ZP Maharashtra Bharti 13000 Posts
ZP Maharashtra Bharti 2023
ZP Maharashtra Bharti 13000 Posts
राज्यात तेरा हजार पदांची भरती प्रक्रिया
ZP Bharti 2023 – 13000 Vacancy will be available in Zilha Parishad in Maharashtra. ZP Recruitment advertisement will be published official soon. In January, recruitment process has been started in Zilla Parishad across the state. Online application for this was also filled in March. Candidates also pay online fees. However, as the government has not yet taken the exam, it has hired a total of 13,000 posts. While the candidates are waiting for the examination, their expectations have been raised by the new government leading the development. Read the given details carefully and keep visit us for further details :
जिल्हानिहाय रिक्त जागा ZP Vacancy Details
कोल्हापूर 532, सांगली 471, सातारा 708, अहमदनगर 729, बीड 456, अकोला 242, पुणे 595, औरंगाबाद 362, नागपूर 418, अमरावती 463, बुलढाणा 332, यवतमाळ 505, वाशीम 182, गडचिरोली 335, जालना 328, उस्मानाबाद 320, लातूर 286, नांदेड 557, हिंगोली 150, परभणी 259, ठाणे 196, पालघर 708, रायगड 510, रत्नागिरी 466, सिंधुदुर्ग 162, भंडारा 142, चंद्रपूर 323, गोंदिया 257, वर्धा 267, धुळे 219, जळगाव 607, नंदूरबार 333, नाशिक 687, सोलापूर 414, एकूण 13 हजार 514.
जानेवारी महिन्यात राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे . मार्च महिन्यात त्यासाठी ऑनलाईन अर्जही भरून घेण्यात आले. उमेदवारांनी ऑनलाईन शुल्कही भरले. त्याला आता सात महिने उलटले आहेत. मात्र, शासनाने अद्याप ही परीक्षाच घेतली नसल्याने, तब्बल 13 हजार पदांची भरती रखडली आहे. उमेदवार परीक्षेच्या प्रतिक्षेत असून, नव्याने आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारकडून त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये रिक्त असणार्या 13 हजार जागांसाठी, चालू वर्षीच 26 मार्चपासून भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सांगण्यात आले. राज्य सरकार पातळीवरून होणार्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने कुठल्याही जिल्ह्यातील उमेदवार कुठल्याही जिल्ह्यातून अर्ज भरू शकत होता. अर्ज भरताना उमेदवारांना पसंतीक्रमानुसार जिल्हा निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते.
लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेची ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, आता केवळ अर्ज मागविण्याची प्रक्रिया करण्यात येत असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र लोकसभा निवडणूक झाल्यावरही याबाबत राज्य सरकारने काहीच निर्णय घेतला नाही. त्यानंतर नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. त्यासाठी राज्यात आचारसंहिता लागू होती. त्यामुळे परीक्षा झाली नसल्याचे सांगण्यात येत असले तरी, राज्याच्या तिजोरीवरील अतिरिक्त ताणामुळे भरती प्रक्रिया राबविण्यास उशीर होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भरतीच्या पहिल्या टप्प्यात 26 मार्च ते 23 एप्रिलपर्यंत उमेदवारांकडून अर्ज भरून घेण्यात आले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. शपथविधीच्या आधीच किमान समान कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात राज्यात सर्व शासकीय विभागातील रिक्त पदे भरणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, रिक्त पदे भरण्याची पूर्वीच्या सरकारने सुरु केलेली प्रक्रिया, नवे सरकार कधी राबविणार? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.