जून-जुलैमध्ये शिक्षक भरती! ‘अंतरिम’नंतर संचमान्यता होणार अंतिम; कशी होणार भरती – ZP School Shikshak bharti

ZP Teachers Bharti 2023 Notification, Vacancy & Application Form

Check here for new updates related to ZP Teachers Recruitment 2023. Common recognition of Zilla Parishad schools has started. 100% Aadhaar verification of admitted students and joint recognition of Aadhaar corrected schools is being finalized directly. But, more than 88 per cent Aadhaar authentication is done, the accreditation of such schools is provisional and will be finalized after 100 per cent work is completed. The teacher recruitment will be done only after the Sanchamanyata final, in which the recruitment of ZP schools will be done first.

As the school is currently closed due to summer vacations, the deadline will usually be given till June 30, senior officials said. Before that, the respective schools are expected to do Aadhaar authentication and correction in Aadhaar of those students. 50 percent of the vacant posts of teachers (approximately 32 thousand) will be filled only after the completion of general recognition. Officials also said that vacancies in Zilla Parishad schools will be filled first. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

जून-जुलैमध्ये शिक्षक भरती! ‘अंतरिम’नंतर संचमान्यता होणार अंतिम; कशी होणार भरती

Other Important Recruitment  

सिंधुदुर्ग तलाठी भरती 2023 करीता मदत कक्ष (हेल्प डेस्क) लवकरच तलाठी भरतीला सुरुवात
पवित्र पाेर्टलवर ६ हजार ९१९ उमेदवारांना पुन्हा भरावे लागणारत
वित्त विभागात कनिष्ठ लेखापाल पदाच्या १३०१ जागा रिक्त

जिल्हा परिषद १८,९३९ पदांच्या भरतीसाठी नवीन मार्गदर्शक सूचना

राज्यातील झेडपी भरतीसाठी परीक्षेचे स्वरूप जाहीर; वेळ, गुण, प्रकार जाणून घ्या

महापारेषण येथे सहाय्यक तंत्रज्ञ पदाच्या १८६८ जागा रिक्त

जून-जुलैमध्ये शिक्षक भरती! ‘अंतरिम’नंतर संचमान्यता होणार अंतिम; कशी होणार भरती

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 1199 पदांच्या भरतीचा नवीन अपडेट

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

एमएचटी सीईटीचा निकाल १२ जूनला

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

जिल्हा परिषद शाळांची संचमान्यता सुरु झाली आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांचे १०० टक्के आधार प्रमाणीकरण व आधार दुरुस्ती केलेल्या शाळांची संचमान्यता थेट अंतिम केली जात आहे. पण, ८८ टक्क्यांपेक्षा जास्त आधार प्रमाणीकरण झाले, अशा शाळांची संचमान्यता अंतरिम केली जात असून १०० टक्के काम झाल्यावर अंतिम होणार आहे. संचमान्यता फायनल झाल्यानंतरच शिक्षक भरती होईल, त्यातही झेडपी शाळांची भरती प्रथम होणार आहे.

 1. राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका शाळांसह खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील साडेतीन लाख विद्यार्थ्यांनी अजूनही आधारकार्ड संबंधित शाळेत दिलेले नाही. दुसरीकडे पाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या ‘आधार’मध्ये त्रुटी आहेत. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शाळांना १५ मेपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर मुदतवाढ दिलेली नाही.
 2. सध्या उन्हाळा सुट्ट्यांमुळे शाळा बंद असल्याने साधारणतः ३० जूनपर्यंत मुदत दिली जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तत्पूर्वी, संबंधित शाळांना त्या विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व आधारमधील दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. संचमान्यता पूर्ण झाल्यानंतरच शिक्षकांची ५० टक्के रिक्तपदे (अंदाजे ३२ हजार) भरली जाणार आहेत. त्यातही सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळांमधील रिक्तपदे भरली जातील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
 3. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षक भरती मेरिट यादीनुसार होणार असून त्यासाठी एका पदाला एकच उमेदवार दिला जाणार आहे. तर खासगी शाळांमधील शिक्षक भरतीसाठी एका पदासाठी दहा उमेदवारांची मुलाखत होऊन त्यातून एकाची निवड केली जाणार आहे.
 4. बारा टक्के विद्यार्थ्यांकडे अजूनही ‘आधार’ नाही – राज्यातील सर्वच शाळांमध्ये दोन कोटी आठ लाख विद्यार्थी आहेत. यंदाच्या संचमान्यतेसाठी आधारकार्ड व तेही अचूक आधार असलेल्याच विद्यार्थ्यांचीच पटसंख्या ग्राह्य धरली जात आहे. त्यामुळे आता दीड महिन्यात संबंधित शाळांना त्यांच्याकडील सर्वच विद्यार्थ्यांचे आधारकार्ड मिळवावे लागणार आहेत. एखाद्या शाळेतील ३० विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्यास तेथील एक शिक्षक अतिरिक्त ठरणार आहे. ही कारवाई अटळ आहे. अजूनही १२ टक्के म्हणजेच अडीच ते तीन लाख विद्यार्थ्यांनी आधारकार्ड शाळांमध्ये जमा केलेले नाही. त्यांना आता अंदाजे दीड महिन्यांचीच (३० जूनपर्यंत) मुदत असणार आहे.
 5. आता ‘अंतरिम’ संच मान्यता – आधारकार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांकडून कार्ड काढून घ्या, आधारमधील चुकीची दुरुस्ती करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शाळांना सुरवातीला ३० एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. तांत्रिक अडचणींमुळे त्यासाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र, अजूनही बऱ्याच शाळांचे काम १०० टक्के झालेले नाही. त्यामुळे आता शालेय शिक्षण विभागाने ८० ते ९९ टक्के काम झालेल्या शाळांची संचमान्यता सुरवातीला अंतरिम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या शाळांनी १०० टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण केल्यानंतर संचमान्यता अंतिम करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

ZP School Results

ZP School Result 2023 updates – As you know Every year, the results of Zilla Parishad schools are announced on Maharashtra Day. This year too, Guruji has prepared the result sheet in all the schools. Students-parents are also affected by the result. However, on the eve of the verdict, the verdict has been postponed for five days. Instead of Maharashtra Day, this year the government has ordered to give this result on Chhatrapati Shahu Maharaj Memorial Day i.e. 6th May.

