महत्त्वाची बातमी! बॅकलाॅग परीक्षेची तारीख ठरली; पुणे विद्यापीठाने वेळापत्रकात केले बदल
ATKT Exams 2020
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बॅकलॉग आणि श्रेणी सुधारसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा ८ डिसेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीमध्ये ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी तीन दिवस विद्यार्थ्यांची सराव परीक्षा (माॅक टेस्ट) घेतली जाणार आहे.
पुणे विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या. त्यानंतर बॅकलॉग व श्रेणी सुधार करण्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू केले. अंतिम वर्षाच्या परीक्षेत विषयांचे प्रश्नसंच काढण्यापासून ते ऑनलाइन पद्धतीतील त्रुटींमुळे परीक्षेमध्ये अडचणी आल्या होत्या. या अडचणी बॅकलॉकच्या परीक्षेमध्ये येऊ नये, यासाठी विद्यापीठाने सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे. बॅकलॅगच्या परीक्षेत सुमारे २ हजार २०० विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे. सुमारे अडीच ते पावणेतीन लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
परीक्षा विभागाने काही दिवसांपूर्वी या परीक्षा संदर्भात परिपत्रक काढून ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीमध्ये परीक्षा होईल आणि मुख्य परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीचा सराव करण्यासाठी परीक्षा घेतली जाईल, असेही परिपत्रकात नमूद केले होते केले होते. मात्र, या वेळापत्रकात काहीसा बदल होत आहे.
३ ते ६ डिसेंबर या कालावधीत सराव परीक्षा होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे व्यवस्थित लॉगिन होते का? त्यांचा ई-मेल आयडी बरोबर आहे की चूक आदी गोष्टींची पडताळणी होणार आहे. यातून ज्या त्रुटी समोर येतील, त्या त्रुटी ७ डिसेंबरपर्यंत दूर करून ८ ते २३ डिसेंबर या कालावधीत परीक्षा घेतल्या जातील, अशी माहिती परीक्षा विभागाने दिली आहे.
सोर्स: सकाळ
पुणे विद्यापीठाच्या बॅकलॉग परीक्षा डिसेंबरमध्ये
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्ष वगळता, इतर वर्षातील बॅकलॉग विषयांसाठी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या असून, त्यानुसार ही परीक्षा ३ ते १६ डिसेंबर या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. याच कालावधीत श्रेणीसुधार आणि बहि:स्थ अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा व बॅकलॉगसह अन्य अभ्यासक्रमांच्या परीक्षा केवळ ऑनलाइन माध्यमातून सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत घेण्यत येणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल, लॅपटॉप, संगणक किंवा टॅब यापैकी कुठलीही सुविधा ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी उपलब्ध नाही, त्यांनी आपपल्या महाविद्यालयात किंवा जवळच्या महाविद्यालयात जाऊन, त्या महाविद्यालयांकडे उपलब्ध संगणक कक्षातील सुविधा वापरून संबंधित विषयांची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा द्यावी, असेही विद्यापीठाकडून महाविद्यालयांना सूचित करण्यात आले आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जातील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली.
एप्रिलमध्ये होऊ न शकलेल्या बॅकलॉग विषयाच्या प्रात्यक्षिक, मौखिक, प्रोजेक्ट, सेमिनार व अन्य महाविद्यालयातील स्तरावरील परीक्षांचे आयोजन करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांसह करावेत. महाविद्यालयातील शिक्षकांनी त्यांच्या बीसीयूडी लॉगइनमधून सर्व संबंधित विद्यार्थ्यांचे गुण विद्यापीठाच्या लिंकचा उपयोग करून ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदवावेत, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केले आहे.