नाशिक जिल्ह्यातील ३,३३२ शाळांसाठी शिक्षकांची १० हजार ६५ पदे मंजूर ZP Nashik Teacher Bharti 2023
ZP Nashik Shikshak Bharti 2023 Jahirat, Notification & Apply Link
ZP Nashik Shikshak Bharti 2023
Latest updates of Zilha Parishad Nashik Bharti is given here – As many posts are vacant in the education department of Nashik Zilla Parishad, students are facing difficulties. In this background, the state government will soon recruit the vacant posts. For that, Nashik Zilla Parishad’s primary education department is finalizing the point list for 1186 vacant posts. The report of these statistics will be sent to the state government in the next 2 to 3 days. The government is trying its best to ensure that municipal and Zilla Parishad schools should also be of good quality in competition with private schools. Various activities are being implemented in these schools. 11251 posts of teachers have been sanctioned in Zilla Parishad and out of them 10 thousand 65 posts have been filled. So there are 1186 vacancies. Candidates keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
नाशिक जिल्ह्यातील ३,३३२ शाळांसाठी शिक्षकांची १० हजार ६५ पदे मंजूर, ११८६ रिक्त पदांसाठी बिंदुनामावली पूर्ण
- नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात अनेक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लवकरच रिक्त पदांची भरती करणार आहे. त्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून रिक्त ११८६ पदांसाठीची बिंदू नामावली करण्याच्या कामावर अखेरचा हात फिरवला जात आहे. येत्या २ ते ३ दिवसांत या आकडेवारीचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
- खासगी शाळांच्या स्पर्धेत महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळा देखील तेवढेच चांगल्या दर्जाच्या झाल्या पाहिजे, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. अनेकविध उपक्रम या शाळांमध्ये राबविले जात आहेत. जिल्हा परिषदेत शिक्षकांची ११२५१ पदे मंजूर असून त्यापैकी १० हजार ६५ पदे भरली गेलेली आहेत. तर ११८६ रिक्त पदे आहेत.
राज्य शासनाच्या १ फेब्रुवारी २०२३ च्या अध्यदेशाद्वारे जिल्हा परिषदेत जिल्हानिहाय बिंदू नामावली करण्याचे काम सुरू आहे. एक महिन्यापासून त्यात पेसा, नॉनपेसा, २५, ५० आणि १०० टक्के संवर्गानुसार आकडेवारी घेण्यात येत आहे. येत्या २ ते ३ दिवसांत या आकडेवारीचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी सांगितले. त्यानंतर राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुढे कार्यवाही होणार आहे. - मॉडेल स्कूलचे कामही अंतिम टप्प्यात विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षकांना देखील वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षणदेखील दिले जात आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांचे शिक्षण विभागावर विशेष लक्ष आहे. त्यांच्या संकल्पनेतून मॉडेल स्कूल जिल्ह्यात १०० मॉडेल स्कूल लवकरच साकारण्यात येत आहे. त्याचे कामदेखील अंतिम टप्प्यात आले असल्याचे बच्छाव यांनी नमूद केले.
ZP Nashik Teachers Recruitment 2023: As per the latest updates regarding ZP Nashik Shikshak Bharti is that the large number of teachers in the Zilla Parishad Primary School in Nashik state are vacant. 3012 posts of Urdu Primary teachers are vacant in ZP Nashik. Maha TAIT required for teacher recruitment in the state has been successfully conducted from 22nd February to 3rd March under the control of Maharashtra State Examination Council. After the announcement of the result of the examination, the advertisement will be released for the recruitment of teacher vacancies through this computerized system Pavitra Portal. It has been demanded that these posts be filled soon. Read the complete details given below & Keep Visit us Thanks…!
नाशिक जिल्हातील ZP शाळांमध्ये उर्दू शिक्षकांची 3 हजार पदे रिक्त
नाशिक राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक (ZP) शाळेतील मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. दरम्यान विधानपरिषदेत ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी येत्या दोन महिन्यांत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सूचित केले आहे. उर्दू प्राथमिक शिक्षकांची तीन हजार बारा पदे रिक्त असून या भरतीत उर्दू शिक्षक पदे भरण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघातर्फे राज्य सरचिटणीस साजिद निसार अहमद यांनी शासनाकडे केली आहे.
Shikshak Bharti: एप्रिल-मेमध्ये ३२,३०० शिक्षकांची भरती! खासगी १७००० तर शासकीय १५००० पदे
ZP Teacher Bharti-मार्चअखेरपर्यंत जिल्हा परिषद शाळांमध्ये करणार भरती
ZP Nashik Shikshak Recruitment 2023
- राज्यात शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या नियंत्रणाखाली २२ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. सदर परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षक रिक्त पदांची भरती पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध होईल.
- त्या करिता राज्यात प्रस्तावित ३० हजार शिक्षक भरतीत अल्पसंख्याक समाजातील डीएड- बीएड धारक बेरोजगारांना न्याय मिळवा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्यातील अनेक शाळेत रिक्त पदे असल्याने दोन- तीन वर्गाचे अध्यापन कार्यरत शिक्षक यांना करावे लागत आहे.
- पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या भरतीत उर्दू माध्यमाच्या एकूण जागांमध्ये इतर घटकाप्रमाणे ईवीएस व खुला या दोन्ही प्रवर्गाला जागा उपलब्ध करून द्याव्यात. राज्यात अनेक वर्षानंतर शिक्षक भरती प्रस्तावित आहे म्हणून उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये रिक्त असणारे सर्व पदे भरण्याची गरज आहे. संघटनेतर्फे या भरती व अभियोग्यता चाचणी घेण्यासाठी राज्यभरात अनेकवेळा आंदोलन केले होते.
- उर्दू शिक्षक भरती करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे व परिक्षा आयुक्त महेश फालक यांना देण्यात आली असल्याची माहिती श्री साजिद यांनी दिली.
ZP Nashik Urdu Shikshak Bharti 2023- Vacancy Details
राज्यात उर्दू माध्यम शाळांचे रिक्त पदे-
- सर्व संवर्ग निहाय जिल्हा परिषद: १३०१
- खुले प्रवर्ग जिल्हा परिषद:४०८
- सर्व महानगरपालिका:८८१
- नगरपालिका: ४२२
- एकूण : ३०१२
ZP Nashik Shikshak Bharti 2023 Jahirat, Notification & Apply Link