So, the students who were waiting for the result were very disappointed. Apart from this, a letter has also been issued regarding the result. Maharashtra Day is on 1st May and Rajarshi Chhatrapati Shahu year ends on 6th May. On the occasion of Maharashtra Day and Chhatrapati Shahu Maharaj’s commemoration centenary commemoration, school results should be declared and mark sheets distributed on 6th May. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

दरवर्षी महाराष्ट्रदिनी जिल्हा परिषदेच्या शाळांचा निकाल जाहीर करण्यात येतो. यंदाही सर्व शाळांमध्ये गुरुजींनी निकालपत्रक तयार करून ठेवले आहे. विद्यार्थी -पालकांनाही निकालाची ओढ लागलेली आहे. मात्र, निकाल लागण्याच्या पूर्वसंध्येला हा निकाल पाच दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनाऐवजी या यंदा छत्रपती शाहू महाराज स्मृतिदिनी अर्थात ६ मे रोजी हा निकाल देण्याचे शासनाने आदेश काढले आहेत. त्यामुळे निकालाच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची घोर निराशा झाली.

 1. राज्यातील प्राथमिक व उच्च शाळा सुरू करण्याबाबत शासनाने सूचना प्राथमिक शाळांच्या कालावधीमध्ये केल्या एकवाक्यता आणण्यासाठी २०२३ ची उन्हाळ्याची सुटी व आगामी शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासनाने सूचना केल्या आहेत.
 2. या शिवाय निकालासंदर्भातही पत्र काढले आहे. एक मे रोजी महाराष्ट्र दिन असून, राजर्षी छत्रपती शाहू वर्षाची सांगता ६ मे रोजी होत आहे. महाराष्ट्र दिन आणि छत्रपती शाहू महाराज स्मृतिदिनी महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर ६ मे रोजी शाळांचा निकाल जाहीर करावा व गुणपत्रकांचे वाटप करावे.
 3. निकालासोबत विविध उपक्रमांचे आयोजन करून शाहू महाराजांचा स्मृतिदिन साजरा करावा अशा सूचना शिक्षण संचालक यांनी दिल्या आहेत. या पत्रानुसार मुलांना सहा मे रोजी निकालासाठी बोलावले जाणार आहे. या बाबतच्या सूचना तालुका गटशिक्षणाधिकारी यांना दिल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रभारी उपशिक्षणाधिकारी कोळी यांनी दिली.

ZP Teachers Bharti 2023

Zilha Parishad Shcool Bharti 2023 in March for 30000 teachers posts. Zilla Parishad will conduct recruitment in schools till the end of March 2023. There was no teacher recruitment in the last four years, so now 30,000 new teachers will be recruited in Zilla Parishad schools. A total of 29 thousand 600 teacher posts are vacant in Zilla Parishad schools, 30,000 thousand new teachers are going to be recruited to fill these vacancies. The detailed information about when this recruitment will take place and how the recruitment process will be is given on the link below.

ZP Nashik Teacher Bharti-राज्यात उर्दू शिक्षकांची 3 हजार पदे रिक्त

मागील चार वर्षांत शिक्षक भरती झालेली नव्हती, त्यामुळे आता जिल्हा परिषद शाळांमध्ये 30,000 नवीन शिक्षकांची भरती होणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकूण 29 हजार 600 शिक्षकांची पदे ही रिक्त आहेत, ही रिक्त पदे भरण्यासाठीच ही 30,000 हजार शिक्षकांची नवीन भरती होणार आहे.ही भरती कधी होणार, कशी असेल भरती प्रक्रिया याची सविस्तर माहिती खालील लिंक वर दिलेली आहे.

ZP Teachers Recruitment 2023 Complete details

Shikshak Bharti: राज्यात पुढील दोन महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती…

Maha TAIT Exam 2023- टेट’ परीक्षा ऑनलाईन लिंक उपलब्ध ; लगेच अर्ज करा

Maha TET 2023- १० हजार केंद्रांवर फेब्रुवारीअखेरीस TET परीक्षा

ZP Teachers Bharti 2023


ZP Shikshak Bharti 2023: There is good news for the candidates who are waiting for Zilla Parishad Teacher Recruitment. Vacancies of center heads in Zilla Parishad schools in the state will be filled. Half of the vacant posts of center heads in Zilla Parishad schools will be filled through promotion and half through departmental competitive examination.

 • राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील केंद्रप्रमुखांच्या सध्या रिक्त असलेल्या जागांपैकी ५० टक्के जागा पदोन्नतीने तर ५० टक्के जागा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असणाऱ्या केंद्रप्रमुखांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत.
 • राज्यात केंद्रप्रमुखांची सेवानिवृत्ती, राजीनामा, बडतर्फी यामुळे रिक्त असलेली पदे यापुढे जशी पदे जसजशी रिक्त होतील, तसतशी ५० टक्के पदे पदोन्नतीने तर ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या-त्या कोट्याच्या मर्यादेत भरण्यास मान्यता दिल्याचा अध्यादेश शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी काढला आहे. राज्यात जिल्हा परिषदांच्या सर्व प्राथमिक शाळांत सर्वांसाठी शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन, सतत उपस्थिती टिकवणे व शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी चार हजार ८६० केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करून १० जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी एका केंद्रप्रमुखाचे पद निश्चित करण्याबाबतचा निर्णय शासनाने यापूर्वी घेतला आहे. त्यानुसार एकूण चार हजार ८६० केंद्रप्रमुखांची पदे निर्माण करण्यात आली आहेत.
 • जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील उर्दू शाळांची संख्या विचारात घेऊन केंद्रप्रमुखाची पदे निश्चित करावीत, अशी सूचनाही करण्यात आली आहे. विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणार आहेत. विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षाद्वारे केंद्रप्रमुखांच्या निवडीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन शासन निश्चित करेल, अशा परीक्षा यंत्रणेमार्फत आयोजित करण्यात येणार आहेत. या परीक्षा यंत्रणेकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात येतील आणि अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे.
 • राज्यात केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. यापूर्वी ही पदे ४० :३०:३० या प्रमाणात भरण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्यांची अंमलबजावणी झाली नाही. सध्या पुणे जिल्ह्यात केंद्र प्रमुखांची ३०५ पदे मंजूर असून, प्रत्यक्षात मात्र केवळ १२३ केंद्रप्रमुख कार्यरत आहेत. सध्या एका केंद्रप्रमुखाकडे दोन ते तीन केंद्रांची अतिरिक्त जबाबदारी आहे. हवेली तालुक्यात २१ केंद्रप्रमुखांची पदे असून, प्रत्यक्षात ९ जण काम सांभाळतात. केंद्रप्रमुख हे शिक्षण विभागामधील प्रशासकीय यंत्रणेतील सर्वांत शेवटचा भाग असतात. त्यामुळे नव्या निर्णयाप्रमाणे पदभरती लवकरच होणे गरजेचे आहे.

