MPSC, UPSC प्रशिक्षणही होणार आता ऑनलाइन

MPSC UPSC Online Training

MPSC UPSC Online Training: Due to the outbreak of corona, all training classes including MPSC, UPSC, and IBPS  are closed. ; So students in the state are largely deprived of guidance. Candidates who are stuck in the village during the lockdown are facing financial difficulties for training. Candidates do not have money to pay for vocational training classes online. Against this backdrop, Barty’s Director-General Kailash Kanase decided to conduct the online training.

एमपीएससी, यूपीएससी प्रशिक्षणही होणार आता ऑनलाइन

पुणे – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) सुरू असलेले प्रशिक्षण वर्ग बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बार्टीने पुढाकार घेत केवळ अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांनाच नव्हे तर स्पर्धा परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण देण्यास सुरवात केली आहे.

Talathi Bharti 2021 Sample Papers

 कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बार्टी मार्फत सुरू असलेले एमपीएससी, यूपीएससी आणि आयबीपीएससह सर्व प्रशिक्षण वर्ग बंद आहेत. ;त्यामुळे राज्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मार्गदर्शनापासून वंचित आहेत. लॉकडाऊनच्या काळात गावी अडकलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी आर्थिक चणचण भासत आहे. ऑनलाईन पद्धतीने व्यावसायिक प्रशिक्षण वर्गाचे प्रशिक्षण शुल्क भरण्यासाठी उमेदवारांकडे पैसे नाहीत. या पार्श्वभूमीवर बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी ऑनलाईन प्रशिक्षणाचा निर्णय घेतला. 

 या प्रशिक्षणाची सुरुवात 24 जुलैपासून झाली आहे. वेबिनार तसेच यु ट्यूब, फेसबुकच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील दीड लाखांपेक्षा जास्त उमेदवार प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. बार्टीच्या प्रशिक्षणात  ;प्रशिक्षक तज्ज्ञ आणि अधिकारी विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल यासह विविध विषयांवर मोफत मार्गदर्शन करीत आहेत. प्रशिक्षण दररोज सकाळी 8 ते 12 यावेळेत ‘बार्टी ऑनलाइन एमपीएससी’वर होत आहे. पुढील आठवड्यात यूपीएससी आणि आयबीपीएसचे ऑनलाईन प्रशिक्षण सुरु होणार आहे. 

प्रशिक्षण वर्गासाठी हजारो विद्यार्थी सहभागी झाले आहेत. मोफत ऑनलाईन प्रशिक्षणामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे – कैलास कणसे, महासंचालक, बार्टी.

UPSC CMS परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू 

UPSC Vacancy 2020

UPSC Recruitment 2020 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!