Mumbai Mahanagarpalika Bharti 2019
Mumbai Mahanagarpalika Bharti 2019
पालिकेत शिक्षकांची ७८१ पदे रिक्त
Mumbai Municipal Corporation Recruitment 2019 – Mumbai Mahanagarpalika will be recruiting 781 posts for Teachers, According to information available in the Education Department of Mumbai Municipal Corporation, there are about 781 vacancies under the Right to Education Act. The municipality has stated that no further action has been taken in this regard as no information has been received from the government regarding the probability of the incident. Read the complete details given below:
Brihan Mumbai Teachers Recruitment 2019
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात शिक्षण हक्क कायद्यानुसार सुमारे ७८१ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये २०१७ ची संचमान्यतेची माहिती शासनाकडून प्राप्त झाली नसल्याने पुढील कार्यवाही करण्यात आली नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात २००९ मध्ये शिक्षण हक्क कायदा लागू करण्यात आला. यानुसार शिक्षक व विद्यार्थी गुणोत्तर ठरविण्यात आले होते. या गुणोत्तरानुसार महापालिकेच्या सर्वच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये ८९०० शिक्षकांची पदे असणे आवश्यक आहे. सध्या पालिकेत ८,११९ शिक्षक कार्यरत आहेत. यामुळे पालिकेत ७८१ पदे रिक्त आहेत, अशी माहिती महापालिकेने शिक्षण कार्यकर्ते घन:श्याम सोनार यांना दिली आहे. पालिकेच्या शैक्षणिक दर्जाबाबत वारंवार चर्चा होत असल्यामुळे पालिका शाळांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रयत्न पालिकेमार्फत केला जात आहे. या सर्वांत मोठा बदल म्हणजे पालिकेतर्फे काही शाळांमध्ये ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. याबाबत नुकतीच पालिका अधिकारी आणि सीबीएसईचे अधिकारी यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.
मात्र, पालिका मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून नको त्या गोष्टींमध्ये अडकल्याचा आरोप घन:श्याम सोनार यांनी केला आहे. पालिकेच्या शाळेत विद्यार्थी न येण्याचे कारण हे तेथील शिक्षण हे नसून तेथे न मिळणाऱ्या सुविधा हे आहे. आज पालिका सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्याचा दावा करत आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांचा अभ्यासक्रम हा माध्यमिक स्तरावर सुरू होतो. केंद्रीय विद्यालयांमध्ये राबविण्यात येणारा राष्ट्रीय शिक्षण आराखडा २००५ नुसार शिक्षणक्रम सुरू केला तर विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास आपोआप गोडी निर्माण होईल आणि शाळेचा पट वाढेल, असा विश्वास सोनार यांनी व्यक्त केला. सोनार यांनी बिंबिसार नगरसह अन्य दोन पालिका शाळांमध्ये अशा प्रकारे अभ्यासक्रम राबवून विद्यार्थीपट वाढवून दाखिवला आहे. यामुळे पालिका या मुलभूत मुद्द्यांना बगल देत अवास्तव गोष्टींवर भर देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अतिरिक्त शिक्षकांचे काय?
आज दक्षिण मुंबईतील पालिका शाळांतील विद्यार्थी संख्या कमी झाली आहे. तेथे अनेक शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. त्यांना अध्ययनाचे काम करण्याची इच्छा असूनही ते काम करता येत नाही. संचमान्यतेची माहिती उपलब्ध नसल्याने त्यांचे इतर शाळांमध्ये समायोजनही होत नाही. परिणामी तसेच नवीन शिक्षकांची भरतीही होत नाही. दरम्यान पालिकेने ज्या शाळांमध्ये कमी शिक्षक आहेत तेथे अतिरिक्त शिक्षकांची बदली करून त्यांना काम द्यावे व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणीही सोनार यांनी केली आहे. सर्व विषयांना शिक्षक मिळाले तर विद्यार्थी नक्कीच योग्य प्रकारे शिक्षण घेऊ शकतील त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.
सौर्स : म. टा.