तरुणांना केंद्र सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; DRDO मध्ये अप्रेंटिस भरती

DRDO Vacancy 2021

DRDO Vacancy 2021: Gas Turbine Research Establishment- DRDO invites online application form for the recruitment of Graduate Apprentice Trainee, Diploma Apprentice Trainee, ITI Apprentice Trainee Posts. There is a total of 150 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may submit an online application form before the last date. Willing applicants need to apply online through the given link. The last date for submission of the application form is 29th January 2021

तरुणांना केंद्र सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; DRDO मध्ये अप्रेंटिस भरती

DRDO Vacancy 2021: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थ (DRDO) ने अॅप्रेंटिससाठी विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. आयटीआय पासून डिप्लोमा, पदवीपर्यंतच्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही.

कोणत्या पदांवर होणार भरती? आवश्यक पात्रता काय? अर्ज कधीपासून कधीपर्यंत करता येणार? निवड प्रक्रिया काय असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे येथे मिळतील…

या पदांवर होणार भरती-Name of the Posts

  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी – ८० पदे
  • डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी – ३० पदे
  • आयटीईय अप्रेंटिस ट्रेनी – ४० पदे
  • एकूण पदांची संख्या – १५०

आवश्यक पात्रता-Eligibility Criteria

विविध पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता अनिवार्य आहे. आयटीआय व्होकेशनल कोर्स करणाऱ्या उमेदवारांपासून इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स करणाऱ्यांपर्यंत ही भरती निघाली आहे. याची विस्तृत माहिती पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून मिळेल.

सर्व पदांसाठी आवश्यक किमान वयोमर्यादा १८ वर्षे तर कमाल वयोमर्यादा २७ वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गांसाठी नियमानुसार सवलत देण्यात येईल.

कसा करायचा अर्ज?- How to Apply 

डीआरडीओ भरतीसाठी अधिकृत संकेतस्थळामार्फत ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया ७ जानेवारी २०२१ पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ जानेवारी २०२१ आहे. अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. पुढी दिलेल्या लिंकवरून अर्ज करता येईल.

निवड प्रक्रिया-Selection Process

या पदांवर भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. पात्रता परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार होऊन त्यानुसार नियुक्ती होईल. अर्जात भरलेली माहिती आणि पात्रता प्रमाणपत्रांच्या आधारे शॉर्टलिस्टिंग होईल.

DRDO Apprentice Notification 2021 साठी येथे क्लिक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!