आनंदाची बातमी; इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम ११ प्रादेशिक भाषांमध्ये

Engineering Course in Local Language

Engineering Course in local language- There is good news for all students who are looking for an engineering course and want to learn in the future. You will be able to complete this engineering course in your regional language. The All India Council of Technical Education has approved engineering courses in 11 languages.

आनंदाची बातमी; इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम ११ प्रादेशिक भाषांमध्ये

Engineering Course in local language: इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या आणि भविष्यात शिकू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला तुमच्या प्रादेशिक भाषेमध्ये हा इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परीषदेने ११ भाषांमधील इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमला परवानगी दिली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करताना अडचणी येत होत्या. आपल्या प्रादेशिक भाषेमध्ये हा अभ्यासक्रम करता येणार असल्याने विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यासंदर्भातील माहिती दिली. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) ने ११ प्रादेशिक भाषांमध्ये बी.टेक अभ्यासक्रमाला परवानगी दिल्याचे ते म्हणाले. या भाषांमध्ये हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगु, कन्नड, गुजराती, मल्याळी, बंगाली, आसमी, पंजाबी आणि उड़िया या भाषांचा समावेश आहे.

मराठीतून इंजिनीअरिंग शिका

मुंबई विद्यापीठातर्फे लवकरच मराठी भाषेमध्ये इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम सुरु होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्या परिषदेत या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. स्थानिक भाषेमध्ये इंजिनअरिंग शिक्षण द्यावे असे निर्देश ऑल इंडिया काऊंसिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICT)ने इंजिनीअरिंग महाविद्यालयांना दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!