CAT 2020: कॅट परीक्षेचा निकाल जाहीर

CAT Result 2020: कॅट परीक्षेचा निकाल जाहीर

CLAT 2020: Results: Indian Institute of Management, Indore (IIM Indore) has announced the results of the Common Admission Test (CAT 2020). This result is available on the official website iimcat.ac.in. Candidates who had appeared for the CAT exam should check their results by visiting the official website. For this, candidates have to login with the help of user ID and password.

CAT Result 2020: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंदूर (IIM Indore) ने कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT 2020) चा निकाल जाहीर केला आहे. अधिकृत संकेतस्थळ iimcat.ac.in वर हा निकाल उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी कॅट परीक्षा दिली होती, त्यांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपला निकाल पाहावा. यासाठी उमेदवारांना यूजर आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉगइन करावं लागेल. देशभरात विविध व्यवस्थापन संस्थांमधील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी कॅट परीक्षा घेण्यात येते.

पुढील पद्धतीने डाऊनलोड करा कॅट २०२० निकाल :

– सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ iimcat.ac.in वर जा.
– होमपेजवर Download Cat 2020 Score Card च्या लॉगइन लिंक वर क्लिक करा. आता एक नवी विंडो ओपन होईल.

– आता उमेदवारांनी आपला यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगइन करावे.

– आता उमेदवारांचे स्कोअर कार्ड स्क्रीनवर दिसेल.

– स्कोअर कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट काढून ठेवा.

आयआयएम, इंदूरने कॉमन अॅडमिशन टेस्ट म्हणजेच कॅट परीक्षा २०२० चे आयोजन २९ नोव्हेंबर २०२० रोजी केले होते. संगणकीकृत माध्यमातून एकूण तीन स्लॉटमध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे सव्वा दोन लाखांहून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली. करोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक संपूर्ण खबरदारीसह, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून परीक्षा घेण्यात आली होती. दोन तासांच्या या परीक्षेत तीन विभागांत प्रश्न विचारण्यात आले होते.


CAT Exam Answer Key Released 2020

CAT Exam Answer Key 2020: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदूर (IIM Indore) ने कॉमन अॅडमिशन टेस्ट अर्थात CAT 2020 ची उत्तरतालिका (CAT 2020 Answer Key) जाहीर केली आहे. कॅट परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ही पाहता येईल. उत्तरतालिकेसोबतच आयआयएम इंदूरने कॅट रिस्पॉन्स शीटदेखील उपलब्ध केली आहे. ज्यांना या उत्तरतालिकेवर हरकत घ्यायची असेल, त्यांच्यासाठी ११ डिसेंबर २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

आयआयएम इंदूरने यासंदर्भात असं म्हटलं आहे की, ‘CAT 2020 Answer key वर हरकती नोंदवण्यासाठी लिंक ८ डिसेंबर सकाळी १० वाजल्यापासून ११ डिसेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत अॅक्टिव्ह असेल. उमेदवारांना या कालावधीत आन्सर की देखील पाहता येईल आणि हरकती असल्यास त्याही नोंदवता येतील.

CAT 2020 Answer Key कशी डाऊनलोड कराल?

– अधिकृत संकेतस्थळ iimcat.ac.in वर जा.
– रजिस्टर्ड कॅंडिडेट लॉगइनवर क्लिक करा.
– तुमचे लॉगइन क्रिडेन्शिअर वापरून लॉगइन करा.
– आता कॅट २०२० परीक्षेची उत्तरतालिक तुमच्या समोर दिसेल. ती डाऊनलोड करा.

आन्सर की मध्ये परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिलेली आहेत. त्यावरून उमेदवारांना त्यांचा संभाव्य स्कोअर काढता येईल. ११ डिसेंबर रोजी कॅट आन्सर की ची हरकती घेण्याची विंडो बंद होईल.


CAT 2020 परीक्षेत यंदा करोनामुळे मोठे बदल!

कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT 2020) चे आयोजन २९ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे. यंदा करोना व्हायरस महामारीमुळे या परीक्षेत काही मोठे बदल करण्यात आले आहेत.

CAT 2020 परीक्षेत यंदा करोनामुळे मोठे बदल!
CAT 2020 exam latest update: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) सह देशातील आघाडीच्या मॅनेजमेंट संस्थांमधील पदव्युत्तर पदवी (PG) अभ्यासक्रमांसाठी कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT 2020) चे आयोजन २९ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे. यंदा करोना व्हायरस महामारीमुळे या परीक्षेत काही मोठे बदल करण्यात आले आहेत. परीक्षेचे आयोजन करणाऱ्या आयआयएम इंदूर (IIM Indore) ने यासंदर्भातील सूचना जारी केली आहे.
आयआयएम इंदूरचे संचालक हिमांशु राय यांनी सांगितले की, ‘यंदा कॅट परीक्षेचा कालावधी कमी करण्यात आला आहे. परीक्षा तीन तासांऐवजी दोन तासांची असेल. परीक्षेत तीन विभाग असतात. आधी प्रत्येक विभाग एक तासाचा होता. पण यावर्षी मात्र हे तीन्ही विभाग प्रत्येकी ४० मिनिटांचे असतील. या व्यतिरिक्त परीक्षेच्या सत्रांमध्येही वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत परीक्षा दोन सत्रात होत होती, यंदा ती तीन सत्रांत होईल.’परीक्षेदरम्यान एका वेळी विद्यार्थ्यांची संख्या कमी असावी, सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. सत्रांची संख्या वाढवून परीक्षेचा कालावधी मात्र कमी करण्यात आला आहे.
हिमांशु राय म्हणाले, ‘आयआयएम केंद्रांची तपासणी केल्याशिवाय परीक्षा केंद्रांची संख्या वाढू शकत नव्हते. म्हणून परीक्षेचा कालावधी कमी करून सत्रांची संख्या वाढवण्याचा मार्ग सर्वात योग्य वाटला. सोबतच दोन सत्रांच्या मध्ये बऱ्यापैकी वेळ असेल जेणेकरून विद्यार्थ्यांची एन्ट्री आणि एक्झिट गेटवरची सॅनिटायझेशनची प्रक्रिया योग्य पद्धतीने होईल.’

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!