DBSKKV Bharti- कृषी विद्यापीठ पदभरती संदर्भात नवीन अपडेट

 DBSKKV Bharti 2022 Updates

DBSKKV Bharti 2022- Balasaheb Sawant Konkan Agricultural University has paved the way for recruitment to some extent.  The revised format have been finalized and they have been approved by the government to fill up fifty per cent of the sanctioned posts and one hundred per cent of the posts in the Maharashtra Public Service Commission (MPSC). This recruitment can be done with the approval of Dr. Balasaheb Sawant Konkan Agricultural University as per the new directive of the government

डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ रत्नागिरी येथे विविध पदांसाठी भरती

 कृषी विद्यापीठ पदभरती संदर्भात नवीन अपडेट

रत्नागिरी / दापोली: गेले काही वर्षे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात पदांची भरती झालेली नाही. राज्य शासनाच्या सगळ्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाकडून २०१६ साली सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर करून घेतले आहेत त्यांना मंजूर पदांच्या भरती प्रक्रियेस पन्नास टक्के तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)च्या कक्षेतील शंभर टक्के पदे भरण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे. १२ एप्रिल रोजी मंगळवारी तसा महत्वपूर्ण शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या नव्या निर्णयानुसार २०१६ साली आकृतीबंध मंजूर झाला असेल त्याच्या पन्नास टक्के पदभरतीस अनुमती देण्यात आली आहे.

  • या निर्णयामुळे गेले काहीवर्षे रखडलेली डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात काही प्रमाणात नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे, पण असे असले तरी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ प्रशासनाकडून २०१६ साली या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला आकृतीबंधाला अंतिम स्वरूप देऊन तो शासनाकडे पाठवण्यातच आलेला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
  • आता या निर्णयानंतर खडबडून जागे झालेल्या कृषी विद्यापीठ प्रशासनाची आकृतीबंध नव्याने तातडीने तयार करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.
  • आता तूर्तास २००३ चा १७६० पदांचा मंजूर असलेल्या आकृतीबंधातील रिक्त असलेल्या ५७० पदांपैकी पन्नास टक्के पदभरती करावी लागेल. २००३ नंतर नव्याने अंतिम स्वरूपाचा आकृतीबंध तयार करून त्याला शासन मान्यताच घेण्यात आलेली नाही किंवा दुसरा पर्याय आता नव्याने आकृतिबंध तातडीने तयार करून कृषी परिषदेमार्फ़त शासनाकडे पाठवून हा सगळा प्रकार कार्यकारी परिषदेवर असलेल्या विधिमंडळ सदस्यांना सांगून त्यांच्याकडून यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न झाल्यास या नव्याने होणाऱ्या आकृतीबंधाला राज्य कृषी परिषद, कृषी विभाग, वित्त विभागाची विषेश मंजुरी मिळू शकते.
  • यासाठी कोकणातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. या मंजुरी नंतर त्यानंतर डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील शासनाच्या नव्या निर्देशानुसार ५० टक्के पदभरती करण्याची मान्यता घेऊन ही नोकरभरती करता येऊ शकेल. २०१६ सालच्या शासन निर्णयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष!
  • वास्तविक २०१६ मध्ये नव्याने आकृतिबंध करून तो महाराष्ट्र राज्य कृषी परिषदे मार्फत शासनाकडे पाठवणे आवश्यक होते. सप्टेंबर २०१६ पर्यंत उच्च स्तरीय सचिव समितीची मान्यता घेण्यात यावी अशा स्पष्ट सूचना ११ फेब्रुवारी २०१६ रोजी काढण्यात आलेल्या आदेशात देण्यात आल्या होत्या.
  • त्याचवेळी ही बाब कृषी विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक होते. त्यानंतर कृषी विभाग व वित्त विभागाची मान्यता घेण्यासाठी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य असलेल्या विधिमंडळ सदस्यांना हा विषय त्यांच्या लक्षात आणून देणे हे कृषी विद्यापीठ प्रशासनाचे काम होते. पण तसे काहीच करण्यात आले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!