CA परीक्षा लांबणीवर; सुधारित वेळापत्रक जाहीर

CA Exam 2020 Postponed New Exam Schedule Announced

CA परीक्षा लांबणीवर; सुधारित वेळापत्रक जाहीर

CA Exam 2020 Revised Timetable : सीए परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.; सुधारित वेळापत्रक जाणून घ्या….

CA Exam 2020 Revised Timetable: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्सी ऑफ इंडिया (ICAI) ने नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या चार्टर्ड अकाउंटन्सी अर्थात सीए परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा १ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत होणार होत्या. आता या परीक्षा २१ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत होतील.

‘चार्टर्ड अकाउन्टन्सी अर्थात सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार एक ते १८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या परीक्षा आता २१ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या काळात होतील, त्याचे सविस्तर वेळापत्रक ‘आयसीएआय’च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे,’ अशी माहिती ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे यांनी दिली.

अशा होतील परीक्षा –

फाउंडेशन कोर्स परीक्षा

८, १०, १२ आणि १४ डिसेंबर २०२०

इंटरमेडिएट (Ipc) कोर्स परीक्षा – जुन्या स्कीमनुसार
  • ग्रुप १ – २२, २४, २६ आणि २८ नोव्हेंबर २०२०
  • ग्रुप २ – १, ३ आणि ५ डिसेंबर
इंटरमेडिएट कोर्स परीक्षा – नव्या स्कीमनुसार
  • ग्रुप १ – २२, २४, २६ आणि २८ नोव्हेंबर २०२०
  • ग्रुप २ – १, ३, ५ आणि ७ डिसेंबर
फायनल कोर्स परीक्षा – नव्या स्कीमनुसार
  • ग्रुप १ – २१, २३, २५ आणि २७ नोव्हेंबर २०२०
  • ग्रुप २ – २९ नोव्हेंबर, २, ४ आणि ६ डिसेंबर २०२०
इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट टेक्निकल परीक्षा (IRM)

मॉड्युल्स १ ते ४ – २१, २३, २५ आणि २७ नोव्हेंबर २०२०

इंटरनॅशनल ट्रेड लॉज अँड वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (ITL & WTO) पार्ट – १ परीक्षा
  • ग्रुप ए – २१ आणि २३ नोव्हेंबर २०२०
  • ग्रुप बी – २५ आणि २७ नोव्हेंबर २०२०
इंटरनॅशनल टॅक्सेशन – असेसमेंट टेस्ट

२१ आणि २३ नोव्हेंबर २०२०

आयसीएआयने हेही स्पष्ट केले आहे की केंद्र किंवा राज्य सरकारच्या सार्वजनिक सुट्ट्या असल्या तरी सीए परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही, हे उमेदवारांनी ध्यानात घ्यावे.

वेळापत्रक डाउनलोड

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!