सांगली प्राथमिक शिक्षण विभागामध्ये केंद्रप्रमुखांची १०४ पदे रिक्त
Sangli Prathmik Shikshan Vibhag Recruitment 2022
Sangli Prathmik Shikshan Vibhag Bharti 2022: As per the latest update regarding Sangli Prathmik Shikshan Vibhag Bharti 2022 is that Sangli Primary Education Department has 104 vacant posts of Center Head. Candidates Read the complete details given below on this page regarding the Sangli Prathmik Shikshan Vibhag Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
सांगली प्राथमिक शिक्षण विभागामध्ये केंद्रप्रमुखांची १०४ पदे रिक्त
सांगली प्राथमिक शिक्षण विभागामध्ये केंद्रप्रमुखांची मंजूर १३६ पदांपैकी १०४ पदे रिक्त आहेत. तासगाव तालुक्यात तर केंद्रप्रमुखांची १०० टक्के पदे रिक्त आहेत. शिक्षण संचालकांच्या दि. २० सप्टेंबरच्या आदेशानुसार किमान ५० टक्के पदे तरी पदोन्नतीने भरावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल माने यांनी शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडे केली आहे.
माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, केंद्रप्रमुखाचे पर्यवेक्षणीय पद हे अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असणारे पद आहे. त्यामुळे स्वतंत्र केंद्रप्रमुख पद कार्यरत असल्यास केंद्रातील सर्व शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होणार असल्याने रिक्त पदे लवकर भरण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
पदोन्नतीची प्रक्रिया लवकरच राबविणार!
शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड म्हणाले, केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदामुळे शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे. म्हणूनच केंद्रप्रमुखांची ५० टक्के रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार आहेत.
Comments are closed.