AICTE – इंजिनीअरिंग कॉलेजांची प्रक्रिया ऑनलाइन

AICTE Academic Calendar 2021-22

इंजिनीअरिंग कॉलेजांची मान्यता प्रक्रिया ऑनलाइन

AICTE Engineering Online Process will be started soon. The AICTE All India Council of Technical Education has used the online process this year to approve engineering colleges as well as new courses. As a result, the committee meeting for these colleges will also be held online.

इंजिनीअरिंग कॉलेजांना मान्यता देणे तसेच नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देणे यासाठी AICTE अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने यंदा ऑनलाइन प्रक्रियेचा वापर केला आहे. यामुळे या कॉलेजांना होणारी समितीची भेटही ऑनलाइन स्वरूपात होणार आहे.

कॉलेजला किंवा कॉलेजमध्ये नवीन अभ्यासक्रमाला मान्यता देताना कॉलेजांना परिषदेकडे अर्ज करावा लागतो. यानंतर परिषदेकडून तज्ज्ञांचे पथक कॉलेजला भेट देते. यानंतर त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर परिषद योग्य तो निर्णय घेते. मात्र करोनामुळे प्रत्यक्ष भेट देणे शक्य नाही. यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे. कॉलेजांनी डिजिटल स्वाक्षरीसह अर्ज परिषदेकडे सुपूर्द केल्यानंतर त्याची पुढील प्रक्रिया पार पडल्यानंतर भेटही ऑनलाइनच होणार आहे. यासाठी संस्थांना व्हिडीओ अपलोड करणे बंधनकारक असेल. याचबरोबरब लाइव्ह व्हिडीओही करावा लागणार आहे. त्याची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर मान्यतेबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे परिषदेतर्फे सांगण्यात आले.


AICTE Academic Calendar 2021-22- The All India Council of Technical Education (AICTE) has released the calendar for the academic year 2021-22. The calendar has been released on the official website aicte-india.org on Thursday 6 May 2021. According to the circular, the last date for allotment of seats for the first round of counseling or admission for technical institutes is August 31, 2021.

AICTE 2021-22 चे शैक्षणिक कॅलेंडर जारी

AICTE academic calendar 2021-22: नोटिसनुसार, टेक्निकल इन्स्टिट्यूशन्ससाठी काऊन्सेलिंग किंवा अॅडमिशनच्या पहिल्या फेरीची सीट अलॉटमेंटची अखेरची मुदत ३१ ऑगस्ट २०२१ आहे. १५ सप्टेंबरपासून वर्ग सुरू होणार आहेत.

Important Dates : टेक्निकल संस्था ग्रांट आणि सीट अलॉटमेंट डेट्स

 • परिपत्रकानुसार, टेक्निकल संस्थांना मान्यता मिळण्याची अंतिम मुदत ३० जून
 • विद्यापीठ किंवा संस्थांद्वारे मान्यता देण्याची अंतिम मुदत १५ जुलै
 • काऊन्सेलिंग / प्रवेशांच्या पहिल्या फेरीच्या जागावाटपाची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२१
 • काऊन्सेलिंग / प्रवेशांच्या पहिल्या फेरीच्या जागावाटपाची अंतिम मुदत ९ सप्टेंबर २०२१
 • टेक्निकल कोर्सचा प्रवेश रद्द केल्यास पूर्ण शुल्क परताव्याची तारीख १० सप्टेंबर २०२१
 • प्रथम वर्षात प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबर पर्यंत रिक्त जागंवर प्रवेश मिळून याच दिवसापासून वर्ग सुरू होणार.
 • सेकंड ईयर मध्ये लॅटरल एन्ट्री अॅडमिशनची अखेरची मुदत २० सप्टेंबर २०२१
 • स्टँडअलोन पीजीडीएम (PGDM) आणि पीजीसीएम (PGCM) कॉलेजांच्या महत्वपूर्ण तारीखा
 • संस्थांसाठी अनुदानाच्या प्रक्रियेची अखेरची तारीख – ३० जून २०२१
 • स्टँडअलोन पीजीडीएम आणि पीजीसीएम संस्थांसाठी सध्याच्या आणि नव्या विद्यार्थ्यांनी वर्ग सुरू होण्याची तारीख – १ जुलै २०२१
 • प्रवेश रद्द आणि शुल्क परताव्याची अंतिम तारीख – ५ जुलै
 • पीजीडीएम और पीजीसीएम संस्थांमध्ये प्रवेश घेण्याची अंतिम तारीख – १० जुलै

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!