अलिबागमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी ५१० पदे भरण्यास मंजुरी 

Alibag Govt Medical College Recruitment

Alibag Govt Medical College Recruitment: Alibag Government have been sanctioned 510 posts for Medical College. To create 185 regular posts and 121 student posts in Group-A to Group-C for Alibag Government Medical College with a capacity of 100 students. Recently, it has been approved by the Department of Medical Education and Drugs of the State Government.

अलिबागमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी ५१० पदे भरण्यास मंजुरी

अलिबाग शासकीयवैद्यकीय महाविद्यालयाकरिता ५१० पदांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी गट – अ ते गट – क मधील नियमित १८५ पदे व विद्यार्थी पदे १२१ त्याचप्रमाणे गट-क ( बाह्यस्रोताने ) १३९ पदे व गट- ड ( बाह्यस्रोताने ) ६५ पदे अशी एकूण ५१० व ४ टप्प्यात निर्माण करण्यास नुकतीच राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाने मान्यता दिली आहे.

मंजूर झालेल्या ५१० पदांमध्ये गट – अ मध्ये एक अधिष्ठाता, २१ प्राध्यापक, २२ सहयोगी प्राध्यापक, एक मुख्य शासकीय अधिकारी अशा ४५ पदांचा समावेश आहे . गट – ब मध्ये ४६ सहायक प्राध्यापक व एक प्रशासकीय अधिकारी अशा ४७ पदांचा समावेश आहे. गट- क मध्ये एक ग्रंथपाल, एक सांख्यिकी सहायक, दोन कार्यालयीन अधीक्षक, नऊ लघुलेखक, चार वैद्यकीय समाजसेवक, १५ वरिष्ठ सहायक, एक रोखपाल, ९ प%8रयोगशाळा वाहतूक तंत्रज्ञ, २ सहायक ग्रंथपाA4, १३ वरिष्ठ लिपिक, एक लघुटंकलेखक, दोन भांडारपाल, ३१ कनिष्ठ लिपिक, एक ग्रंथसूचीकार फोटो एक प्रक्षेपक अशा एकूण ९३ पदांचा समावेश असून, बाह्यस्रोताने हिसकावून भरती होणारी वर्ग -३ ची एकूण १३९ तर वर्ग -४ ची एकूण ६५ पदे मंजूर करण्यात आली आहेत.

विद्यार्थी पदे एकूण १२१ असून, त्यामध्ये चिकित्सालयीन पाम्यनिदेशक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, निवासी या पदांचा समावेश आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ टप्प्यातील पदे टप्पानिहाय मंजूर होणार असून, प्रथम वर्षाबाबतची पदे तत्काळ निर्माण होतील व उर्वरित द्वितीय, तृतीय व चतुर्थ टप्प्यातील पदे संबंधित वर्षी निर्माण होतील.

अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार वर्षनिहाय, आवश्यक पदनामनिहाय पदनिर्मिती आवश्यक असल्यामुळे संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांनी सादर केल्यानुसार अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता निर्माण करावयाच्या पदांच्या पदनामनिहाय पदनिर्मितीस मान्यता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे होता, त्याचा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून त्यास शासनाची मंजुरी प्राप्त करून घेण्यात यश मिळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!