There are 622 applications for Garden inspector
There are 632 applications for Garden inspector
उद्यान निरीक्षक पदांसाठी अर्जछाननी
Application scrutiny for the post of Garden inspector of Hospitals, A total of 632 candidates have been nominated for the post of honorary horticulture officer for six months for the municipal parks department. The selection committee, headed by Additional Commissioner, has started scrutinizing the application from Wednesday. While qualifying for the post, the candidate should be a Graduate. Ph.D., MSc candidates are required to perform a stellar workout on the committee while scrutinizing applications.
सहा जागांसाठी तब्बल ६३२ अर्ज
महापालिकेच्या उद्यान विभागासाठी सहा महिन्यांच्या मुदतीसाठी मानधन तत्त्वावर भरण्यात येणाऱ्या उद्यान निरीक्षक पदाच्या सहा जागांसाठी तब्बल ६३२ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या अर्जाची बुधवारपासून छाननी सुरू केली आहे. या पदासाठी उमेदवार पदवीधारक असावा, अशी पात्रता असताना पीएच. डी, एमएस्सीधारक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने अर्जांची छाननी करतांना समितीची तारेवरची कसरत करावी लागत आहे. छाननीन ३० उमेदवारांची निवड केली जाणार असून त्यांना थेट मुलाखतीसाठी बोलविण्यात येणार आहे.
महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर उद्यान निरीक्षकाची सहा पदं मंजूर आहेत. मात्र सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे पाच पदं रिक्त झाली असून सध्या एकच उद्यान निरीक्षक महापालिकेत कार्यरत आहे. त्यामुळे गतवर्षी पाच उद्यान निरीक्षकांची मानधनावर नियुक्ती करण्यात आली. परंतु, शहराचा वाढता विस्तार, वृक्षलागवडीचे वाढलेले उद्दिष्ट्य तसेच वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता आणखी सहा उद्यान निरीक्षकांची मानधनावर भरती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी महापालिकेने बीएस्सी ॲग्री, हॉर्टीगल्चर, फॉरेस्ट शाखेतील पदवीधारकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन केले होते.
सहा महिने मुदतीसाठी भरण्यात येणाऱ्या या पदासाठी दरमहा २५ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. परंतु, या सहा पदासाठी महापालिकेकडे ६३२ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त संदीप नलावडे आणि बी. जी. सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून या अर्जांची छाननी बुधवारी करण्यात आली. त्यात पदवाधारकासोबत पीएच. डी. धारक आणि एमएमस्सी उमेदवारांनी अर्ज केल्याने त्यांना मुलाखतीसाठी कसे बोलवावे असा प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकला आहे. समितीकडून गुणानुक्रमानुसार ३० उमेदवारांची मुलाखतीसाठी पाचारण केले जाणार आहे. त्यातून ६ जणांची निवड केली जाणार आहे.