ZP Shikshak Bharti 2022: There is good news for the candidates who are waiting for Zilla Parishad Teacher Recruitment. A total of 30 thousand posts of teachers will be recruited in Zilla Parishad soon. It is mandatory to pass TET and TET exam for teacher recruitment. Candidates who have cleared TET and TET exam will be recruited as teachers through Pavitra portal. Read More details are given below.

खुशखबर! जि.प.च्या ३० हजार शिक्षकांची भरती होणार

कमी पटसंख्या (२० पेक्षा कमी) असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा जवळील शाळांमध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांमध्ये २९ हजार ६०० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यासाठी फेब्रुवारीत ‘टेट’ होणार असून मार्चमध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर जूनपूर्वी गुणवत्तेनुसार संबंधित शिक्षकांना पवित्र पोर्टलद्वारे थेट नियुक्ती दिली जाणार आहे. राज्यात जिल्हा परिषदेसह पहिली ते आठवीपर्यंतच्या जवळपास ९७ हजार शाळा असून त्यात सव्वादोन कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषदेच्या जवळपास १४ हजार शाळांची पटसंख्या २०पेक्षाही कमी आहे.

 • त्या शाळांमध्ये विद्यार्थी कमी आणि शिक्षक जास्त अशी स्थिती आहे. त्यामुळे पटसंख्या जास्त असलेल्या शाळांवर शिक्षक कमी पडू लागले आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली आहेत. मागील चार वर्षांत शिक्षक भरती झालेली नाही.
 • या पार्श्वभूमीवर आता पहिली ते आठवीच्या शाळांवरील शिक्षकांसाठी टीईटी तर नववी ते अकरावीपर्यंत शाळांवरील शिक्षकांसाठी ‘टेट’ परीक्षा घेण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. फेब्रुवारीत ही परीक्षा होणार असून त्यासाठी सहा हजारांहून अधिक केंद्रे असतील. साडेतीन ते चार लाख उमेदवार परीक्षा देतील, असा अंदाज शालेय शिक्षण विभागाने वर्तविला आहे.
 • परीक्षेपूर्वी शालेय शिक्षण विभाग परीक्षेच्या नियोजनासंदर्भात उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे. परीक्षेचा निकाल जाहीर होताच, भरती प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

‘खासगी’त मुलाखतीद्वारे भरती

टीईटी व टेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होईल. खासगी संस्थांमध्ये शिक्षक भरतीसाठी देखील ‘टेट’ उत्तीर्णचे बंधन आहे. भरती करण्यासाठी एका पदासाठी दहा उमेदवारांना बोलावणे आवश्यक आहे. त्यांची मुलाखत घेऊन खासगी संस्थांवर शिक्षक भरती करावी, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. गुणवत्तेनुसार थेट भरती देखील करण्याचा अधिकार खासगी संस्थांना देण्यात आला आहे. त्याचे रेकॉर्ड संस्थांना जतन करून ठेवणे बंधनकारक आहे. शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी जूनपूर्वी मोठी शिक्षक भरती होईल, असेही सांगण्यात आले.

जिल्हा परिषद शाळांची स्थिती

 • ६०,९१२ – एकूण शाळा
 • ४३,५५,०७० – एकूण विद्यार्थी
 • २,१४,६६० – शाळांवरील शिक्षक
 • २९,६०० – रिक्तपदे

ZP Shikshak Bharti 2022- Latest updates regarding ZP Riagad Shikshak Bharti 2022 is that Out of 6,952 sanctioned posts of teachers in Raigad district, 1,218 posts are vacant. Due to these vacancies, the work of working teachers in Zilla Parishad schools is under great stress. Read More details are given below.

अलिबाग  गावे-वाड्यांमधील गोरगरिबांना शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात; परंतु अपुऱ्या मनुष्यबळामुळे जिल्ह्यातील कार्यरत शिक्षकांवर मोठा ताण पडतो आहे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात शिक्षकांची जवळपास १,२१८ पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यात मुख्याध्यापक, उपशिक्षक व पदवीधर शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.

रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या १६ लाख असून दोन हजारांहून अधिक गावे-वाड्या आहेत. डोंगर-दऱ्यात, दुर्गम भागात राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले आहेत. जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या २,६०३ शाळा असून ९५, ९८३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये ५,७४९ शिक्षक कार्यरत आहेत. त्यात ४६ मुख्याध्यापक, ४ हजार ७६१ उपशिक्षक, व ९४२ पदवीधर आहेत. मंजूर पदांपैकी तीस टक्के शिक्षकांची पदे रिक्त आहेत. तरीदेखील गुणवत्ता वाढीसाठी जिल्ह्यातील कार्यरत शिक्षक प्रयत्न करीत आहेत. त्यात शासनाच्या वेगवेगळ्या योजना, निवडणुकीची कामे शिक्षकांना करावी लागतात.

एकट्या रायगड जिल्ह्यात शिक्षकांच्या ६,९५२ मंजूर पदांपैकी १,२१८ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे जिल्हा परिषद शाळेतील कार्यरत शिक्षकांच्या कामांवर प्रचंड ताण पडत असून एका शिक्षकाच्या खांद्यावर एक ते दोन शाळांचा भार पडतो आहे; तर काही शिक्षकांना प्रशासकीय कामांत घेतले जात असल्‍याने शाळेतील एका शिक्षकावर संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी पडते; तर दुसरीकडे अध्यापनाचे शिक्षण घेऊन हजारो तरुण नोकरीविना बेरोजगार आहेत. सरकारकडून शिक्षकांची भरती करण्यात येत नसल्‍याने बेरोजगारीचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे, तर काही तरुणांनी घरगुती शिकवणी, खासगी क्‍लासमध्ये शिकवण्यास सुरुवात केली आहे.

