अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश ऑनलाईन मोबाईलव्दारे प्रवेश अर्ज भरण्याची सोय

Akola 11th Admission 2020 Online

Akola 11th Admission 2020: Akola: As per the decision of the Education Department and the Central Admissions Committee, like last year, for the year 2020-21 in the Akola Municipal Corporation, the admission of Class XI Science will be done online centrally. A separate website will be created for that.

अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश ऑनलाईन मोबाईलव्दारे प्रवेश अर्ज भरण्याची सोय

अकोला : शिक्षण विभाग व केंद्रीय प्रवेश समितीच्या निर्णयानुसार गतवर्षीप्रमाणे यावर्षी अकोला महानगरपालिका क्षेत्रातील सन २०२०-२१ साठी इयत्ता अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश ऑनलाईन केंद्रीय पध्दतीने करण्यात येणार आहे. त्याकरिता स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात येणार आहे.

 समितीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकव्दारे मोबाईलवरून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्याची सोय करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश केंद्रीय ऑफलाईन पध्दतीने घेणे उचित नसल्याने विद्यार्थी हितासाठी ऑनलाईन केंद्रीय पध्दतीने करण्याचा निर्णय शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्या पुढाकाराने केंद्रीय प्रवेश समितीच्या बैठकीत घेण्यात आला. एका लिंकव्दारे अकोल्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयासाठी अर्ज करता येणार आहे.

 अर्ज दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठल्याही केंद्रावर न जाता घर बसल्या मोबाईलवरून अर्ज भरता येणार आहे. वेबसाईटवर सर्व महाविद्यालयाची शुल्कासह माहिती दिली जाणार आहे. सर्व प्रवेश दहावीच्या टक्केवारी, स्पोर्टस् कोटा, माजी सैनिक कोटा, जातीनिहाय आरक्षणानुसार होणार आहे.

 यावेळी उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार, सहाय्यक उपनिरीक्षक अरविंद जाधव, समितीचे अध्यक्ष डॉ.विजय नानोटी, सचिव गजानन चौधरी, उपाध्यक्ष डॉ.अविनाश बोर्डे, पुरुषोत्तम लांडे, आनंद साधू, प्रा.नरेंद्र लखाडे, प्रा.संजय देशमुख, प्रा.प्रकाश डवले, प्रा.प्रवीण ढोणे, विनायक देशमुख, डॉ.साबीर कमाल, प्रा.विजय उजवणे, डॉ.जयंत बोबडे, गोपाल इंगळे, प्रा.बुंदेले, पंकज अग्रवाल आदी उपस्थित होते.

सोर्स : सकाळ

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!