बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात शिक्षकांची होणार भरती
Belgaum Shikshak Bharti 2021
Belgaum Shikshak Bharti 2021: In Belgaum educational district will be recruited 133 guest teachers in government secondary schools. The education department has decided to appoint 3473 guest teachers in government secondary schools in the state. Accordingly, applications will be invited from bid holders.
राज्यात लवकरच प्राध्यापकांची भरती, उदय सामंत यांची मोठी घोषणा
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात शिक्षकांची होणार भरती
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सरकारी माध्यमिक शाळांमध्ये लवरकच 133 अतिथी शिक्षकांची भरती केली जाणार आहे. तर राज्यातील सरकारी माध्यमिक शाळांमध्ये 3473 अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यानूसार बिएडधारकांकडून अर्ज मागिविली जाणार आहेत.
जिल्ह्यात पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षकांची चारशे पदे रिक्त
राज्यातील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. मात्र शिक्षण खाते रिक्त जागा भरण्याऐवजी दरवेळी अतिथी शिक्षकांची नेमणुक करुन वेळ मारुन नेत आहे. 2020 मध्ये कोरोनाचे संकट असल्याचे सांगत सरकारी कर्मचाऱ्यांची भरती न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे लवकर शिक्षक भरती होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून यावेळीही विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी अतिथी शिक्षकांवरच असणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हातील सरकारी माध्यमिक शाळांमध्ये विविध विषयाच्या शिक्षकांच्या जागा रिक्त असून या भरती करणे आवश्यक बनले आहे. मात्र शाळा सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी संपल्यानंतर आता अतिथी शिक्षक भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे.