Degree & PG Exam Postponed
Degree & PG Exam Postponed
पदवी-पदव्युत्तर परीक्षा लांबणीवर
Due to the lockdown the all examine of Graduation level and Post Graduation Level has been postponed. The decision on degree and post-graduate examination has been delayed. The state government has appointed a committee to look into the situation and the local situation in the state. The schedule for the examination will be announced after the report of this committee. Due to Corona, it is impossible to hold the exam till May 15, sources said. As the exam period is extended, the results and admissions to the upcoming academic year will be affected. Read the other important details carefully and keep visit us.
Exam Postponed due to Corona & LockDown Effect
करोना लॉकडाऊनमुळे परीक्षा कधी होणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मुंबईत मंगळवारी बैठक घेतली. विभागाचे मंत्री उदय सामंत राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून परीक्षा घेण्याचे नियोजन केले. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेचे नियोजन करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, एसएनडीटी विद्यापीठांचे कुलगुरू शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांचा समावेश आहे. ही समिती स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून परीक्षेचे वेळापत्रक आणि शैक्षणिक वर्षाचे नियोजन असा अहवाल सादर करणार आहे. मात्र, करोनाची गंभीर परिस्थिती कायम राहिल्यास परीक्षेच्या निर्णयाचा पेच वाढेल. त्यामुळे परीक्षा १५ मेपर्यंत होणे अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले. परीक्षेचा कालावधी वाढत गेल्यास निकाल आणि आगामी शैक्षणिक वर्षातील प्रवेश या प्रक्रियेवर परिणाम होणार आहे.
पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेचा निर्णय लांबणीवर पडला आहे. राज्यातील करोना साथीची परिस्थिती आणि स्थानिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
रद्द करण्याची मागणी – दरम्यान, पदवी आणि पदव्युत्तर वर्गाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी कायम ठेवली आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांना पदवी द्यावी. इतर वर्गातील विद्यार्थ्यांना मागील वर्षीच्या गुणांनुसार पुढील वर्गात बढती द्यावी अशी मागणी आहे. तर राज्य सरकारने शैक्षणिक गोंधळ टाळण्यासाठी परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
चार लाख विद्यार्थ्यांना प्रतीक्षा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे विद्यार्थी संख्या जवळपास चार लाख आहे. विद्यार्थ्यांची एकाच टप्प्यात परीक्षा घेणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे आदेश आल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार परीक्षा होईल. समितीच्या अहवालानंतर परीक्षेचा निर्णय होईल, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले.
सौर्स : मटा