7th Pay Commission- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज ! -थकबाकीची रक्कम व्याजासह मिळणार-GR जाहीर 

State Government Pending Payment Issued 2021-22

State Government Pending Payment Issued 2021-22: The Uddhav Thackeray government in the state has decided to pay the third installment of the Seventh Pay Commission arrears. Earlier, the government had given the amount in two installments. About 17 lakh employees will benefit from this decision of the government. This decision has come as a great relief to government employees. Read More details regarding State Government Pending Payment Issued 2021-22 are given below.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज ! –थकबाकीची रक्कम व्याजासह मिळणार-GR जाहीर 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी आली आहे . ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम दि.01 जुलै 2021 पासुन व्याजासह मिळणार आहे . याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन दि.09 मे 2022 रोजी शासन निर्गमित झाला आहे .

State Government Pending Payment Issued 2021-22

7th Pay Commission

  • या शासन निर्णयान्वये , राज्यातील सर्व शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दि.01 जुलै 2021 रोजी देय असलेला सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता व्याजासह प्रदान करण्याचे आदेश राज्य शासनाकडुन देण्यात आले आहेत.
  • राज्यातील सर्व शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना तसेच राज्यातील सर्व जिल्हा परिषदा , शासन अनुदानित शाळा व इतर सर्व अनुदानित शाळेमधील कर्मचाऱ्यांना माहे जुन 2022 च्या वेतन देयकासोबत 7 वा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता  प्रदान करण्यात येणार आहे.
  •  तसेच निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना देखिल माहे जुन 2022 च्या निवृत्तीवेतनासोबत रोखीने अदा करण्यात येणार आहे .ज्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना लागु आहे अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम GPF खात्यात जमा करण्यात येणार आहे .
  • ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना NPS योजना लागू आहे .अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्यात येणार आहे. भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणारी थकबाकी रक्कमेवर दि.01 जुलै 2021 पासुन व्याज लागु राहील . व व्याजासह रक्कम GPF खात्यात जमा करण्यात येणार आहे .परंतु ही रक्कम दि.30 जून 2023 पर्यंत GPF खात्यातुन काढता येणार नाही .याबाबतचा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करा .

इतका नफा होईल

एका आकडेवारीनुसार, तिसऱ्या हप्त्यात गट अ अधिकाऱ्यांना ३० ते ४० हजार रुपये मिळतील. ब गटाच्या अधिकाऱ्यांना २० ते ३० हजार रुपये मिळणार आहेत. तसेच क गटातील लोकांना १० ते १५ हजार आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना 8 ते 10 हजार रुपये मिळणार आहेत.

महाराष्ट्र सरकारने मार्चमध्ये महागाई भत्ता वाढवला होता. त्यावेळी महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवून ३१ टक्के करण्यात आला होता. यापूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २८ टक्के होता.

शासन निर्णय डाउनलोड करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!