Intermediate Exam: इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचा निकाल जाहीर

Intermediate Drawing Results

Intermediate Drawing Grade Result has been declared. Information about this has been released by the State Directorate of Arts. Students appearing for the exam will be able to view and download the results by visiting the official website. The exam was held between April 9 and 12.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Intermediate Drawing Grade Result: शासकीय रेखाकला परीक्षा २०२१ देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. इंटरमिजीएट ड्रॉइंग ग्रेड निकाल (Intermediate Drawing Grade Result) जाहीर करण्यात आला आहे. राज्याच्या कला संचालनालयतर्फे (Directorate of Arts)याबद्दल माहिती जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. ९ ते १२ एप्रिल दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर ही परीक्षा दिलेले विद्यार्थी या निकालाची वाट पाहत होते. हा निकाल ऑनलाइन माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंट पोस्टाद्वारे पाठविली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना इंटरमिजीएट ड्रॉइंग ग्रेड निकाल (Elementary Drawing Grade Result) अधिकृत वेबसाइट https://dge.doamh.in/ वर तपासता येणार आहे. सहभागी शाळांचे तसेच खासगी विद्यार्थ्यांचे निकाल (Private Student Result) २० मे ते २३ मे २०२२ या कालावधीत जाहीर केले जात आहेत.

एलिमेंटरी आणि इंटरमिजीएट ग्रेड परीक्षा ९ ते १२ एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. यातील इंटरमिजीएट ग्रेड परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा २०२१ चा निकाल २३ मे २०२२ रोजी जाहीर केला जाणार आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Intermediate, Elementary Exam

Intermediate and Elementary Exam – Students have been given an extension to apply for the Elementary and Intermediate examinations conducted by the Arts Directorate of the State Government. The deadline to apply for the exam was 31st March 2022. However, the deadline has now been extended and students will be able to apply online till 4th April 2022. Read More details as given below.

कला संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षेच्या (elementary intermediate exam 2022) नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, आता विद्यार्थ्यांना ४ एप्रिलपर्यंत नोंदणी करता येईल, अशी माहिती कला संचालनालयाचे परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोडे यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

या परीक्षेसाठी अद्याप काही केंद्रांनी नोंदणी केलेली नाही; तसेच परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी केंद्र नोंदणी, विद्यार्थी नोंदणी, परीक्षक, समालोचक आणि उपमुख्य समालोचक नोंदणी आणि परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी ४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

दरम्यान, शासकीय रेखाकला परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या केंद्रांपैकी काही केंद्रांवर १० एप्रिलला केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा असल्याने ९ आणि १० एप्रिलला एलिमेंटरी परीक्षेच्या आयोजनासाठी पुरेशी बैठक व्यवस्था नसल्यास केंद्र प्रमुख आणि केंद्र संचालकांनी परीक्षा केंद्राचे ठिकाण समन्वयाने निश्चित करावे आणि विद्यार्थ्यांना त्याची माहिती देण्यात यावी, असे परिपत्रकाद्वारे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे इंटरमिजिएट परीक्षा ११ आणि १२ एप्रिलला होणार असल्याचे वाघमोडे यांनी सांगितले.


Intermediate and Elementary Exam – Students have been given an extension to apply for the Elementary and Intermediate examinations conducted by the Arts Directorate of the State Government. The deadline to apply for the exam was March 25. However, the deadline has now been extended and students will be able to apply online till 31st March 2022. Read More details as given below.

राज्य सरकारच्या कला संचालनालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या एलिमेंटरी व इंटरमीजिएट या परीक्षांसाठी अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत या परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

इंटरमीजिएट परीक्षेत ग्रेड मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत सवलतीचे गुण दिले जातात. ही परीक्षा देण्यासाठी एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. या दोन्ही परीक्षा गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे झालेल्या नव्हत्या. यंदा त्या ऑनलाइन पद्धतीने दहावीच्या परीक्षेपूर्वी घेण्याचा निर्णय कला संचालनालयाने जाहीर केला होता. परंतु, या निर्णयाला राज्यभरातून विरोध झाल्यामुळे या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने दहावीच्या परीक्षेनंतर घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानुसार ९ ते १२ एप्रिलदरम्यान या दोन्ही परीक्षा घेतल्या जाणार असून, नववी व दहावीतील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे.