जिल्ह्यात केवळ ८६ केंद्रप्रमुख

शाळांमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रप्रमुख असतात. पंचायत समिती व शाळांमधील दुवा म्हणून केंद्र प्रमुखांकडे पाहिले जाते. जिल्हा परिषद व सरकारच्या वेगवेगळ्या योजना, निर्णय यांच्यामार्फत शिक्षकांपर्यंत पोहचविण्याचे काम केले जात आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये आठवड्यातील दोन तास तासिका घेणे, शाळांची माहिती गोळा करणे, शाळांना मार्गदर्शन करणे अशी कामे असून प्रत्येक केंद्र प्रमुखाकडे १५ शाळांचा भार दिला जातो; परंतु जिल्ह्यात केंद्र प्रमुखांची २२८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ८६ केंद्र प्रमुख कार्यरत आहेत, तर उर्वरित पदे रिक्‍त आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे एका केंद्र प्रमुखाकडे सुमारे ३५ शाळांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


ZP Shikshak Bharti 2022: Latest updates regarding Zilha Parishad Teachers recruitment is that in Zilha parishad School there is a total 19,452 vacancies are vacates of Teachers Posts due to Teachers have not been recruited for many years. The number of vacant posts in Zilla Parishad schools is 18 thousand, according to the roster, 16 thousand 748 posts of Marathi medium and 1309 posts of Urdu medium are vacant.  However, the number of Zilla Parishad teachers has increased by 1 thousand 401 vacancies in the state in a single month.Read More details about ZP Shikshak Bharti 2022 are given below.

ZP Ratnagiri Bharti – मराठी शिक्षकांची ८४८ पदे रिक्त

 अमरावती :  राज्यभरात जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या नुकत्याच आंतरजिल्हा बदल्या पार पडल्या. आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांचे जिल्हानिहाय रिक्त पदांचे रोस्टर जाहीर करण्यात आले होते. जाहीर केलेल्या रोस्टर नुसार राज्यात मराठी माध्यमाची १६ हजार ७४८ पदे रिक्त दाखविण्यात आली, तर उर्दू माध्यमाची १ हजार ३०१ पदे रिक्त दाखविण्यात आली होती. अशी राज्यभरात एकूण जिल्हा परिषद शिक्षकांची १८ हजार ४९ पदे रिक्त होती. मात्र, एकाच महिन्यात राज्यात जिल्हा परिषद शिक्षकांची १ हजार ४०१ रिक्त पदांची संख्या वाढल्याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारातून पुढे आली आहे.

ZP Shikshak Bharti 2022

 माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार पुणे येथील प्रदीप दराडे यांनी माहिती मागविली होती. त्यानुसार आता राज्यात जिल्हा परिषद शिक्षकांची १९ हजार ४५२ पदे रिक्त असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे येथील जन माहिती अधिकारी सचिन रेमजे यांनी दिली आहे. ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक या ‘पीटीआर’ नुसार शिक्षकांच्या नेमणुकांना मंजुरी दिली जाते.

 सध्या याच पटसंख्येच्या आधारावर जिल्हा परिषदांच्या शाळांत शिक्षकांच्या मंजूर असलेल्या २ लाख १९ हजार ४२८ पदांपैकी १ लाख ९९ हजार ९७६ पदांवर शिक्षक कार्यरत असून तब्बल १९ हजार ४५२ पदे अद्यापही रिक्त आहेत. तर यात महापालिका, नगर परिषद शाळा, छावणी शाळा येथील रिक्त पदांचा समावेश केल्यास राज्यात एकूण शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या ३१ हजार ४७२ एवढी होते. खासगी अनुदानित शाळा, अनुदानित आश्रम शाळा, शासकीय आश्रम शाळा येथील रिक्त पदे ही वेगळीच आहेत.


ZP Shikshak Bharti 2022: Latest updates regarding Zilha Parishad Teachers recruitment is that in Zilha parishad School there is a total 18,000 vacancies are vacates of Teachers Posts due to Teachers have not been recruited for many years. The number of vacant posts in Zilla Parishad schools is 18 thousand, according to the roster, 16 thousand 748 posts of Marathi medium and 1309 posts of Urdu medium are vacant. Read More details about ZP Shikshak Bharti 2022 are given below.

राज्यात २०११ पासून शिक्षक भरतीवर बंदी होती. ती २०१२ मध्ये उठविण्यात आली. मात्र, साडेतीन वर्षे लोटूनही शिक्षक भरती झालेली नाही त्यामुळे राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १८ हजारांवर पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक या ‘पीटीआरनुसार शिक्षकांच्या नेमणुकांना मंजुरी दिली जाते. सध्या याच पटसंख्येच्या आधारावर मंजूर असलेल्या पदांपैकी १८ हजारोवर पदे रिक्त आहेत.

  जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १८ हजारांवर पदे रिक्त

ZP Teachers Recruitment 2022

२०१९ मध्ये ‘पवित्र पोर्टल आणून शासनाने शिक्षक भरती ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी २०१९ च्या डिसेंबरमध्ये शिक्षक भरतीची अभियोग्यता चाचणीही घेण्यात आली. पावणेदोन लाख डीएड, बीएडधारकांनी ही परीक्षा दिल्यानंतर केवळ चार ते पाच हजार उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या. सध्या कार्यरत शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यासाठी. रिक्त पदांचे रोस्टर जाहीर करण्यात आले आहे.

ZP Teachers Recruitment 2022- Vacancy Details

ZP Shikshak Bharti 2022

ZP Shikshak Bharti 2022- Vacancy Details

Sr. No District  No. of Vacancy 
1. Ahmednagar  347
2. Akola  288
3 Amravati   320
4 Aurangabad  569
5 Beed  441
6 Bhandara 308
7 Buldhana 173
8 Chandrapur 204
9 Dhule  321
10 Gadchiroli  265
11 Gondia  291
12 Hingoli  87
13 Jalgaon  363
14 Jalna  203
15 Kolhapur  972
16 Nagpur  769
17 Nanded  732
18 Nandurbar 345
19 Nashik  531
20. Palghar  1916
21 Yavatmal  1307
22  Parbhani  346
23  Pune  161
24 Raigad  1051
25 Ratnagiri  848
26 Sangli  666
27 Satara  1023
28  Sindhudurg  576
29 Solapur  484
30 Thane  541
31 Wardha  204
32 Washim  123
  Total  16, 748

ZP Shiskshak Bharti 2022: Latest updates regarding Zilha Parishad Teachers recruitment is that in Zilha parishad School there is a total 450 vacancies are vacates of Teachers Posts due to Teachers have not been recruited for many years. More than 450 teachers in Zilla Parishad schools will be recruited soon. Read More details regarding ZP Teachers Recruitment 2022 are given below.

