Due to Corona UPSC Exam Schedule change
Due to Corona UPSC Exam Schedule change
यूपीएससीची परीक्षा लॉकडाउन संपल्यावरच
UPSC Decided to take their planned examine after the lockdown finished now the lockdown has been extended till 3rd May 2020. Due to the Corona Virus and Lockdown its unable to people read the the examination centre so the respective upsc scheduled will be postponed. In respect of all examinations, interviews and recruitment boards, any important decision of the Commission will be made available immediately on the Commission’s website. Therefore, the administration has requested to visit the website.
यूपीएससी 2020: पाहा मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका
UPSC Exam will be held after the Lockdown
आयोगाच्या वेबसाइटवर अपडेट Upsc Website Updates – सर्व परीक्षा, मुलाखती आणि भरती मंडळाच्या संदर्भात आयोगाचा कोणताही महत्त्वाचा निर्णय तातडीने आयोगाच्या वेबसाइटवरवर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतर (३ मे) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे आणि मुलाखतींचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती यूपीएससी प्रशासनाने दिली आहे. नागरी सेवा २०१९ या परीक्षेच्या व्यक्तिमत्त्व चाचणीच्या नव्या तारखांसोबतच नागरी सेवा २०२० (प्राथमिक), अभियांत्रिकी सेवा (मुख्य) आणि भूगर्भशास्त्र सेवा (मुख्य) या परीक्षांचे परिस्थितीनुसार वेळापत्रक नव्याने प्रसिद्ध करण्याबाबत चाचपणी करण्यात येत आहे, अशी घोषणा यूपीएससी प्रशासनाने बुधवारी केली.
करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने बुधवारी एक विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भरती मंडळात जेथे उमेदवार आणि सल्लागारांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे गरजेचे असल्याने, अशा सर्व मुलाखती, परीक्षांच्या तारखांचे पुनरावलोकन केले जाईल, असा निर्णय घेण्यात आला. लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच ३ मेनंतर उर्वरित नागरी सेवा २०१९ व्यक्तिमत्व चाचणीच्या नवीन तारखांसंदर्भात निर्णय घेतला जाईल.
नागरी सेवा -२०२० (प्राथमिक), अभियांत्रिकी सेवा (मुख्य) आणि भूगर्भशास्त्र सेवा (मुख्य) परीक्षेच्या तारखांची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. सध्याची बदलती परिस्थिती पाहता या परीक्षेच्या वेळापत्रकात बदलाची आवश्यकता असल्यास त्याबाबत यूपीएससीच्या वेबसाइटवर याबाबत सूचित केले जाईल. एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा, भारतीय वित्तीय सेवा आणि भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा २०२० पुढे ढकलण्याची घोषणा यापूर्वी केली आहे. सीएपीएफ परीक्षा २०२० च्या तारखादेखील यूपीएससी वेबसाइटवर सूचित केल्या जातील. राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी (एनडीए-१) परीक्षा पुढील माहिती मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. एनडीए-२च्या परीक्षेचा निर्णय हा १० जून, २०२० रोजी नव्या अधिसूचनेसाठी निश्चित करण्यात येईल.
सौर्स – मटा
करोनामुळे UPSC ने देखील बदललं शेड्युल
लॉकडाऊन: यूपीएससीच्या ‘या’ सर्व मुलाखती रखडल्या
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी परीक्षा २०१९ च्या मुलाखतींची प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. देशभरात लॉकडाऊनची घोषणा तेव्हा झाली नव्हती. आता देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन आहे. त्यामुळे यूपीएससीच्या अनेक परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. ‘देशात करोना व्हायरसमुळे लागलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाने अनेक परीक्षांच्या मुलाखतींचं शेड्युल बदलण्यात आलं आहे. शिवाय UPSC IES आणि ISS 2020 भरती परीक्षांचं शेड्युलही बदलण्यात येणार आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत कोणतीही घोषणा केली जाणार नाही.’
पाहा कोणत्या मुलाखतींचं शेड्युल कसं बदललं —
- सायंटिस्ट बी (ज्युनियर जियोफिजिसिस्ट) – ३० आणि ३१ मार्चला होणार होत्या मुलाखती.
- असिस्टंट प्रोफेसर (अप्लायड आर्ट) – १ एप्रिल २०२० रोजी होत्या मुलाखती.
- असिस्टेंट डायरेक्टर (CPDO) – ३ एप्रिल २०२० रोजी होत्या मुलाखती.
- अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (अॅग्रीकल्चर) – ३ एप्रिल २०२० रोजी होत्या मुलाखती.
- असिस्टंट एक्झिक्युटिव इंजीनियर (सिविल) – २३ आणि २४ मार्च रोजी मुलाखती होत्या.
- डेप्युटी डायरेक्टर (सेफ्टी) – २५ मार्च रोजी होत्या मुलाखती.
- असिस्टंट प्रोफेसर (पेंटिंग) – २६ व २७ मार्च रोजी होत्या मुलाखती.
- सायंटिस्ट बी (केमिस्ट) – २४ ते २७ मार्च रोजी होत्या मुलाखती.
- इंस्ट्रूमेंटेशन इंजीनियर – ३० मार्चला होत्या मुलाखती.
- अॅडिशनल असिस्टंट डायरेक्टर – ३१ मार्चला मुलाखती होत्या.
- नॉटिकल सर्वेयर कम डेप्युटी डायरेक्टर जनरल – ७ एप्रिलला मुलाखती होत्या.
- अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (BRO) – १५ व १६ एप्रिलला मुलाखती होत्या.
सौर्स – मटा
UPSC Exam Schedule : The interview process for the Civil Service Examination 2019 conducted by UPSC was about to begin. This process begins on February 17. Interviews for this exam were scheduled to run till April 3, according to the scheduled timetable. But this process has been postponed due to the Corona virus. Candidates who were called for the interview between March 23, 2020 and April 3, 2020, will now be given new dates. The Commission has informed that a new schedule will not be announced until further orders are made. Keep visit us for further updates.
UPSC Exam Schedule 2020
देशातल्या करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्व विद्यापीठ, महाविद्यालये, शाळांमधील परीक्षा एकतर लांबणीवर पडल्या आहेत किंवा रद्द झाल्या आहेत. स्पर्धा परीक्षांची स्थितीही वेगळी नाही. आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयोगाने आपल्या भरती प्रक्रियेचं वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात एक नोटिफिकेशन जारी केलं आहे.
यूपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षा २०१९ च्या मुलाखतीची प्रक्रिया सुरू होणार होती. ही प्रक्रिया १७ फेब्रुवारी २०२० पासून सुरू आहे. नियोजित वेळापत्रकानुसार या परीक्षेच्या मुलाखती ३ एप्रिलपर्यंत चालणार होत्या. पण ही प्रक्रिया करोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आली आहे. २३ मार्च २०२० ते ३ एप्रिल २०२० या दरम्यान ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते, त्यांना आता नव्या तारखा देण्यात येणार आहेत. पुढील आदेश मिळेपर्यंत नवे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार नाही असे आयोगाने कळवले आहे.
सौर्स : मटा