बारावीच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना बोर्डाचा मोठा दिलासा

HSC Exam 021

HSC Exam 2021: The education department has given relief to the 12th standard students conducted by the state board. The Department of Education has allowed the students who are preparing for the subjects which have been canceled from the syllabus to appear for the examinations in these subjects only for this year.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

बारावीच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना बोर्डाचा मोठा दिलासा

अभ्यासक्रमातून रद्द झालेल्या जुन्या विषयांसह परीक्षा देणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाने मोठा दिलासा दिला आहे…

राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. अभ्यासक्रमातून रद्द झालेल्या विषयांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ या वर्षासाठीच या विषयांची परीक्षा देण्याची परवानगी शिक्षण विभागाने दिली आहे.

यंदाच्या वर्षापासून बारावीसाठी सुधारित विषय आणि मूल्यमापन योजना निश्चित केली आहे. यानुसार शाखानिहाय गट ए, बी, सी यामध्ये विषयांची विभागणी करण्यात आली असून काही विषय अभ्यासक्रमातून रद्द केले आहेत. ८ ऑगस्ट २०१९ रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला होता. मात्र ज्युनिअर कॉलेजे आणि शिक्षकांचे याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे शिक्षकांनी जुन्याच विषय योजनेनुसार विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू ठेवला. परिणामी जे विषय अभ्यासक्रमातून वगळले आहेत त्या विषयांची विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेच्या दृष्टीने तयारी केली. बारावी परीक्षेचे अर्ज भरतेवेळी ही बाब समोर आली. कारण जे विषय वगळण्यात आले होते. ते विषय परीक्षा अर्जात समाविष्ट नव्हते. या गोंधळानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी विषय कसे निवडायचे? निवडलेल्या नवीन विषयांचा एक-दोन महिन्यांत अभ्यास कसा करायचा, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना फक्त यंदाच्या वर्षापुरती जुन्या विषयांची परीक्षा देण्याची मान्यता दिली आहे. तसेच जुन्या विषयांची परीक्षा देणारे जे विद्यार्थी त्या विषयात किंवा अन्य विषयांत नापास होतील त्यांना पुन्हा तोच विषय घेऊन फेरपरीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.


HSC Exam 2021

HSC Exam 2021: The deadline for applying for Class XII examination has been extended once again. Applications for HSC 2021 examination can be submitted till 28th January with regular fee and till 6th February with late fee.

बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे अर्ज भरताना विषययोजनेसंदर्भात आणि काही तांत्रिक अडचणी येत असल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे मंडळाने कळवले आहे. आता HSC 2021 परीक्षेसाठी नियमित शुल्कासह २८ जानेवारीपर्यंत तर विलंब शुल्कासह ६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेसाठी नियमित शुल्कासह १९ ते २८ जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना या कालावधीत अर्ज भरणे शक्य होणार नाही अशा विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह २९ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान अर्ज भरण्याची संधी शिक्षण मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. अभ्यासक्रमातून रद्द झालेल्या विषयांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ या वर्षासाठीच या विषयांची परीक्षा देण्याची परवानगी शिक्षण विभागाने दिली आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना फक्त यंदाच्या वर्षापुरती जुन्या विषयांची परीक्षा देण्याची मान्यता दिली आहे. तसेच जुन्या विषयांची परीक्षा देणारे जे विद्यार्थी त्या विषयात किंवा अन्य विषयांत नापास होतील त्यांना पुन्हा तोच विषय घेऊन फेरपरीक्षा देण्याची संधी मिळणार आहे


SSC and HSC Exams 2021

SSC and HSC Exam Dates: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) will soon announce the dates of SSC (X) and XII (XII) examinations. The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education said it would announce the examination schedule this week.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा या आठवड्यात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जाहीर करणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी माहिती दिली. मे महिन्यात दहावीची परीक्षा तर १५ एप्रिलनंतर बारावीची परीक्षा आयोजित करण्यात टेणार असल्याचे पाटील यांनी सोमवारी सांगितले. तत्पूर्वी दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल-मे महिन्यात घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती.

मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे निवृत्त झाल्याने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कारभार दिनकर पाटील यांच्यावर सोपवण्यात आला आहे. या आठवड्यात आम्ही परीक्षांच्या तारखा जाहीर करू. विद्यार्थी, शिक्षक, पालकांना परीक्षांच्या तारखा पुरेशा वेळेआधी माहित असल्या तर त्यांना तयारीसाठी पूर्ण वेळ मिळेल, असे पाटील म्हणाले. दहावी-बारावी परीक्षा सर्वसाधारणपणे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतल्या जातात. पण यावर्षी कोविड-१९ महामारी स्थितीमुळे त्या विलंबाने घेण्यात येणार आहेत. परीक्षा ४० ते ४५ दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

पाटील म्हणाले, नुकतेच पुरवणी परीक्षांचे आयोजन मंडळाने केले होते. ही परीक्षा सुमारे दोन लाखांवर विद्यार्थ्यांनी दिली. परीक्षा सुरळीत पार पडली. दोन आठवड्यात निकाल जाहीर झाला. विद्यार्थ्यांना कोणतीही समस्या जाणवली नाही. याच पद्धतीने संपूर्ण सुरक्षा, खबरदारीसह नियमित परीक्षाही आम्ही आयोजित करू असा आम्हाला विश्वास आहे. दरम्यान, दहावीचे परीक्षा अर्ज भरण्याची मुदत २१ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.


SSC and HSC Exam 2021: Union Education Minister Ramesh Pokhriyal has announced the dates of the 10th and 12th CBSE Maharashtra Board Exam 2021 Date. After this, the State Board of Education is trying to conduct the 10th standard examination after 3 minutes and the 12th standard examination after 15th April, informed Education Minister Varsha Gaikwad.

दहावी, बारावी परीक्षा नेमकी कधी? शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य मंडळाच्या दहावी, बारावी परीक्षांविषयी माहिती दिली..

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ‘सीबीएसई’च्या दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा (Maharashtra Board Exam 2021 Date) जाहीर केल्या आहेत. यानंतर राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी दहावीची परीक्षा ३ मेनंतर आणि बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

करोनामुळे यंदा शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. तर, मुंबई आणि परिसर वगळता राज्यातील इतर भागात नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्या, तरी विद्यार्थी आणि पालकांचे परीक्षा कधी होणार, याकडे लक्ष होते. या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा तीन मेनंतर आणि बारावीची परीक्षा पंधरा एप्रिलनंतर घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली. त्याचप्रमाणे पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यासंदर्भात आणखी काही दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.

तसेच, राज्यातील करोनाची परिस्थिती आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडून माहिती घेऊनच शाळा सुरू करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. मुंबई-पुणे व्यतिरिक्त अनेक भागांमध्ये शाळा सुरू झाल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.


10th and 12th Exam

दहावी- बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच ! 23 एप्रिलनंतर होईल परीक्षा

 दहावी आणि बारावीच्या विषयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्‍यप्राय मानले जात आहे. दुसरीकडे बहुपर्यायी प्रश्‍नपत्रिकांद्वारे परीक्षा घेणेही विद्यार्थीहिताचे नाही. तर मे महिन्यातील उन्हाळा आणि जूनमधील पावसाळ्याचा अनुभव पाहता ही परीक्षा ऑफलाईनच घेतली जाणार असून 23 एप्रिलनंतर परीक्षा घेण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरु आहे.

ऑनलाइन परीक्षा अशक्‍य
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी असते. दुसरीकडे त्यांच्या विषयांची संख्याही खूप असल्याने ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्‍य आहे. परीक्षेचे वेळापत्रक ठरविण्यासंदर्भात लवकरच बैठक घेतली जाणार आहे.

दरवर्षी दहावी- बारावीची बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी- मार्चपासून सुरु होते. मात्र, यंदा कोरोनामुळे 15 जूनऐवजी 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. तत्पूर्वी, ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. मात्र, त्यातून विद्यार्थ्यांना एकतर्फीच शिक्षण मिळाले. आता 23 एप्रिलपर्यंत हे वर्ग सुरु राहणार असून त्यानंतर परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु झाले आहे. दरम्यान, जे विद्यार्थी शाळेत येत नाहीत, त्यांच्यासाठी गुगल मिटद्वारे ऑनलाइन शिक्षण देण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. 23 एप्रिलपर्यंत किमान 70 टक्‍क्‍यांपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्यादृष्टीने शिक्षकांना नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नववी ते बारावीपर्यंतच्या 25 हजार 866 पैकी साडेनऊ हजार शाळा सुरु झाल्या आहेत. दुसरीकडे 59 लाख 27 हजार 456 पैकी सुमारे चार लाखांपर्यंत विद्यार्थी शाळेत येत आहेत. त्यात दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे आता एक ते दीड महिना उशिराने दहावी- बारावीची परीक्षा घेण्याचे नियोजन युध्दपातळीवर सुरु झाले असून जानेवारीत बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर होईल, असेही सांगण्यात आले.

 सोर्स: सकाळ


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!