जिल्हा परिषद शाळांमध्ये ४५०हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे ४५०हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिकविणारेच अपुरे असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. राज्य सरकारने शिक्षक भरती थांबविल्याने ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था धोक्यात आली आहे.

ZP Teachers Recruitment 2022

 • ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालये अशी व्यवस्था उभारण्यात आली आहे. गत अनेक वर्षांपासून शिक्षक भरती घेण्यात आली नाही. भंडारा जिल्ह्यात शिक्षकांचा अनुशेष वाढू लागला आहे.
 • शिक्षणासारख्या गंभीर विषयावर राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. समायोजनाच्या नावावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे.
 • ही परिस्थिती असतानाच गेल्या १८ वर्षांपासून घड्याळी तासिका शिक्षकांचे मानधन वाढविण्यात आले नाहीत. बीए बीएड, पदवीधर तथा अन्य घड्याळी तासिका शिक्षक म्हणून कार्य करीत आहेत. या शिक्षकांना तीन हजार रुपयांचे तुटपुंजे मानधन देण्यात येते.
 • समाधानकारक मानधन देण्यात येत नसल्याने गावातील शिक्षित तरुण घड्याळी तासिका शिक्षक म्हणून काम करण्यास नकार देत आहेत.
 • जिल्हा परिषद शिक्षकांची पदे रिक्त असल्याने पहिली ते चौथीचे वर्ग एक किंवा दोन शिक्षक सांभाळतात. ही पोकळी भरून काढण्याची क्षमता घड्याळी तासिका शिक्षकांत आहे.
 • राज्य शासनाने शिक्षक भरती थांबविली असली तरी घड्याळी तासिका शिक्षक भरतीकडे पाठ फिरविली आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे, घड्याळी तासिका शिक्षकांचे मानधन वाढविणे गरजेचे असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

एमपीएससी’ची धास्ती
आतापर्यंत शिक्षक बनण्यासाठी डीएड, बीएड व त्यानंतर टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. परंतु, आता एमपीएससीमार्फत शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत शासनपातळीवर हालचाली सुरू आहेत. त्यामुळे शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या राज्यातील हजारो तरुणांमध्ये धास्ती पसरली आहे. एमपीएससीचे दिव्य पार केल्यानंतरच पुढे शिक्षक होता येणार आहे


ZP Teacher Bharti 2022: There are 88 vacancies for teachers in Shrigonda taluka. With over 88 vacancies for teachers, the workload on teachers has increased. Although it has been almost 15 days since the start of Shrigonda Zilla Parishad school, many schools are facing educational neglect due to lack of teachers. Read More details as given below.

या तालुक्यात शिक्षकांच्या तब्बल 88 जागा रिक्त

श्रीगोंदा जिल्हा परिषदेची शाळा सुरू होऊन जवळपास 15 दिवस उलटले, तरी अनेक शाळांमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड होत आहे. शिक्षकांच्या तब्बल 88 जागा रिक्त असल्याने शिक्षण विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

श्रीगोंदा तालुक्यात खासगी शाळांचे मोठे पेव फुटले आहे. या शाळांमधून मिळणार्‍या सेवासुविधा, शिक्षण याच्यांशी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना स्पर्धा करावी लागते आहे. तालुक्यातील बहुतांश शाळांचा दर्जा चांगला असल्याने विद्यार्थी पट मोठा आहे. वस्ती शाळांमधूनही वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध केल्या गेल्याने काही वर्षात विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळांकडे कल वाढला आहे.

श्रीगोंदा तालुक्यात खासगी शाळांचे मोठे पेव फुटले आहे. या शाळांमधून मिळणार्‍या सेवासुविधा, शिक्षण याच्यांशी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना स्पर्धा करावी लागते आहे. तालुक्यातील बहुतांश शाळांचा दर्जा चांगला असल्याने विद्यार्थी पट मोठा आहे. वस्ती शाळांमधूनही वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध केल्या गेल्याने काही वर्षात विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळांकडे कल वाढला आहे.


ZP Teacher Bharti 2022- As per the lastes news, 165 vacancies in various schools in Khed taluka, There are 1594 teachers and 35 center heads working for 402 primary schools in the taluka. However, there are 165 vacancies for Headmaster, Graduate Teacher, Deputy Teacher and Head Master.

Out of 1218 posts of Deputy Teachers in Khed taluka, 89 posts are vacant. Out of 314 posts of graduate teachers, 23 posts are vacant. Out of 62 posts of Headmaster, 36 posts are vacant. Out of 35 posts of Center Head, 17 posts are vacant. Out of 1629 such posts, 165 posts are vacant.

खेड तालुक्‍यातील विविध शाळांमध्ये 165 पदे रिक्‍त

खेड तालुक्‍यातपुढील शैक्षणिक वर्षाची जिल्हा परिषदेच्या शाळांची तयारी सुरु झाली आहे. शिक्षकांसह शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याकर भर दिला जात आहे.

तालुक्‍यातील 402 प्राथमिक शाळांसाठी 1594 शिक्षक व 35 केंद्रप्रमुख कार्यरत आहेत. मात्र, मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक, उपशिक्षक, केंद्रप्रमुख यांच्या 165 जागा रिक्‍त आहेत. त्यामुळे करोनाच्या कहरानंतर आता शिक्षण क्षेत्रात दर्जा आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

2 वर्षे महामारी आणि आर्थिक नियोजन कोलमडले. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची फी भरणे त्यांना परवडत नाही. यामुळे पालक वर्ग हैराण झाला आहे. खेड तालुक्‍यात जिल्हा परिषद शाळांच्या इमारती आणि त्यात भौतिक सुविधा समाधानकारक आहेत विद्यार्थ्यांना विविध आवश्‍यक सुविधा शाळेत उपलब्ध केल्या जातात. शिवाय फीचा तगादा नसल्याने पालकांना दिलासा आहे.

