CGST आणि कस्टम विभागात ४२,२४६ पदे रिक्त!
CGST Department Bharti 2022
There are 42,246 vacancies in the GST and Customs Departments from junior to senior, while the posts of Chief Commissioner, Principal Commissioner and Commissioner are vacant. The number of vacancies has gone up from 37,000 last year. There are 91,700 sanctioned posts in the CGST department across the country.
वस्तू आणि सेवा कर विभाग मुंबई भरती
नागपूर : केंद्र सरकारने देशात वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) लागू केल्यानंतर केंद्रीय जीएसटी आणि कस्टम विभागात कनिष्ठापासून वरिष्ठांपर्यंत तर मुख्य आयुक्त, प्रधान आयुक्त आणि आयुक्तांची पदे रिक्त आहेत. गेल्या वर्षी रिक्त पदांची ३७ हजार असलेली संख्या आता ४२,२४६ वर गेली आहे. अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर रिक्त पदे भरण्यासाठी विभागातर्फे कुठलाही पुढाकार घेण्यात येत नाही. संपूर्ण देशात सीजीएसटी विभागात ९१,७०० पदे मंजूर आहेत, हे विशेष.
रिक्त पदांची माहिती मानव संसाधन विकास महासंचालनालयाने विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड केली आहे. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ कस्टम, सेंट्रल एक्साईज अॅण्ड जीएसटी एससी, एसटी एम्प्लॉईज वेलफेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष संजय थूल म्हणाले, रिक्त जागा भरण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीमारामन आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर व कस्टम बोर्डाकडे पत्र पाठविले आहे. सध्या अनेक कार्यालयात दोन पदाचा कार्यभार एकाच अधिकाऱ्यावर आहे. काही चूक झाल्यास चार्जशीट देऊन कारवाई करण्यात येते. कामाच्या वाढत्या तणावामुळे अनेकांनी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग निवडला आहे.
देशात ए वर्गातील राजपत्रित अधिकाऱ्यांमध्ये ६,३८१ पदांपैकी २,८७५ पदे तर, बी वर्गातील राजपत्रित अधिकाऱ्यांमध्ये २२,२१७ मंजूर पदांपैकी ४,५७७ पदे रिक्त आहेत. विभागात अधिकारीचे नव्हे तर कर्मचाऱ्यांवरही कामाचा जास्त ताण येत आहे. यातच मुख्य आयुक्त, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त आणि सहायक आयुक्तांची अनेक पदे रिक्त आहेत.
केंद्रीय नागपूर सीजीएसटी विभागाच्या कार्यक्षेत्रात नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक विभाग येतो. नागपूर झोनमध्ये जीएसटी व कस्टम विभागात एकूण ७१३ पदे रिक्त आहेत. महाराष्ट्राची आकडेवारी पाहिल्यास जीएसटी विभागात मुंबई झोनमध्ये ५,७७३ मंजूर पदांच्या तुलनेत ३,०६२ कार्यरत तर २,६९१ पदे रिक्त आहेत. याशिवाय नागपूर झोनमध्ये १४९२ मंजूर पदांच्या तुलनेत ८७७ कार्यरत व ६१५ पदे रिक्त, पुणे झोनमध्ये २,०६९ पदे मंजूर तर १२०० पदे रिक्त आणि ८६९ पदे रिक्त आहेत. उपरोक्त आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण ९,३३४ मंजूर पदांच्या तुलनेत ५,१५९ कार्यरत तर ४,१७५ पदे रिक्त आहेत. याशिवाय कस्टम विभागात मुंबई-१ मध्ये १८७९ मंजूर पदांच्या तुलनेत ८९९ कार्यरत पदांच्या तुलनेत ९७१ रिक्त, मुंबई-२ मध्ये २,६९९ मंजूर पदांच्या तुलनेत १२५० कार्यरत व १४२९ रिक्त, मुंबई-३ मध्ये २,९५८ मंजूर पदांच्या तुलनेत १५३१ कार्यरत व १४२७ रिक्त, पुणे येथे ७८८ मंजूर पदांच्या तुलनेत ४३२ कार्यरत व ३५१ पदे रिक्त आणि नागपुरात २१७ मंजूर पदांच्या तुलनेत ११९ कार्यरत तर ९८ पदे रिक्त आहेत. याची एकूण आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्रात जीएसटी आणि कस्टम विभागात १७,८४१ मंजूर पदांपैकी ९,३९० पदांवर अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून, तब्बल ८,४५१ पदे रिक्त आहेत.
देशात मंजूर, कार्यरत व रिक्त पदांची संख्या
वर्गमंजूर पदे कार्यरत रिक्त
ए ६,३८१ ३,५०६ २,८७५
बी २२,२१७ १७,६४० ४,५७७
(राजपत्रित)
बी ३२,३६२ १५,६१० १६,७५२
(अराजपत्रित)
सी ३०,७४० १२,६९८ १८,०४२
एकूण ९१,७०० ४९,४५४ ४२,२४६
अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला
अपुरे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बळावर काम कसे करायचे, हा गंभीर प्रश्न आहे. रिक्त पदाची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यानंतरही संबंधित विभाग भरतीसाठी कुठलेही पाऊल उचलत नाही. युवक-युवतींना रोजगार संधी देण्यासाठी विभागाने तातडीने पदभरती करावी.