12th textbooks at e-Balbharati’s institute site

बारावी पाठ्यपुस्तके ई-बालभारतीच्या संस्थेतस्थळावर

The textbook for all XII subjects can be downloaded to the Student Parent School from http: // www.ebalbharti.in/; School Education Minister Pvt. Varsha Gaikwad has made an immediate decision to make the books available in the interest of the students, thus avoiding the loss of the students. At present, students and parents are not able to go out of the house as there is a lockout in the country to prevent the spread of Corona virus. Since the e-literature of this time course is available on the Child Bharat website, students can sit at home and study. At the same time, investigations are underway to make study materials available through All India Radio and Television.

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे. त्यात 12 वी ला जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या समोर पाठ्यपुस्तक बदलत असल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. या संदर्भात पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात राज्यभर पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देणे शक्य नसल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी घरी असतांनाही अभ्यासक्रम पूर्ण करता यावा यासाठी बारावी अभ्यासक्रमाचे साहित्य पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आले आहे.

विद्यार्थी पालक शाळा यांना बारावी ची सर्व विषयांची पाठ्यपुस्तके http;// www.ebalbharti.in/ या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे.; शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तात्काळ निर्णय घेऊन पुस्तके उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळणार आहे.<br> नवे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी नवी पुस्तके विद्यार्थ्यांना दुकानांमधून उपलब्ध होत असतात. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी असल्यामुळे विद्यार्थी व पालकांना घराबाहेर निघणे शक्य होत नाही. या कालावधित अभ्यासक्रमाचे ई साहित्य बालभारतीच्या वेबसाईटवर उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता येणार आहे. याच बरोबर आकाशवाणी, दूरदर्शनच्या माध्यमातून अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करुन देण्याबाबत देखील चाचपणी सुरु आहे.

ऑनलाईन उपलब्ध करण्यात आलेल्या पुस्तकांमधे मराठी. हिंदी, संस्कृत या सोबतच गणित, विज्ञान, तर्कशास्त्र. माहिती व तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. या सर्व पुस्तकां सोबत युवकभारती मराठी (मराठी), संस्कृत – अल्हाद (संस्कृत), पाली-पकासो (मराठी), अर्धमागधी- प्राकृत (मराठी), महाराष्ट्री प्राकृत (मराठी), युवकभारती – हिंदी (हिंदी), युवकभारती – बंगाली (बंगाली), युवकभारती – इंग्रजी (इंग्रजी), युवकभारती-गुजराती (गुजराती), युवकभारती – उर्दु (उर्दु), युवकभारती – सिंधीन (अरेबिक), युवकभारती – सिंधी (देवनागरी), युवकभारती- कन्नड (कन्नड), युवकभारती – तेलुगु (तेलुगु), शिक्षणशास्र (मराठी, इंग्रजी), पर्शियन – गुल्हा ए फारशी (उर्दु), अरेबिक- हिदायतुल अरेबिया (उर्दु), तर्कशास्र (इंग्रजी) बालविकास (इंग्रजी), भौतिकशास्र(इंग्रजी), रसायनशास्र (इंग्रजी), जीवशास्त्र (इंग्रजी), गणित व संख्याशास्त्र (कला व विज्ञान भाग 1) (इंग्रजी), गणित व संख्याशास्त्र (कला व विज्ञान भाग 2) (इंग्रजी), गणित व संख्याशास्त्र (वाणिज्य भाग 1)(इंग्रजी), गणित व संख्याशास्त्र (वाणिज्य भाग 2 ) (इंग्रजी), पुस्तपालन व लेखाकर्म (मराठी, इंग्रजी), सहकार (मराठी, इंग्रजी), वाणिज्य संघटन व व्यवस्थापन (मराठी, इंग्रजी), चिटणीसाची कार्यपद्धती (मराठी, इंग्रजी), अर्थशास्त्र (मराठी, इंग्रजी), जलसुरक्षा व पर्यावरण शिक्षण (मराठी, इंग्रजी), इतिहास (मराठी), राज्यशास्त्र (मराठी, इंग्रजी), माहिती तंत्रज्ञान – विज्ञान (इंग्रजी) आदी विषयांची पुस्तके संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!