Pashusavardhan Vibhag-पशूधन विकास मंडळात विविध पदे रिक्त

Maharashtra Livestock Development Board Bharti 2021

MLDB Maharashtra Recruitment 2021

There is a demand from the officers and staff that the posts of Data Manager or Statistics should be filled in the Maharashtra Livestock Development Board. At present, only 150 people are running the board and 366 posts are vacant.

पशूधन विकास मंडळात विविध पदे रिक्त

राज्याच्या मागासलेल्या भागात संकरित पशुपैदासीच्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून दुग्धोत्पादन व ग्रामीण रोजगार निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ या स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आली. मंडळासाठी ५६६ पदांची निर्मितीही करण्यात आली. परंतु, मंडळाचा कारभार सध्या १५० जणच हाकत असून तब्बल ३६६ पदे रिक्त आहेत. मनुष्यबळाअभावी अनेक कामे खोळंबली असून शासनाच्या दुर्लक्षामुळे एकाच व्यक्तीला अनेकांची कामे करावी लागत आहे.

Pashusavardhan Vibhag-पशुसंवर्धन विभागातील वर्ग दोनची पदे रिक्त

उच्च प्रतीच्या वळूंची निर्मिती, पालनपोषण करणे व कृत्रिम रेतनासाठी तो इतर संस्थांना पुरविणे आदी पशुधन विकास मंडळाच्या जबाबदाऱ्या आहेत. मंडळाच्या प्रमुख कार्यालयात स्थानिक भागातील गायींसह इतर जातीच्या गाय, म्हैस येथूनच विविध शासकीय संस्थांना उपलब्ध करून दिले जातात. विशेष म्हणजे जनावरांच्या जातीनिहाय डेटा अपडेट ठेवणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. देशी गायींचा डेटा जर काळजीपूर्वक व्यवस्थित ठेवण्यात आला तर तो निश्चितपणे भविष्यकाळात उपयोगी पडणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.  त्यामुळे महाराष्ट्र पशुधन विकास मंडळात डेटा मॅनेजर किंवा सांख्यिकीची पदे भरण्यात यावी, अशी मागणी अधिकारी व कर्मचारी वर्गातून होत आहे.

‘पशूधन’ची पदनिहाय स्थिती

  • मंजूर पदे ५१६
  • रिक्त पदे ३६६
  • भरलेली पदे १५०
  • (जानेवारी २०२१ पर्यंत)
Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!