आरोग्य विभागातील बोगस भरतीची तार विदर्भभरात

आरोग्य विभागातील बोगस भरतीची तार विदर्भभरात

It is known that the gang that is harassing the unemployed by showing that there is a recruitment process for various posts under the health department extends to Yavatmal as well as Amravati. Following Amravati, fraud cases have also been registered against them in Yavatmal district. In particular, shocking information has come to light that some of the participants are connected to the health department of Amravati Zilla Parishad.

आरोग्य विभागाअंतर्गत विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया असल्याचे दाखवून बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या टोळीची व्याप्ती यवतमाळ तसेच अमरावतीपर्यंत असल्याची माहिती आहे. अमरावती पाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा दोघांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे यात सहभागी असलेल्यांपैकी काहींचे तार अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एक महिन्यापूर्वी अमरावती जिल्हा परिषदेंतर्गत आरोग्य विभागात बनावट नियुक्तिपत्र देऊन एकाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे यांनी पोलिस ठाण्यात तक्रारसुद्धा दिली होती. तसेच यासंदर्भात काही माहिती असल्यास ती देण्याचे आवाहनसुद्धा केले होते. तसेच प्रकरण २५ जानेवारीला यवतमाळ पोलिस ठाण्यात दाखल झाले.

अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातसुद्धा असाच प्रकार घडला होता. सुरुवातीला बनावट नियुक्तिपत्र देऊन लाखोंचा गंडा घालणाऱ्या या रॅकेटची व्याप्ती अमरावतीपुरती मर्यादित असल्याचे दिसून येत होते. मात्र, आता यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा ही टोळी सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे या टोळीतील काही सदस्यांचे अमरावती कनेक्‍शन आहे का, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!