Army Railly मराठा रेंजीमेंटतर्फे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन
Army recruitment by Maratha Regiment
Maratha Light Infantry Regimental Center (Karnataka) Boys Sports Company (B.Sc.) will start the recruitment process for boys in the wrestling department. This process will take place from 27th to 30th September from 7 am to 10 am at Maratha Light Infantry Regimental Center, Belgaum (Karnataka).
मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरच्या (कर्नाटक) बॉईज स्पोर्ट्स कंपनीतर्फे (बीएससी) कुस्ती क्रीडा विभागात मुलांसाठी भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. ही प्रक्रिया २७ ते ३० सप्टेंबर या कालावधित सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव (कर्नाटक) येथे होणार आहे.
ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, म्हैसूर, गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्यप्रदेश येथील उमेदवारांसाठी होणार आहे. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता चौथी पास आणि वयोमर्यादा ही ८ ते १४ वर्षे ठेवण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे प्रमाणपत्र किंवा पदक असलेल्या अत्यंत प्रवीण उमेदवारांसाठी वयाचे निकष शिथिल केला जाऊ शकते. भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी आपले आधीचे पदक आणि कुस्ती स्पर्धेत मिळवलेल्या यशाचे प्रमाणपत्र जिल्हास्तरावर तसेच बीएससीच्या कार्यालयात महत्त्वाची कागदपत्रे सादर करावे लागणार आहेत.
भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय), क्रीडा वैद्यकीय केंद्र (एसएमसी) आणि बॉइज कंपनी ही निवडप्रक्रिया पूर्ण करणार आहेत. या प्रक्रियेत जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत विजयी झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवारांनी बीएससीच्या कार्यालयात खालील महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी. निवडलेल्या उमेदवारांना इंग्रजी किंवा हिंदी माध्यमातून मोफत प्रशिक्षण दिले जाईल. त्याशिवाय, एससएआयमार्फत त्यांना कुस्तीचे प्रशिक्षण दिले जाईल.
निवड प्रक्रियेसाठी ही कागदपत्रे असणे आवश्यक
- – जन्म दाखल्याची मूळ प्रत
- – जात प्रमाणपत्राची मूळ प्रत
- – शिक्षण दाखला, गुणपत्रिका
- – सरपंच किंवा शाळेकडून मिळालेला चारित्र्याचा दाखला
- – तहसीलदार/जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडून जारी केलेली निवासी पत्त्याचे प्रमाणपत्र
- – दहा रंगीत छायाचित्रे
- – जिल्हा, राज्य किंवा राष्ट्र पातळीवर क्रीडा स्पर्धेतील सहभागाची प्रमाणपत्रे
- – आधार कार्ड
Maratha Light Infantry Regimental Center Recruitment 2021-The Maratha Light Infantry Regimental Center has organized a military recruitment meet for the Defense Service Corps (DSC) for ex-servicemen. The recruitment process will take place on September 13 and 14 at the Maratha Center. Candidates should have passed at least tenth. Candidates for the post of General Soldier should be below 46 years of age and for the post of Clerk should be below 48 years of age.
Indian Recruitment Rally 2021: मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल केंद्रातर्फे माजी सैनिकांसाठी डिफेन्स सर्व्हिस कोर्प्स (DSC) साठी सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १३ व १४ सप्टेंबर रोजी मराठा केंद्रात ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
अहमदनगर येथील सप्टेंबरमधील सैन्यभरती लांबणीवर
Eligibility Criteria For Indian Army Rally Bharti 2021
- भरतीमध्ये केवळ मराठा इन्फन्ट्रीतून निवृत्त झालेले जवान भाग घेऊ शकतात.
- सोल्जर सामान्य सैनिक व क्लार्क पदासाठी ही भरती होणार आहे.
- माजी सैनिकाची सैन्यातील सेवानिवृत्ती उत्तम असावी.
- त्याच्या संपूर्ण सेवा काळातील पुस्तकात दोनहुन अधिक लाल शेरा नसावा.
- सैन्यात त्याने किमान पाच वर्षे सेवा बजावलेली असावी.
- तसेच त्याची सेवानिवृत्ती नियमानुसार झालेली असावी. उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावेत.
- सामान्य सैनिक पदासाठी उमेदवारांचे वय ४६ वर्षापेक्षा कमी असावे तर क्लार्क पदासाठी ४८ वर्षाखालील असावेत.