शहरातील अनेक विद्यार्थी मराठी शाळांमध्ये शिक्षणासाठी जात आहेत. शाळा इमारती, परिसर स्वच्छता, शौचालये, संरक्षक भिंती, इ- लर्निंग सुविधा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांची सोय होत आहे. तालुक्‍यातील अनेक शाळांची गुणवत्ता इंग्रजी माध्यमाच्या शाळांपेक्षा जास्त आहे.

निसर्ग चक्रीवादळात तालुक्‍यातील अनेक शाळांना फटका बसला. त्या शाळांच्या दुरुस्तीला झेडपीकडून कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला. जुन्या जीर्ण 60 शाळांची दुरुस्ती झाली नाही. 138 शाळांमध्ये मुलींसाठी व 120 शाळांमध्ये मुलांसाठी शौचालये नाही. तालुक्‍यात 163 शाळांना गरजेनुसार संरक्षण भिंत बांधल्या नाहीत. 402 शाळांपैकी 34 शाळांमध्ये इ- लर्निंगचे संच नाहीत

खेड तालुक्‍यात उपशिक्षकांची 1218 पदापैकी 89 पदे रिक्‍त आहेत. पदवीधर शिक्षकांची 314 पदापैकी 23 पदे रिक्‍त आहेत. मुख्याध्यापकांच्या 62 पदापैकी 36 पदे रिक्‍त आहेत. केंद्रप्रमुख 35 पदापैकी 17 पदे रिक्त आहेत. अशी एकूण 1629 पदांपैकी 165 पदे रिक्त आहेत.


In Zilla Parishad various posts are vacant like Head, Headmaster and Teachers.  There is total 719 vacancies available in various Taluka. Read More details are given below.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १६१ केंद्रप्रमुख, १८१ मुख्याध्यापक व ४२४ शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शिक्षक संख्येचे गणित बिघडले आहे. त्यामुळे अतिरिक्त कामाचा ताण शिक्षकांवर येत असून त्याचा परिणाम गुणवत्तेवर होत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणिक प्रगतींसाठी शिक्षण विभाग मागील काही वर्षांपासून प्रयत्न करीत आहे.

त्यांचा चांगला परिणामही जिल्हात जिल्ह्यात दिसून आला आहे . मात्र कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. दरम्यान जिल्ह्यात अनेक वर्षांपासून संचमान्यता झाली नसल्याने तसेच अनेक जागा रिक्त असल्याने शिक्षक संख्येचे गणित बिघडले आहे. असल्याचे मुख्यध्यापकांना पदभार शिक्षकानं पाहावं  लागतो. त्यामुळे अध्यापनाकडे दुर्लक्ष होतो.

शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला समायोजन होणे आवश्यक आहे. मात्र, अर्धे सत्र निघून जाते. तरीही जागा रिक्तच राहतात. त्यामुळे शिक्षणिक प्रक्रियेला बाधा निर्माण होते. सेवानिवृत्त, मृत्यू व अन्य कारणांनी जागा रिक्त झालेल्या आहेत. त्या समायोजन व मुख्याध्यक पदोन्नती प्रक्रियेने लवकर भरण्यात याव्या, अशी मागणी शिक्षण संघटनांमधून पुढे येत आहे.

Most of the posts of subject teachers are vacant in Zilla Parishad schools in the district. This makes it difficult to teach the next fifth grade. There has been a demand for appointment of subject teachers for many years.

Shikshak Bharti-शिक्षण विभागात प्राचार्यांची पदे रिक्त

Shikshak Bharti- शिक्षक विभागाकडून मुलाखतीसाठी निवड यादी लवकरच

एकीकडे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाने गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त पदांचे ग्रहण आहे.

TET Exam- येत्या सप्टेंबर ते डिसेंबर मध्ये 2 टप्प्यात TET परीक्षा…

 जिल्ह्यात सर्वाधिक ८४ रिक्त पदे साक्री तालुक्यातील आहेत. त्याखालोखाल शिरपूर तालुक्यात ६५, शिंदखेडा तालुक्यात ६३ तर धुळे तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ४३ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमध्ये पदवीधर विषय शिक्षकांची संख्या सर्वात जास्त असून, रिक्त पदे त्वरित भरण्याची गरज आहे.

 विषय शिक्षकांची पदे सर्वाधिक रिक्त 

जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये विषय शिक्षकांची सर्वाधिक पदे रिक्त आहेत. यामुळे पाचवीच्या पुढील वर्गांना शिकविण्यात अडचणी येत असतात. विषय शिक्षकांची नियुक्ती करावी अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र त्याकडे अद्यापही लक्ष देण्यात आलेले नाही.याचा गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला आहे.

जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी विषय शिक्षकांची नियुक्ती करण्याची गरज आहे. विषय शिक्षक नसल्याने, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असतो. त्यामुळे या शिक्षकांची लवकर नियुक्ती झाली पाहिजे.


ZP Shikshak Bharti 2022 – There are 23 thousand 435 vacancies for teachers in Zilla Parishad schools.In Hingoli, Nanded, Akola, Yavatmal, Nagpur, Chandrapur and Gadchiroli districts of the state, there is not a single vacancy for class I to V. However, many posts of teachers for class VI to VIII are vacant

23,000 vacancies for teachers- राज्यात एकीकडे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाने गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार ४३५ जागा रिक्त (23,000 vacancies for teachers) आहेत. त्याचा परिणाम प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमावर (Impact on Advanced Educational Maharashtra Initiatives) होत आहे. शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेतही अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. (23,000-vacancies-for-teachers-in-the-state)

एकीकडे अतिरिक्त शिक्षकांची संख्या मोठी असताना दुसरीकडे रिक्त पदांची संख्या त्यापेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे या अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन करून उर्वरित रिक्त जागांवर नव्याने शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याची गरज आहे. खासगी शाळेतील शिक्षकांचे जि. प. शाळेत समायोजन करण्यास जि. प. प्राथमिक शिक्षक संघटनांचा विरोध आहे

राज्यातील हिंगोली, नांदेड, अकोला, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पहिली ते पाचवीच्या वर्गाचे एकही पद रिक्त नाही. मात्र, सहावी ते आठवीच्या वर्गासाठी असलेल्या शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. चंद्रपूर ७८१, हिंगोली ७४०, अकोला ७२१, नागपूर ५९८, गडचिरोली ५४१, अमरावती जिल्हात गटशिक्षणाधिकारी १४, शिक्षण विस्तार अधिकारी ३५, केंद्रप्रमुख १००, उच्चश्रेणी मुख्याध्यापक १००, विषय शिक्षक २६० सहायक शिक्षक ४२० यांचा समावेश आहे.

