CAT Admit Card 2021-CAT परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

CAT Admit Card 2021

IIM CAT Admit Card 2021:

CAT परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

Hall Ticket for Common Admission Test  has been announced. Candidates who have applied for this entrance test can download the Hall Ticket form from the official website iimcat.ac.in. After downloading the Admit Card card, the candidates should check all the information including their own name, date of birth, application number, category, name and address of the examination center, date of examination and time of shift.

CAT Admit Card 2021: कॉमन अॅडमिशन टेस्ट  चे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर उमेदवारांनी त्यातील स्वत:चे नाव, जन्मतारीख, अर्ज क्रमांक, श्रेणी, परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता, परीक्षेचा दिवस आणि शिफ्टच्या वेळेसह सर्व माहिती तपासून घ्या. परीक्षेच्या दिवशी पाळल्या जाणार्‍या सर्व मार्गदर्शक सूचना प्रवेशपत्रावर दिल्या जातील.

कॅट २०२१ परीक्षेचे आयोजन भारतीय व्यवस्थापन संस्था अहमदाबाद द्वारे केले जाणार आहे. परीक्षा २८ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे.

CAT 2021 Admit Card: असे करा डाऊनलोड
स्टेप १: सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जा.
स्टेप २: वेबसाइटवर दिलेल्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३: आता नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्यामदतीने लॉगिन करा.
स्टेप ४: तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
स्टेप ५: ते आता डाउनलोड करा.
स्टेप ६: परीक्षा हॉलमध्ये नेण्यासाठी प्रवेशपत्राची प्रिंट घ्या

अधिकृत वेबसाइट जाण्यासाठी क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!