Drone Pilots Bharti -ड्रोन पायलटांच्या प्रशिक्षणाचा खर्च होईल कमी; जाणून घ्या

Drone Pilot Training Course

Dron Pilot Training Course: Fees for drone pilot training courses will be reduced. Fees for the drone pilot training course will be reduced in the next three to four months. Civil Aviation Minister Jyotiraditya Shinde gave this information on Tuesday.

ड्रोन पायलट प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे शुल्क पुढील तीन ते चार महिन्यात कमी होणार आहे. नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे  यांनी मंगळवारी ही माहिती दिली. हा अभ्यासक्रम (course) चालवणाऱ्या संस्थांची संख्या वाढणार आहे. परिणामी प्रशिक्षण शुल्कात घट होणार आहे. एका पत्रकाराने व्हिडियो क्रॉन्फरन्सद्वारे शिंदे यांच्याशी केलेल्या वार्तालापादरम्यान शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. या मुलाखतीदरम्यान ड्रोन पायलट प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

  • ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले की मागील पाच महिन्यांमध्ये विमान नियामक डीजीसीएने ड्रोन वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी २३ संस्थांना मान्यता दिली आहे. शिंदे यांनी मोबाइल फोनच्या किमतीचं उदाहरण दिलं. भारतात गेल्या काही वर्षांत फोनच्या किमती कशा कमी झाल्या त्याचं उदाहरण त्यांनी दिलं.
  • ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, ‘जशी जशी संस्थांची संख्या वाढेल, ड्रोन पायलटांच्या प्रशिक्षणाचा खर्च कमी होईल. पुढच्या तीन ते चार महिन्यात हे चित्र दिसू लागेल, कारण अशा संस्थांची संख्या आम्ही वाढवत राहणार आहोत.’
  • ज्योतिरादित्य शिंदे पुढे म्हणाले की, ‘देशाला निश्चित स्वरुपात अधिक ड्रोन पायलट्सची आवश्यकता आहे. म्हणूनच त्यांच्या मान्यतेच्या प्रक्रियेचे विकेंद्रीकरणा झाले आहे. आता केवळ डीजीसीएच ड्रोन स्कूलना प्रमाणित करणार आहे आणि ते ड्रोन स्कूल पायलट्सना प्रमाणपत्र देतील.’


Drone Pilots Bharti 2022-Good news for young people who looking for jobs in Drone Pilots. Civil Aviation Minister Jyotiraditya Shinde said that in the next few years, more than one lakh drone pilots will be recruited in the country.The drone pilot will get a monthly salary of Rs 30,000. The Center is trying to promote drone services across the country. So there will be bumper recruitment of drone pilots in the next few years. Read More details as given below.

सरकार तरुणांना देणार नोकरी, १ लाखाहून अधिक पदांची भरती होणार

Drone Pilots Bharti 2022:  नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सरकार कमाईची संधी देणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कॉलेजच्या डिग्रीची आवश्यकता नाही. पुढील काही वर्षांत देशात जवळपास १ लाखाहून अधिक ड्रोन पायलट्सची भरती करणार असल्याचं नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं. केंद्राकडून देशभरात ड्रोन सेवेला उत्तेजन देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत ड्रोन पायलट्सची बंपर भरती होईल.

  • केंद्राकडून देशभरात ड्रोन सेवेला उत्तेजन देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत ड्रोन पायलट्सची बंपर भरती होईल.
  • बारावी उत्तीर्ण झालेल्या व्यक्ती ड्रोन पायलट होण्यासाठी प्रशिक्षण घेऊ शकतात.
  • त्यासाठी कॉलेजच्या डिग्रीची गरज नाही. येणाऱ्या काही वर्षांत जवळपास १ लाख ड्रोन पायलट्सची आवश्कयता भासेल.
  • ड्रोन पायलट होण्याची इच्छा असलेल्यांना दोन-तीन महिन्यांचं प्रशिक्षण देण्यात येईल.
  • ड्रोन पायलटला ३० हजार रुपये मासिक पगार मिळेल, अशी माहिती ज्योतिरादित्य शिंदेंनी दिली.

Drone Pilots Recruitment 2022

ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज दिल्लीत निती आयोगाच्या एक्सपीरियन्स स्टुडिओचं लॉन्चिंग केलं. २०३० पर्यंत भारताला ग्लोबल ड्रोन हब बनवण्याचं लक्ष्य असल्याचं शिंदे म्हणाले. औद्योगिक आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित क्षेत्रांमध्ये ड्रोनचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवं तंत्रज्ञान विकसित व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचावं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटतं, असं त्यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!