या परीक्षेला अर्ज करण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, आता ही मुदत वाढविण्यात आली असून, विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहे. अनेक विद्यार्थ्यांची नोंदणी अद्याप झालेली नसल्याचे ही मुदतवाढ देण्यात आल्याचे कला संचालनालयामार्फत सांगण्यात आले. सर्व परीक्षा केंद्र प्रमुखांनी आपल्या अंतर्गत असलेल्या सर्व सहभागी शाळांनी याबाबत माहिती द्यावी व एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन कला संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.


Intermediate, Elementary exams Dates

The Elementary Painting Grade Examination for the students of Class IX in the academic year 2021-22, as well as the Intermediate Painting Grade Examination for the students enrolled in Class X and Basic / Art Teacher Training Diploma (First Year) courses will be held from 9th to 12th April. The examination will be conducted offline at all examination centers in the state, said Rajiv Mishra, art director of the arts directorate.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील इयत्ता नववीमधील विद्यार्थ्यांकरिता एलिमेंटरी चित्रकला श्रेणी परीक्षा, तसेच इयत्ता दहावी व मुलभूत/कला शिक्षक प्रशिक्षण पदविका (प्रथम वर्ष) अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा ९ ते १२ एप्रिल दरम्यान घेण्यात येणार आहे. राज्यातील सर्व परीक्षा केंद्रावर ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होईल, अशी माहिती कला संचालनालयाचे कला संचालक राजीव मिश्रा यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रविष्ठ होणाऱ्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षेचे सवलतीचे गुण मिळणार नसल्यामुळे आता ही नववीत असणाऱ्या या विद्यार्थ्यांकरिता एलिमेंटरी परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रांची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी, परीक्षा शुल्क; तसेच परीक्षक, समालोचक, उपमुख्य समालोचक यांच्या अर्जाची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने ‘https://dge.doamh.in’ या संकेतस्थळावर करायची असून परीक्षेबाबत अधिक माहिती या संकेतस्थळवर उपलब्ध आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणांचा लाभ मिळावा, यासाठी इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल एलिमेंटरी परीक्षेच्या अगोदर जाहीर करण्यात येणार असल्याचेही मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे.

एलिमेंटरी चित्रकला श्रेणी परीक्षेचे वेळापत्रक

(२०२१-२२मध्ये नववीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी)

विषय : कालावधी : वेळ

 • वस्तुचित्र : ९ एप्रिल : सकाळी १०.३० ते दुपारी १
 • स्मरणचित्र : ९ एप्रिल : दुपारी २ ते ४
 • संकल्पचित्र-नक्षीकाम : १० एप्रिल : सकाळी १०.३० ते दुपारी १
 • कर्तव्य भूमिती व अक्षरलेखन : १० एप्रिल : दुपारी २ ते ४

इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षेचे वेळापत्रक :

(२०२१-२२मध्ये इयत्ता दहावीत असणारे विद्याथी आणि कला शिक्षक प्रशिक्षण पदविका (प्रथम वर्ष) अभ्यासक्रमाचे विद्यार्थी)

विषय : कालावधी : वेळ

 • स्थिरचित्र : ११ एप्रिल : सकाळी १०.३० ते दुपारी १.३०
 • स्मरणचित्र : ११ एप्रिल : दुपारी २.२० ते सायंकाळी ४.३०
 • संकल्पचित्र-नक्षीकाम : १२ एप्रिल : सकाळी १०.३० ते दुपारी १.३०
 • कर्तव्य भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन : १२ एप्रिल : दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३०

Intermediate Exam

The directorate has been instructed to take it offline only after the written test of class X. Intermediate exams were to be held on 22nd and 23rd February. Along with Intermediate, Elementary exams will also be conducted offline in April. Will be announced after the exam date. Read More details as given below.

 राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हिताला डावलून होणारी ऑनलाईन इंटरमिजिएट परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कला महाविद्यालय शिक्षक संघटना आणि विद्यार्थ्यांचे एकूणच हित लक्षात घेऊन दहावीच्या लेखी परीक्षेनंतरच ती आॅफलाईन पद्धतीने घेण्याचे निर्देश संचालनालयाला दिले आहेत. २२ आणि २३ फेब्रुवारीला इंटरमिजिएट परीक्षा होणार होती. इंटरमिजिएटसोबतच एलिमेंटरी परीक्षाही आॅफलाईन घेतली जाणार असून एप्रिल महिन्यात त्या होतील. परीक्षेच्या तारखेनंतर जाहीर केल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे

 • ‘इंटरमिजिएट परीक्षेवरून वादाची शक्यता’ अशा मथ‍ळ्याखाली ‘सकाळ’मध्ये १३ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात राज्य कला संचालनालयाच्या आॅनलाईन इंटरमिजिएट परीक्षेला ग्रामीण व दुर्गम भागातील हजारो विद्यार्थी वंचित राहणार असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली होती.
 • शिवाय विद्यार्थ्यांना ऐनवेळी अधिवास प्रमाणपत्राची (डोमिसाईल) सक्ती करून परीक्षेचे शुल्कही दुप्पट करून त्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला दिल्याचे समोर आणले होते. त्याची गंभीर दखल घेत सामंत यांनी आज राज्य कला शिक्षक महासंघाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत.
 • इंटरमिजिएटसोबत एलिमेंटरी परीक्षाही ऑफलाईन पद्धतीने घेण्याची मागणी करण्यात आली होती. तिला यश आल्याने एप्रिल महिन्यात दोन्ही परीक्षा ऑफलाईन होणार आहेत.

Intermediate Exam Dates

Intermediate Exam Date: The Intermediate Painting Category Examination will be conducted online on 22nd and 23rd February for the additional art marks given to the 10th standard students in the state. Student registration process, schedule, instructions for this exam will be available on the website of Arts Directorate from 12th to 20th February. Students should visit the Art Directorate website for more information

‘राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त कला गुणांसाठी २२ आणि २३ फेब्रुवारीला इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा  ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. एलिमेंटरी परीक्षेबाबतही आगामी काळात स्वतंत्रपणे माहिती देण्यात येईल,’ अशी माहिती कला संचालक राजीव मिश्रा यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

या परीक्षेमुळे सवलतीचे अतिरिक्त कला गुण विद्यार्थ्यांना देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त कला गुणांचा लाभ मिळण्यासाठी चित्रकलेची श्रेणी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया, वेळापत्रक, सूचना १२ ते २० फेब्रुवारीपर्यंत कला संचालनालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध राहणार आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी कला संचालनालयाच्या वेबसाइटवर भेट द्यावी, असे आवाहन मिश्रा यांनी केले आहे

शाळा तेथे केंद्र’

दरम्यान, दहावी, बारावी लेखी परीक्षांसाठी करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत व कनिष्ठ महाविद्यालयातच परीक्षा देता यावी, यासाठी शाळा तेथे केंद्र ही योजना राबवण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील ३२ हजारांहून अधिक परीक्षा केंद्रे व उपकेंद्रांवर परीक्षा होणार आहे. १५ विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये उपकेंद्र उभारण्यात येणार आहे.

लसीकरण बंधनकारक नाही

दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी लसीकरण बंधनकारक करण्यात आलेले नाही. मात्र, अधिकाधिक विद्यार्थ्यांचे लसीकरण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत. परीक्षेपूर्वी ज्या विद्यार्थ्यांना करोना झाला आहे, अशांना तीन महिने लस घेता येणे शक्य नाही. यामुळेच लसीकरण बंधनकारक न करता त्यासाठी प्राधान्य देण्यात आले असल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


Elementary Intermediate Exam Dates

Elementary Intermediate Exam Dates: : The Directorate of Arts has announced the dates of Government Drawing Examinations (Elementary, Intermediate). The Intermediate Drawing Grade Exam will be held on 12th and 13th February while the Elementary Grade Exam will be held on 14th and 15th February. Read More deails

 एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षांच्या तारखा जाहीर

 कला संचालनालयाने शासकीय रेखाकला परीक्षांच्या (एलिमेंटरी, इंटरमिजिएट) तारखा जाहीर केल्या आहेत. इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 12 व 13 फेब्रुव्रारी तर एलिमेंटरी ग्रेड परीक्षा 14 व 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

 कोरोनामुळे शासकीय रेखाकला परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे कला संचालनालयाने याआधीच जाहीर केले होते. त्यानुसार विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा देऊ शकतात. अपवादात्मक परिस्थिती वगळता वेळापत्रकात बदल झाल्यास त्याविषयीच्या सूचना स्वतंत्रपणे कळविण्यात येतील, असे कला संचालक राजीव मिश्रा यांनी स्पष्ट केले.

तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि इतर मार्गदर्शक सूचनाही लवकरच कळविण्यात येतील, असेही मिश्रा यांनी सांगितले. यंदा दहावीच्या परीक्षेला बसलेल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी केवळ एलिमेंटरी परीक्षाच दिली आहे. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे परीक्षाच न झाल्याने या विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट परीक्षा देता आलेली नाही असे विद्यार्थी आता ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने देऊन कला कोटय़ातील वाढीव गुणांचा लाभ घेऊ शकतात. बोर्डाच्या परीक्षेत कला कोटय़ातील वाढीव गुण लागू होण्यासाठी विद्यार्थी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!