीईटींचे आयोजन २६ ऑगस्ट २०२१ पासून करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील बीए, बीकॉम, बीएससी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशांसाठी मात्र सीईटी होणार नसून ते बारावीच्या गुणांवर होतील, अशी माहिती सामंत यांनी दिली.

Cet Counselling Round 2020 Registration Date Extended For Various Ug Pg Courses

CET Counselling Round 2020 Registration Date Extended For Various Ug Pg Courses: The State Common Entrance Examination Cell (CET Cell) has extended the deadline to apply under the cap round for admissions to many undergraduate and postgraduate courses. In this regard, the CET Cell has issued a circular and issued a new syllabus schedule.

बीई-बीटेकसह अनेक UG-PG अभ्यासक्रमांच्या प्रवेशअर्जांना मुदतवाढ

सीटीई कक्षाने अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे…

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) ने अनेक पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी कॅप राउंड अंतर्गत अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. यासंदर्भात सीईटी सेलने एक परिपत्रक जारी करून अभ्यासक्रमनिहाय नव्या तारखांचे वेळापत्रक जारी केले आहे.

BE/B.Tech, B.Parmacy/Pharm. D, B.Arch, B. HMCT, DSE, DSP या यूजी कोर्सेसच्या तर MBA/MMS, ME?M.Tech, MCA, M.Pharmacy/ Pharm.D, M.Arch या पीजी कोर्सेसच्या कॅप राऊंडअंतर्गत ऑनलाइन नोंदणी करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे.

अभ्यासक्रमनिहाय नोंदणीसाठी मुदतवाढ मिळालेल्या नव्या तारखा पुढीलप्रमाणे –

पदवीपूर्व अभ्यासक्रम – नोंदणी करण्यासाठी नवी मुदत
बीई, बीटेक – २२ डिसेंबर २०२०
बी.फार्म – २१ डिसेंबर २०२०
बी. आर्क. – २० डिसेंबर २०२०
बी. एचएमसीटी – २३ डिसेंबर २०२०
डीएसई – २१ डिसेंबर २०२०
डीएसपी – २१ डिसेंबर २०२०

पदव्युत्तर अभ्यासक्रम – नोंदणी करण्यासाठी नवी मुदत

एमबीए / एमएमएस – २० डिसेंबर २०२०
एमई / एम. टेक – २४ डिसेंबर २०२०
एमसीए – २३ डिसेंबर २०२०
एम. फार्मसी / फार्म. डी. – २३ डिसेंबर २०२०
एम. आर्क. – २३ डिसेंबर २०२०

महाराष्ट्र सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा


MHT CET 2020: काऊन्सेलिंग प्रक्रिया कधी, कशी? वाचा सविस्तर

बीटेक प्रवेशांसाठी काऊन्सेलिंग प्रक्रिया कधी, कशी? वाचा सविस्तर

MHT CET Counselling: Counselling: महाराष्ट्र सीईटी सेल MHT CET 2020 काऊन्सेलिंग प्रक्रिया ५ डिसेंबर पासून सुरू करणार आहे. पीसीएम (PCM) आणि पीसीबी (PCB) दोन्ही ग्रुपसाठी शनिवार ५ डिसेंबरपासून समुपदेशन फेऱ्यांना सुरुवात होईल. कोविड – १९ महामारी स्थितीमुळे या फेऱ्या ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सीईटी कक्षाची अधिकृत वेबसाइट किंवा सीईटी परीक्षेच्या वेबसाइटला भेट द्यावी. सर्व थेट लिंक्स या वृत्ताच्या अखेरीस देण्यात येत आहेत.

MHT CET 2020 Counselling साठी काही महत्त्वपूर्ण टिप्स :

– MHT CET Councelling 2020 प्रक्रियेत नोंदणी, शुल्क भरणे आणि प्रमाणपत्र पडताळणी या टप्प्यांचा समावेश असेल.

– जे विद्यार्थी MHT CET Councelling 2020 साठी पात्र असतील त्यांना स्वतंत्रपणे काऊन्सेलिंग शुल्क भरावे लागणार नाही.

– ज्या विद्यार्थ्यांनी MHT CET 2020 साठी JEE Main स्कोअरच्या आधारे अर्ज केला आहे, त्यांना देखील MHT CET Councelling 2020 साठी नोंदणी करावी लागेल आणि शुल्क भरावे लागेल.