पुणे आर्मी रिक्रुटींग कार्यालयांतर्गत ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात सैन्यदलात भरती
भरतीच्या ठिकाणी उमेदवाराने आपले डिस्चार्ज बुक (सेवा पुस्तक), शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखल, जात प्रमाणपत्र, डोमीसाईल प्रमाणपत्र, गाव सरपंच किंवा पोलीस पाटीलकडून मिळविलेले वर्तणुक प्रमाणपत्र, कुटुंबियातील सर्व सदस्यांसोबतचा फोटो, त्यावर सदस्यांची नावे, संबध, जनतारीख असावी. तसेच फोटोवर गाव सरपंचाची सही व शिक्का असावा. आर्मी ग्रुप इन्शुरन्स प्रमाणपत्र, सर्व प्रमानपत्रांचे दोन झेरॉक्स संच, स्वतःचे पासपोर्ट आकाराचे १२ रंगीत फोटो, मराठा प्रदेशील सेनेतील माजी सैनिक असल्यास आपल्या रेकॉर्ड अधिकारीचे प्रमाणपत्र, पोलीस अधिक्षकांकडून मिळविलेले वर्तणुकीचे प्रमाणपत्र घेऊन १३ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता मराठा इन्फन्ट्रीत हजर रहावे, असे कळविण्यात आले आहे.
बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरकडून आज सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. आरक्षण कोटा अंतर्गत खेळाडू व सेवारत तसेच माजी सैनिकांची मुले आणि बंधूंसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे.
Army Recruitment In Belgaum From 15th December
Army Recruitment 2020: The Maratha Light Infantry Regimental Center at Belgaum has organized army recruitment in the month of December. The recruitment process will be for players and veterans as well as children and brothers of veterans under the reservation quota. This recruitment will be started on 15th December 2020. Sportspersons will get the chance in this recruitment. The recruitment will be for the vacant posts of General Service, Tradesman, Clerk in the Maratha Infantry. The recruitment process will start on December 15.
बेळगावात 15 डिसेंबरपासून सैन्यभरती
बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरकडून डिसेंबर महिन्यात सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. आरक्षण कोटा अंतर्गत खेळाडू व सेवारत तसेच माजी सैनिकांची मुले आणि बंधूंसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे.
मराठा इन्फंट्रीमध्ये रिक्त असलेल्या सैनिक सामान्य सेवा, ट्रेडमन, क्लर्क पदासाठी ही भरती होणार आहे. 15 डिसेंबरपासून भरती प्रक्रियेला सुरवात होणार असून पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील खेळाडू, 16 डिसेंबरला महाराष्ट्र वगळता देशातील इतर राज्यातील खेळाडूंची भरती प्रक्रिया पार पडेल. आजी-माजी सैनिकांच्या मुलांसाठी 17 पासून भरती सुरु होईल. पहिले दोन दिवस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी भरती चालेल. तर 19 रोजी मध्यप्रदेश, गोवा, गुजरात, छत्तीसगढ, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील उमेदवार भाग घेऊ शकतात.
21 रोजी सोल्जर ट्रेडमन पदासाठी केवळ महाराष्ट्रातील उमेदवारांना संधी असेल. तर 22 रोजी महाराष्ट्र वगळता इतर राज्यातील उमेदवार भाग घेऊ शकतात. 23 डिसेंबर रोजी सोल्जर क्लर्क व स्टोअर किपर पदासाठी भरती होणार असून यात केवळ मराठा इन्फंट्रीत सेवा बजावणारे आणि निवृत्त जवानांच्या मुलांना भरतीची संधी असेल. 31 जानेवारी 2021 रोजी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे.
सामान्य सेवा भरतीसाठी उमेदवार 1 ऑक्टोबर 1999 पूर्वी आणि 1 एप्रिल 2003 नंतर जन्मलेला नसावा. ट्रेडमन व क्लर्कसाठी 1 ऑक्टोबर 1997 पूर्वी व 1 एप्रिल 2003 पूर्वी जन्मलेला नसावा. ही भरती केवळ राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळाडू, सैन्यात सेवा बजावणारे जवानांचे भाऊ, माजी सैनिकांची मुले, वीरपत्नींची मुले यांच्यासाठी राखीव असून इतरांना यात भरतीची संधी नसेल. भरतीसाठी येणाऱ्या युवकांनी आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्रासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाची प्रमाणपत्रे, माजी सैनिकांची मुले असल्यास रिलेशन प्रमाणपत्र, 25 पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, गुणपत्रिकांच्या झेरॉक्स प्रतीसह भरतीच्या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सौर्स : सकाळ
My. Army
T A Bharti