लेखा आणि कोषागारे संचालनालयाच्या कार्यालयाअंतर्गत भरती करण्याचा प्रस्ताव

Directorate of Accounts and Treasury Recruitment 2021

Directorate of Accounts and Treasury Recruitment 2021- The Directorate of Accounts and Treasury has submitted a proposal to the Finance Department to fill 170 posts in Group C on contract basis. Read More details as given below.

लेखा आणि कोषागारे संचालनालयाच्या कार्यालयाअंतर्गत भरती करण्याचा प्रस्ताव

लेखा आणि कोषागारे संचालनालयाकडून गट क संवर्गातील १७० पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र राज्यातील लाखो युवक बेरोजगार असताना शासनाने कंत्राटी पद्धतीने भरती न करता परीक्षा घेऊनच भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी करण्यात आली आहे.

लेखा आणि कोषागारे संचालनालयाच्या विविध कार्यालयाअंतर्गत गट क संवर्गाच्या २ हजार ७१४ मंजूर पदांपैकी ७२८ पदे रिक्त आहेत. त्यापैकी सरळसेवेची ३९२ पदे रिक्त असून ७० टक्के पदे कंत्राटी पद्धतीने भरणे शक्य आहे. त्यामुळे कार्यालयातील कामकाजाच्या आवश्यकतेनुसार १७० पदे कंत्राटी तत्त्वावर दोन वर्षांसाठी भरण्याचा प्रस्ताव लेखा आणि कोषागारे संचालनालयाचे संचालक ज. र. मेनन यांनी वित्त विभागाला दिला आहे. या पदांच्या नेमणुकीची कार्यवाही शासन निर्णयातील अटी-शर्तींचे पालन करून विभागीय सहसंचालक स्तरावरून करण्यात येईल, असेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!