Daily Rs 300 incentive announced to ST employees
Daily Rs 300 incentive announced to ST employees
एसटी कर्मचाऱ्यांना दररोज तीनशे रुपये प्रोत्साहन भत्ता जाहीर; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Mumbai ST Employees Incentives Allow : ST employees are successfully carrying out the responsibilities of employees who perform their essential service daily through ST buses from various locations in Mumbai and Mumbai suburbs. Every day ST staff drivers, conductor, mechanics, cleaning workers are risking their own lives, performing night and day services. Not only in Mumbai, but from various departments like Thane and Palghar Raigad, ST staff is currently working to provide essential services in Mumbai. Announcement allowance of Rs. 300 per day has been announced by Advocate Anil Parab, Chairman and Transport Minister of ST Corporation. Read the complete details carefully…..
Mumbai ST Employees Incentives Allow
अनिल परब म्हणाले, ’23 मार्च पासून पुढील तीन आठवडे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता देशातील सर्व व्यवहार बंद झाले. मुंबईसारख्या महानगरांमध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना दळणवळणाची सेवा पुरविण्याची जबाबदारी शासनाने एसटी महामंडळावर टाकली. त्यानुसार 23 मार्चपासून मुंबई आणि उपनगरातील विविध ठिकाणांवरून एसटीच्या बसेसद्वारे दररोज अत्यावश्यक सेवेमध्ये कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुखरूप घेऊन जाण्याची जबाबदारी एसटीचे कर्मचारी यशस्वीपणे पार पाडत आहेत.
दररोज एसटी कर्मचारी चालक, वाहक, यांत्रिकी, सफाई कामगार आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून ,अहोरात्र सेवा बजावत आहेत. केवळ मुंबईतीलच नव्हे तर ठाणे,पालघर रायगड अशा विविध विभागातून एसटी कर्मचारी सध्या मुंबईत अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी कार्यरत आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचे मुंबईत घर नाही, त्यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था एसटी महामंडळमार्फत करण्यात आली आहे. तसेच सगळ्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यवर जात असताना मास्क आणि सॅनेटरी लिक्विडची बाटली देण्यात येत आहे. त्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी एसटी प्रशासनामार्फत घेण्यात येत आहे.
मुंबईत अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी कार्यरत असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
मुंबई : मुंबई तसेच मुंबई उपनगरातील विविध ठिकाणावरून एसटीच्या बसेसद्वारे दररोज अत्यावश्यक सेवेमध्ये कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुखरूप घेऊन जाण्याची जबाबदारी एसटीचे कर्मचारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. दररोज एसटी कर्मचारी चालक, वाहक, यांत्रिकी, सफाई कामगार आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून, अहोरात्र सेवा बजावत आहेत. केवळ मुंबईतीलच नव्हे तर ठाणे, पालघर रायगड अशा विविध विभागातून एसटी कर्मचारी सध्या मुंबईत अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी कार्यरत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या या कार्याला प्रोत्साहन म्हणून दररोज तीनशे रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री अॅडव्होकेट अनिल परब यांनी केली आहे.
सौर्स : ABP माझा