– MHT CET Councelling 2020 ही बीटेक प्रवेशांसाठीची केंद्रीय समुपदेशन प्रक्रिया (CAP) आहे.

– MHT CET Councelling 2020 प्रक्रियेतील सीट अलॉटमेंट प्रक्रिया ही पूर्णपणे गुणवत्तेवर आणि विद्यार्थ्यांनी भरलेल्या प्राधान्यक्रमांवर आधारलेली असेल.

MHT CET REsult 2020: सीईटी निकालात गुणवंतांची वाढ

MHT CET 2020 Result २८ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला आहे. ४१ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळवण्यात यश मिळाले आहे. १९ विद्यार्थी PCB गटात तर २२ विद्यार्थी PCM गटात टॉप होते.

पीसीबी आणि पीसीएम ग्रुपची परीक्षा १ ते २० ऑक्टोबर दरम्यान झाली. या परीक्षेला विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद मिळाल्याने परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा आयोजित केली होती. ही परीक्षा राज्यात १८७ केंद्रांवर आणि राज्या बाहेरील १० अशा एकूण १९७ केंद्रांवर जाहीर करण्यात आली होती. तीन लाख ८६ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यात एक लाख ७४ हजार ६७९ विद्यार्थ्यांनी पीसीएम तर दोन लाख ११ हजार ९२५ विद्यार्थ्यांनी पीसीबी ग्रुपमधून परीक्षा दिली होती.


The CET cell announced the schedule of students who failed the CET exam due to heavy rains, power outages and lockdown. The exam will be held on November 7 in the morning and afternoon sessions. The decision to re-examine the students who could not reach the examination center due to natural calamity was taken by the CET cell. Accordingly, the examination will be held on November 7 at 45 centers in the state. The PCB exam will be held in the session from 9 to 12 in the morning and the PCM in the session from 2.30 to 5.30 in the afternoon.

MHT CET 2020: हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी ७ नोव्हेंबरला

MHT CET 2020 Additional Session: अतिवृष्टी, खंडित झालेला वीजपुरवठा आणि लॉकडाऊन आदी कारणांमुळे सीईटी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आले. ही परीक्षा ७ नोव्हेंबर रोजी सकाळ व दुपारच्या सत्रामध्ये होणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे परीक्षा केंद्रावर पोहचणे शक्य न झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय सीईटी सेलकडून घेण्यात आला होता.

१ ते ९ ऑक्टोबर आणि १२ ते २० ऑक्टोबर २०२० या कालावधीत एमएचटी-सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र काही नैसर्गिक आणि आपत्कालीन संकटांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी सीईटी सेलने या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना २२ ते २६ ऑक्टोबरदरम्यान १०० रुपये शुल्क भरून परीक्षेसाठी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. परीक्षेची संधी हुकलेल्या चार हजार १८८ विद्यार्थ्यांनी पीसीएम व पीसीबी गटाच्या परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यानुसार ७ नोव्हेंबरला राज्यातील ४५ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. सकाळी ९ ते १२ च्या सत्रात पीसीबी, तर दुपारी २.३० ते ५.३० च्या सत्रात पीसीएम गटाची परीक्षा होणार आहे.

‘इथे’ मिळेल हॉलतिकीट

ज्या उमेदवारांनी या अतिरिक्त परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, त्यांना सीईटीच्या mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार आहे. परीक्षा केंद्राचे नाव, पत्ता, रिपोर्टिंग टाइम, परीक्षेची तारीख, वेळ अ‍ॅडमिट कार्डवर नोंदवण्यात आली असल्याची महिती सेलकडून देण्यात आली आहे.

अतिरिक्त सीईटी नोटिफिकेशन

MHT CET 2020 अॅडमिट कार्ड

CET वेबसाइट


सीईटी परिक्षा देऊ शकले नाहीत, त्यांना रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ : उदय सामंत

 CET Exam Update : परिक्षा घेणे ही विद्यापीठांची जबाबदारी असली तरीही आम्ही शासन आणि विद्यापीठ वेगवेगळे असे मानत नाही. काही समस्या आल्यास आम्ही राज्यपालांकरवी युजीसीकडे जाऊ, असे उदय सामंत म्हणाले.