झेडपीच्या शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे

 • पहिली ते पाचवी : ८,२६१
 • सहावी ते आठवी : १४,९९५
 • नववी ते दहावी : १७९

एक हजारापेक्षा जास्त पदे रिक्त असणारे जिल्हे

 • पालघर : १,५१९
 • यवतमाळ : १,४०६
 • नाशिक : १,२८०
 • पुणे : १,२१५
 • नांदेड : १,१९७
 • जालना : १,१२५

जिल्हातील झेडपीच्या शाळांत विविध पदे रिक्त

ZP Bharti 2021

As per the latest news source the ZP School of Solapur have various posts of Head of Center and Principal. As there are 80 vacancies for 125 Center Heads and Headmasters in Zilla Parishad schools, the school management is being affected. Read More details as given

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील १२५ केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांची ८० पदे रिक्त असल्यामुळे शालेय व्यवस्थापनावर परिणाम होत आहे. जिल्हा परिषेदेच्या जिल्ह्यात 2 हजार 789 शाळा आहेत. या शाळांमध्ये 9 हजार 847 शिक्षकांची नियुक्ती आहे. विषय शिक्षक व मुख्याध्यापकांच्या पदोन्नत्या रखडल्या आहेत

कोरोना महामारीची भर पडल्याने गेले वर्षभर शिक्षकांचे प्रश्न सुटले नाहीत. सध्यस्थिती केंद्रप्रमुख १२५ व मुख्याध्यापकांची ८० जागा रिक्त आहेत. अशात आता ३१ मे अख्तर शिक्षक मोठ्या प्रमाणावर सेवानिवृत्त होणार आहेत. केंद्रप्रमुखची पदे मजूर असून फक्त ७५ जण कार्यरत आहेत.


zp bharti 2020 Application form

जिल्हा परिषदेत भरती प्रक्रिया सुरू

ZP Recruitment 2020 : As per the latest news regarding the Palghar ZP Bharti 2020 there are various seats are still vacant in various department. Due to insufficient staffing in Palghar district, the development of the district has been disrupted under zp bharti 2020. It is unfortunate that due to administrative instability as well as inadequate staffing, people are not working. Therefore, we have urged the Chief Minister to immediately fill the vacant posts of 6 percent vacant for the development of the district and take action against the absentee officers and employees without giving any leave, ”said Deputy Vice President Nilesh Sambre. Read the complete details carefully…

ZP Kolhapur Bharti 2020 Selection Lists

ZP Palghar Recruitment 2020

शासकीय कर्मचाऱ्यांच्या पदांमुळे जिल्ह्यातील अनेक प्रश्न तसेच राहिले असून विकास कामांना खीळ बसत असल्याने या पदांची तातडीने भरती करावी, अशी मागणी पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन केली आहे.

पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र तरीही जिल्ह्यातील पोलिस, महसूल, जिल्हा परिषद अशा विविध प्रशासकीय विभागांमध्ये ७५ टक्के जागा अजूनही रिक्त आहेत. त्यामुळे या जागा तातडीने भरण्यात याव्यात, अशी मागणी उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आदिवासीबहुल असलेल्या पालघर जिल्ह्याचा परिसर व कामाचा व्याप मोठा आहे. २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या जीवावर जनतेची कामे होत नाहीत. तसेच जिल्ह्यात विविध नवीन प्रकल्प आल्याने जिल्ह्यातील कामाचा प्रचंड ताण पडत असल्याने जिल्ह्याच्या विकासावर या सर्वांचा परिणाम होऊन जिल्हा निर्मितीचा उद्देशच साध्य झालेला नाही. पालघर जिल्ह्यातील सर्व कार्यालयांतील रिक्त पदांच्या तात्काळ भरतीबाबत संबंधित विभागांना आदेश द्यावेत, अशी मागणी सांबरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

पालघर जिल्ह्यात अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. प्रशासकीय अनास्थेमुळे तसेच अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे जनतेची कामे होत नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी ७५ टक्के रिक्त असलेल्या पदांची तातडीने भरती करावी आणि कोणतीही रजा न टाकता मनमानी पद्धतीने गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री महोदयांकडे केल्याची माहिती जिप उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांनी दिली.

अधिकारी-कर्मचारी वेळेवर उपस्थित रहात नसल्याबद्दल तक्रार

जिल्हा परिषदेची सत्ता हाती आल्यानंतर मागील १५ दिवस आपण स्वत: जिल्ह्यातील विविध प्रशासकीय कार्यालये, शाळा, आरोग्य केंद्रे यांना भेटी दिल्या असता बहुतांश विभागातील अधिकारी, कर्मचारी हे कार्यालयीन वेळेत उपस्थित रहात नाहीत, रजेच्या अर्जाची कुठेही नोंद न करता परस्पर सुट्टीवर असतात. तर अधिकारी वर्ग बैठकीच्या नावाखाली गैरहजर असतात. त्यामुळे जनतेची कामे होत नाहीत, अशी तक्रार पालघर जिल्हा परिषद उपाध्यक्ष

निलेश सांबरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. तसेच पाच दिवसांचा आठवडा केल्याने किमान कार्यालयीन वेळेत सर्वांनी हजर राहून जनतेची कामे करावीत यासाठी संबंधित विभागांना निर्देशित करावे, अशी मागणीही निलेश सांबरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सौर्स : मटा


झेडपीच्या शाळांत ६११ पदे रिक्त

ZP Nashik School Teachers Recruitment : As per the latest news source the ZP School of Nashik have the teachers shortage. Nashik ZP Teachers 611 vacant seats are still not filled. It has been reported that there are 611 vacancies for teachers in Zilla Parishad schools. The students staged a march on the Panchayat Samiti on Tuesday for not having a teacher to teach at the new Panjon in Nandgaon taluka. Therefore, the topic of vacant teacher posts has been discussed again. There are 3385 schools of the Zilla Parishad in the district, and around four lakh students study here. However, in every taluka there is an empty teacher’s. In particular, the number of vacant teachers in Malegaon, Yeola, Nandgaon and Surgana talukas is around 80. Read the complete details carefully given below:

ZP Nashik School Teachers Recruitment

सर्वाधिक संख्या नांदगाव, मालेगाव, येवला, सुरगाण्यात

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांत शिक्षकांची ६११ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. नांदगाव तालुक्यातील नवे पांझण येथे शिकवायला शिक्षक नाही म्हणून पंचायत समितीवर मंगळवारी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. त्यामुळे रिक्त शिक्षकांच्या पदांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३,३८५ शाळा असून, चार लाखांच्या आसपास विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. मात्र, प्रत्येक तालुक्यात रिक्त शिक्षकपदाची बोंब आहे. विशेष म्हणजे मालेगाव, येवला, नांदगाव व सुरगाणा तालुक्यात रिक्त शिक्षकांच्या पदाची संख्या ८० च्या आसपास आहे.

जिल्ह्यात ११ हजार ७९९ शिक्षकांची मंजूर पदे आहेत. त्यात ११ हजार १८८ शिक्षक कार्यरत आहेत. यात ६११ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक विभागाने एक जानेवारी रोजी एकत्रित केलेल्या माहितीत तालुकानिहाय मंजूर पदे व कार्यरत पदे यांचा तपशील दिला आहे. त्यात सर्वाधिक शिक्षकांची पदे नांदगाव तालक्यात असून, त्याची संख्या ८३ आहे. या तालुक्यासाठी ७१४ पदे मंजूर आहेत; पण केवळ ६३० शिक्षक येथे कार्यरत आहेत. नांदगावखालोखाल मालेगाव तालुक्यात हीच स्थिती आहे. येथे ८३ पदे रिक्त आहेत. तालुक्यात ११८९ शिक्षकांची पदे मंजूर असून, ११०६ पदे कार्यरत आहेत. सुरगाणा तालुक्यातही ८०, तर येवला तालुक्यात ७८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. तालुकानिहाय रिक्त शिक्षकांच्या पदात सर्वाधिक कमी दिंडोरी तालुक्यात १०, तर नाशिक तालुक्यात १४ पदे रिक्त आहेत.

तरी ६११ पदे रिक्त

२०१२ नंतर शिक्षकभरती बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रिक्त पदे होती; पण सप्टेंबर २०१७ नंतर ही बंदी उठवली. त्यानंतर जिल्ह्यात २०२ शिक्षक रुजू झाले. त्यानंतर अनुकंपा तत्त्वावरील भरती व आंतरजिल्हा बदलीतून बरेच शिक्षक मिळाले. त्यामुळे जून २०१९ मध्ये असलेली ११०० रिक्त पदांची संख्या कमी झाली. मात्र, आजही ६११ पदे रिक्त आहेत.

ऑनलाइनमुळे अधिकार नाहीत

शिक्षकांच्या बदल्या नेहमी चर्चेचा विषय होतो; पण आता ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या बदल्या होत असल्यामुळे त्याचे अधिकार प्रशासनाकडे नाहीत. त्यामुळे एखाद्या जागेवर शिक्षकांची संख्या कमी असली तरी तेथे तातडीने हे पद भरता येत नाही. त्यामुळे ही अडचण प्रशासनाची डोकेदुखी आहे. आंतरजिल्हा बदलीनंतर किंवा बडतर्फ शिक्षकाला रुजू करताना ही पदे भरता येणार आहेत. ही ऑनलाइन पद्धत २७ फेब्रुवारी २०१७ पासून सुरू झाली आहे.

सरकार कसे करणार

सरकारी शाळेत शिक्षणाचा दर्जा उंचावा, यासाठी राज्य सरकारचे एकीकडे प्रयत्न सुरू असले तरी दुसरीकडे शिक्षकच नसेल तर हा दर्जा कसा सुधारणार, हा प्रश्न आहे. दिल्लीच्या निवडणुकीत शाळांचा दर्जा सुधारल्याचा परिणाम दिसला. हा परिणाम महाराष्ट्रात दिसावा, यासाठी सरकार कसे करणार, हा प्रश्न आहे.

मुलांना चांगले शिक्षण मिळायला हवेच. त्यासाठी शिक्षकांची गरज आहे; पण रिक्त पदे भरण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला नाही. त्यामुळे राज्य सरकारकडे ही रिक्त पदे भरून नवीन शिक्षकांची भरती करावी, अशी मागणी केली आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे.

शिक्षकांची रिक्त पदे

तालुका – मंजूर पदे – कार्यरत पदे – रिक्त पदे

 1. बागलाण – ९३८- ९१२- २६
 2. चांदवड – ६६१- ६२५-३६
 3. देवळा – ४२३-४०२- २१
 4. दिंडोरी – ९४२- ९३२- १०
 5. इगतपुरी – ८९९- ८७२- २७
 6. कळवण – ६४९- ६३१- १८
 7. मालेगाव – ११८९- ११०६- ८३
 8. नांदगाव – ७१४- ६३०- ८४
 9. नाशिक – ५२२-५०८- १४
 10. निफाड – ९९९- ९५३- ४६
 11. पेठ – ५९३- ५६८-२५
 12. सिन्नर – ७८७-७६१-२६
 13. सुरगाणा – ८९९-८१९- ८०
 14. त्र्यंबकेश्वर -७४९-७१५- ३४
 15. येवला – ८२६- ७४८-७८
 16. पब्लिक स्कूल व कन्याशाळा -९-६ -३
 17. एकूण – ११७९९- १११८८-६११

सौर्स : मटा

जिल्हा परिषद संभाव्य प्रश्नसंच सोडवा 

ZP Bharti 2022 Syllabus

ZP Syllabus Download From the given link. The PDF of the zilla parishad Syllabus is available for downloading. All latest updates about ZP syllabus is given for downloading.

Practice Paper ZP Bharti

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
4 Comments
 1. Nisha Chavhan says

  How to apply for shikshak barti

 2. Admin says

  ZP Teachers Bharti 2023 Notification, Vacancy & Application Form

 3. Bhushan vilas Wagh says

  Please TET pass hai Bharti kra

 4. Bhushan vilas Wagh says

  Please Bharti kr ra

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!