महानिर्मिती भरती- उमेदवारांची यादी जाहीर

MahaNirmiti Selection List 2020

MahaNirmiti Result 2020 Merit List – मागील काही दिवसांपासून महावितरणमधील रिक्त जागांच्या भरतीचा प्रश्न चर्चेत आहे. महावितरणमध्ये सात जागांची भरती करण्यात येणार असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात येत होतं. अखेर महानिर्मितीमधील रिक्त असलेल्या जागांपैकी ७१५ जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची यादी महानिर्मितीच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून महावितरणमधील रिक्त जागांच्या भरतीचा प्रश्न चर्चेत आहे. महावितरणमध्ये सात जागांची भरती करण्यात येणार असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात येत होतं. अखेर महानिर्मितीमधील रिक्त असलेल्या जागांपैकी ७१५ जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची यादी महानिर्मितीच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.

महानिर्मितीच्या वतीनं याची घोषणा करण्यात आली आहे. महानिर्मितीच्या भरतीमध्ये तंत्रज्ञ ३ या पदाच्या ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या आधारे निवडलेल्या उमेवारांची यादी जाहीर करण्यात आली आङे. रिक्त पदांची उपलब्ध संख्या, समांतर आणि सामाजिक आरक्षण व कागदपत्रे पडताळणीनुसार ही यादी प्रसिद्ध करण्यात आली असल्याचं महानिर्मितीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

“करोना काळात सर्वत्र आर्थिक संकट, आरोग्य आणि बेरोजगारीची समस्या असताना महानिर्मिती कंपनीच्या माध्यमातून ७१६ युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे, ही निश्चितच अभिमानास्पद आणि दिलासा देणारी बाब आहे,” अशी प्रतिक्रिया ही यादी जाहीर केल्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!