 पूरस्थितीमुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे ज्या विद्यार्थ्यांना सीईटीची परिक्षा देता आली नाही त्यांना मोठा दिलासा राज्य सरकारने दिला आहे. या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

 पूरग्रस्त विद्यार्थी जे परिक्षा देऊ शकले नाहीत, त्यांना आज मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सीईटी रजिस्ट्रेशनची लिंक देण्यात आली होती. ही लिंक आणखी दोन दिवस सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय परिक्षा घेणे ही विद्यापीठांची जबाबदारी असली तरीही आम्ही शासन आणि विद्यापीठ वेगवेगळे असे मानत नाही. काही समस्या आल्यास आम्ही राज्यपालांकरवी युजीसीकडे जाऊ, असे ते म्हणाले. तसेच ही परिक्षा 10 नोव्हेंबरआधी घेण्यात येईल असेही ते म्हणाले.

 कधी कोरोना, कधी अतिवृष्टी तर कधी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे ठप्प झालेल्या लोकल सेवा अशा अनेक कारणांमुळे यंदा सीईटीचे विद्यार्थी परीक्षेला मुकले आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने या विद्यार्थ्यांना दिलासा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांना (नोंदणी केलेल्या) काही अपरिहार्य कारणांमुळे एमएचटी सीईटी परीक्षा देता आली नाही, त्यांच्यासाठी आणखी एक संधी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अतिरिक्त सत्रासाठी अर्ज करायचा आहे.

 विद्यार्थ्यांना नोंदणी करतानाच अतिरिक्त सत्रासाठी १०० रुपये शुल्क देखील भरायचे आहे. हे शुल्क कॅप  प्रोसेसच्या वेळी ऍडजस्ट केले जाणार असल्याचे सीईटी सेलने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.  राज्य शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की, ‘१ ते ९ ऑक्टोबर आणि १२ ते २० ऑक्टोबर २०२० या कालावधीत एमएचटी सीईटी परीक्षेचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कालावधीत काही नसर्गिक  आणि आपत्कालीन संकटांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा

केंद्रांवर वेळेत पोहोचता आले नाही आणि त्यांची परीक्षा हुकली. अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पीसीबी आणि पीसीएम या दोन्ही ग्रुपच्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती आणि ज्यांचे हॉलतिकीट आले होते, मात्र  परीक्षा  देता आली नाही, अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज करून १०० रुपये शुल्क भरायचे आहे. त्यांच्यासाठी अतिरक्त सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.


सीईटीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; मिळणार आणखी एक संधी

करोना,पाऊस व खंडित वीजपुरवठा अशा कारणांमुळे सीईटी हुकलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळणार आहे…

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांना (नोंदणी केलेल्या) काही अपरिहार्य कारणांमुळे MHT-CET परीक्षा देता आली नाही, त्यांच्यासाठी आणखी एक संधी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अतिरिक्त सत्रासाठी अर्ज करायचा आहे. ही नोंदणी २२ आणि २३ ऑक्टोबर २०२० या दोन दिवशी सुरू राहणार आहे.

विद्यार्थ्यांना नोंदणी करतानाच अतिरिक्त सत्रासाठी १०० रुपये शुल्क देखील भरायचे आहे. हे शुल्क CAP प्रोसेसच्या वेळी अॅडजस्ट केले जाणार असल्याचे सीईटी कक्षाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, या परीक्षेसाठी करोना,पाऊस व खंडित वीजपुरवठा अशा कारणांमुळे या सीईटी परीक्षेसाठी सर्व साधारण ४०% विद्यार्थी उपस्थित नव्हते. ही गोष्ट सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, प्रवेश नियामक प्राधिकरण व महाराष्ट्र शासन यांच्या लक्षात आणून देण्याचे काम असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अन ऐडेड इन्स्टिट्यूट इन रूरल एरिया चे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ यांनी केले व यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व संबंधित विभागांना तत्काळ पत्रव्यवहार केला होता.

राज्य शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की, ‘१ ते ९ ऑक्टोबर आणि १२ ते २० ऑक्टोबर २०२० या कालावधीत MHT-CET 2020 परीक्षेचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कालावधीत काही विद्यार्थ्यांना करोना, पावसामुळे वाहतूक व्यवस्थेवर झालेला परिणाम, खंडित वीजपुरवठा आदि कारणांमुळे परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता आले नाही आणि त्यांची परीक्षा हुकली. अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. PCB आणि PCM या दोन्ही ग्रुपच्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती आणि ज्यांचे हॉलतिकीट आले होते, मात्र परीक्षा देता आली नाही, अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज करून १०० रुपये शुल्क भरायचे आहे. त्यांच्यासाठी अतिरक्त सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांचे अतिरिक्त १०० रुपये शुल्क कॅप राउंडमध्ये अॅडजस्ट केले जाईल.’

MHT-CET 2020 च्या अतिरिक्त सत्रासाठी नोंदणी करण्याच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.MHT-CET 2020 अतिरिक्त सत्रासंदर्भातील नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


 पुन्हा विशेष सत्रात सीईटी देण्याची संधी 

CET Exam 2020  : ज्या विद्यार्थ्यांना अतिवृष्टीसारख्या कारणांमुळे सीईटी परीक्षा देता आली नाही, त्यांना पुन्हा एकदा विशेष सत्रात सीईटी देण्याची संधी मिळणार आहे.

CET Exam 2020  : अतिवृष्टीसारख्या कारणांनी एमएचटी-सीईटी परीक्षा देण्यासाठी मुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा विशेष सत्रात सीईटी देण्याची संधी मिळणार आहे. याबाबतचा निर्णय लवकरच उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी ट्विट करुन माहिती दिली आहे. दरम्यान, सीईटी परीक्षा देण्यापासून मुकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची एक संधी मिळावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली होती.

राज्याती ‘पीसीबी’ गटाची परीक्षा १ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत पार पडली. तर, ‘पीसीएम’ गटाची परीक्षा १२ ते २० ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.सीईटीचे परीक्षा केंद्र प्रामुख्याने शहरी भागात होते. त्याचप्रमाणे शहरी भागात संसर्ग अधिक असल्याने अनेक विद्यार्थी सीईटीपासून वंचित राहिले. या अनुपस्थित विद्यार्थ्यांना परीक्षेची एक संधी देण्यात यावी. सध्या सुरू असणाऱ्या पीसीएम गटाच्या सीईटी परीक्षेसाठी काही विद्यार्थी आधार कार्ड नसणे, मूळ प्रतित ओळखपत्र नसणे, परीक्षा केंद्रावर काही मिनिटांनी उशिरा पोहोचणे अशा कारणांमुळे उशिरा पोहोचत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी आत सोडले जात नाही. परिणामी या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागत आल्याची तक्रार पालकांनी केली आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना सीईटी देण्याची एक संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे राज्य सरकारने अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी लागणाऱ्या गुणांची पात्रता कमी केल्याने, बारावीत कमी गुण असलेले अनेक विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. मात्र, सीईटीपूर्वी हे विद्यार्थी पूर्वीच्या निकषाप्रमाणे अपात्र असल्याने सीईटीला अनुपस्थित राहिले. नव्या निकषानुसार पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना सीईटीसाठी संधी द्यावी, अशी मागणी असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिट्यूट्स इन रुरल एरिया या संस्थेद्वारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

त्यानुसार एमएचटी सीईटीच्या पीसीबी आणि पीसीएम गटाच्या परीक्षेला अतिवृष्टीसारख्या कारणांनी मुकलेल्या परीक्षा देण्यासाठी एक संधी दिली जाईल. या विद्यार्थ्यांची विशेष सत्रात परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे दिली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग प्रवेशाची संधी मिळणार आहे.

Maha CET 2020: State CET Cell, Mumbai has decided to give an extension for Online Registration and Filling up of an application form for CET’s related to courses under Higher and Technical Education conducted by this office on 7th and 08th September 2020

सीईटी सेलमार्फत विविध १२ अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या आॅनलाइन प्रवेश अर्ज करण्याच्या प्रक्रियेला ७ ते ८ सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

सीईटीपरीक्षा १ ते १५ आॅक्टोबर दरम्यान घेणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केल्यानंतर सीईटी सेल प्रशासन नियोजनाला लागले आहे. जे विद्यार्थी २०२० – २१ च्या आॅनलाइन सीईटी परीक्षेकरिता या आधी अर्ज करू शकले नाहीत त्यांना सीईटी सेलकडून पुन्हा एकदा संधी देण्यात येणार आहे.

सीईटी सेलमार्फत विविध १२ अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या आॅनलाइन प्रवेश अर्ज करण्याच्या प्रक्रियेला ७ ते ८ सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणून आॅनलाइन अर्ज करण्याची विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी असेल, असेही सेलने स्पष्ट केले.

1 Comment
 1. URVASHI DNYANESHWAR SHRIRAO says

  LLB.FOR 3YEAR

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!