कॅनरा बँकेत विविध पदांवर भरती

Canara Bank Vacancy 2020

कॅनरा बँकेत विविध पदांवर भरती

कॅनरा बँकेचे मुख्य कार्यालय बंगळुरूत आहे आणि जगभरात या बँकेच्या १० हजार शाखा आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसरची २२० पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी जाहिरात देण्यात आली आहे. बँकेद्वारे २० नोव्हेंबर २०२० रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

विविध विभागांमध्ये स्केल १ आणि स्केल २ स्पेशालिस्ट ऑफिसर आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी स्केल २ आमि स्केल ३ स्पेशालिस्ट ऑफिसर विशेष भरती अभियानासाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता

पदांनुसार, बीई, बीटेक, एमइ. एमटेक अशी विविध प्रक्रारची शैक्षणिक पात्रता अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी भरतीचे नोटिफिकेशन वाचावे.

पदाचे नाव आणि एकूण रिक्त जागा

बॅकअप अॅडमिनिस्ट्रेटर – ४ पदे
एक्सट्रॅक्ट, ट्रांसफॉर्म आणि लोड (ईटीएल) स्पेशालिस्ट – ५ पदे
बीआई स्पेशालिस्ट – ५ पदे
अँटीवायरस अॅडमिनिस्ट्रेटर – ५ पद
नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर – १० पद
डाटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर – १२ पदे
डेवेलपर/प्रोग्रामर्स – २५ पदे
सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटर – २१ पदे
एसओसी एनालिस्ट – ४ पदे
मैनेजर लॉ – ४३ पदे

कॉस्ट एकाउंटेंट – १ पद
चार्टर्ड एकाउंटेंट – २० पदो
मॅनेजर फायनान्स – २१ पदे
इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अॅनालिस्ट – ४ पद
एथिकल हॅकर्स अॅण्ड पेनेट्रेशन टेस्टर्स – २ पदे
सायबर फॉरेंसिक अॅनालिस्ट – २ पदे
डाटा मायनिंग एक्पर्ट्स – २ पदे
ओएफएसएस अॅडमिनिस्ट्रेटर – २ पदे
ओएफएसएस टेक्नो फंक्शनल– ५ पदे
बेस 24 अॅडमिनिस्ट्रेटर – २ पदो
स्टोरेज अॅडमिनिस्ट्रेटर – ४ पद
मिडलवेयर अॅडमिनिस्ट्रेटर – ५ पदे
डाटा एनालिस्ट – २ पद
मॅनेजर – १३ पदे
सीनियर मॅनेजर– १ पद

अर्ज कसा करायचा?
अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. canarabank.com या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. अर्ज प्रक्रिया २५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांना १५ डिसेंबर २०२० पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा  

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!