Mahajyoti – महाज्योती मार्फत पोलीस-सैन्यदल भरतीसाठी प्रशिक्षण
MahaJyoti Pre recruitment Training Program 2023 https://mahajyoti.org.in
MahaJyoti Free Training for Police Bharti 2023
नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी योजना https://mahajyoti.org.in : Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (Mahajyoti), Nagpur conducts pre-recruitment training for students belonging to other backward classes, nomadic tribes and special backward classes. The registration process of students for this training has been started and the last date for applying is 25th January 2023. Mahajyoti has appealed to take advantage of pre-recruitment training for Police force. Through Mahajyoti, training will be provided at two places in Nagpur and Aurangabad District of Maharashtra. Interested candidates should apply online through the instruction given below on official website www.mahajyoti.org.in. Read the complete etails given below and keep visit us for the further updates.
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, पोलीस-सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षणासाठी असा करा अर्ज… राज्य सरकारत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध योजना, शिष्यवृत्ती आणि पोलीस-सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या प्रक्रियेत नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खालील दिलेल्या पद्धतीने योजनेचा लाभ घेता येईल.
महाज्योती मार्फत पोलीस- सैन्यदल भरतीसाठी प्रशिक्षण
- महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस– सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात येते.
- या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली असून अर्ज करण्यासाठी अंतिम दि. 25 जानेवारी 2023 आहे.
- पोलीस-सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन महाज्योतीतर्फे करण्यात आले आहे. महाज्योतीमार्फत प्रशिक्षण नागपूर व औरंगाबाद या दोन ठिकाणी देण्यात येणार आहे.
MahaJyoti Training Program 2023 Eligibility
चार महिन्यांचे प्रशिक्षण, सहा हजार रुपये विद्यावेतनही…
- प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्याचा असून प्रशिक्षण हे अनिवासी स्वरुपाचे आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमाह 6 हजार रुपये इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे.
- तसेच प्रशिक्षणा दरम्यान पुस्तके, गणवेश व बूट देखील देण्यात येणार आहेत.
- प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील असावा.
- उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असावा.
How to Apply For MahaJyoti Free Training
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी असा करा अर्ज
- नागपूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय तसेच शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांना सन 2022-23 वर्षात महाडीबीटी या पोर्टलवरील भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या योजनेचे अर्ज भरण्याकरीता 21 सप्टेंबर 2022 पासून महाडीबीटी पोर्टल कार्यान्वीत करण्यात आलेले आहे.
- पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन भरून घ्यावे तसेच महाविद्यालयाने नोंदणीकृत झालेले अनुसुचित जाती, इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गाचे अर्ज तपासणी करून समाज कल्याण कार्यालयाकडे मंजुरीकरीता सादर करावे.
- अनुसुचित जाती, इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गातील एकही पात्र लाभार्थी शिष्यवृत्तीपासून वंचीत राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
- इच्छुक उमेदवाराने महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावरील नोटीस बोर्डमधील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण या टॅबवर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग विमुक्त जाती – भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पोलीस सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्याचे आवाहन महाज्योतीमार्फत करण्यात येत आहे.
- अधिक माहितीसाठी येथे साधा संपर्क…अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी दूरध्वनी क्र. 2221041 [email protected] किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, श्रध्दानंद पेठ, शासकीय औद्योगिक संस्थेसमोर, नागपूर येथे संपर्क साधावा.
How to Apply Mahajyoti Training
Online Registration Link for Pre- Recruitment training
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज प्रक्रिया सुरू
Registration for online preparation for Police Recruitment Pre-Exam
Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (Mahajyoti) are invited from aspiring students who have passed 12th standard in the non-crimilayer group of other backward classes, deprived castes and nomadic tribes, special backward classes, for the free online training of upcoming Police Recruitment Examination. The last date to apply is April 30, 2022.
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), संस्थेचे कार्यालय नागपूर येथे कार्यरत असून राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीच्या | अनुषंगाने होणाच्या परीक्षांच्या निःशुल्क ऑनलाईन प्रशिक्षणासाठी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या समाज घटकातील नॉनक्रिमीलेअर गटातील १२ वी उत्तीर्ण असणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ३० एप्रिल, २०२२ आहे. ऑनलाईन अर्ज किंवा मेलचा विचार केला जाणार नाही..